वृद्धाश्रम

तृप्ति २३'s picture
तृप्ति २३ in जे न देखे रवी...
17 Sep 2018 - 3:35 pm

वृद्धाश्रम

आज एका आजीला
मी वृद्धाश्रमात पाहिलं
तीच्या डोळ्यातील दुःख
मी जवळून अनुभवलं

ती निराश होती
हतबल होती
दाराकडे नजर रोखून
वाट बघत होती

काय चुकलं तिचं की
वृद्धाश्रमात तिला राहावं लागतंय
सार काही मुलाला देऊन
तिला मात्र अस जगावं लागतंय

डोळ्यातले अश्रु ही
तिचे काही वेळाने थांबून गेले
पुण्य केलं की पाप
हे तिला ही कळेनासे झाले

म्हणुनच म्हणते की ……..

नका रे मुलांनो
वागु असे
आई वडिलांपेक्षा श्रेष्ठ
ह्या जगात कोणी नसे

त्यांना फक्त एक हक्काचं
घर द्या
उर्वरित आयुष्य त्यांना
आनंदाने घालवु द्या …..

Trupti Sameer Tilloo
Vrudhashram Marathi Kavita

अभय-काव्यकविता माझीभावकवितामाझी कवितावृत्तबद्ध कविताकवितासमाज

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

17 Sep 2018 - 4:53 pm | चौथा कोनाडा

छान कविता ! साधी पण भीडणारी.
काही ठिकाणी आढळणारे कटू वास्तव !
बदलती वेगवान जीवन शैली कुटूंब आणि नाते संबंध उध्वस्त करत आहे, करू पहात आहे.

भिकारी आणि पाखंडी आहे तो ज्याने माऊलीची सेवा केली नाही . दुःख याचे सदैव मनात माझ्या , मी करूनही ती मला मिळाली नाही ..

चुकत नसतो , त्याचा हिशेब कधीच चुकत नसतो

जो करतो तोच फेडतो या जन्मी

साधं गणित आहे, लेका

इथे फक्त भागाकार होत असतो

तू एव्हढं करतो , तुला किती मोल तयाचे

पोटाला बांध गोळे चार पौंडांचे

दोन दिवस काढले तरी खूप झाले

विसरून जाशील हगायचे ?

माउलीपुढं विज्ञान नाही

माउलीपुढं ज्ञान नाही

माउलीपुढं देव नाही

इथे नतमस्तक आस्तिकही आणि नास्तिकही

माऊलीवाणी कुणीच नाही

खूप सुंदर कविता. हृदयस्पर्शी

काजुकतली's picture

4 Oct 2018 - 11:21 am | काजुकतली

का बरे हताश निराश व्हायचे? जुन्या जमान्यात एकत्र कुटुंब पद्धतीत नातवंडे आजी आजोबासोबत वाढायची. आजचे आजी आजोबा त्यांच्या जवानीत नव्या वाटा शोधायला वेगळे झाले. त्यांची मुले त्यांच्यापेक्षा वेगळ्या वाटा शोधताहेत. आज लोकांची एकंदर प्रवृत्ती स्वतंत्र राहायची आहे. वृद्ध माणसांचे लोढणे वाटते. थकलेल्या शरीर मनाने परत संसाराची जबाबदारी ओढण्यापेक्षा वृद्धाश्रमात मजेत वेळ वाया घालवलेला बरा. याची तरतुद करून मग काही उरलेच तर ते मुलांना देऊन आपण मजेत राहावे. जिंदगी ना मिले दोबारा. मुलांच्या आठवणीत डोळे भरुन आयुष्य कंठण्यापेक्षा हे जास्त बरे.