हाॅकिंगे जे प्रेडिक्टले
हाॅकिंगे जे प्रेडिक्टले
ते म्यां चक्षुर्वै पाहिले
कृष्णविवरासी भेदिले
आरपार म्यां आजची
कृष्णविवराचा चव्हाटा
तेथ पुंजभौतिकीचा बोभाटा
चारी मितींचा उफराटा
कोलाहल माजला
कार्यकारणाची तर्कटे
उलटी पालटी पडती येथे
आधी कळस मग पायथे
हाची लोच्या येथला
कवाडे विभिन्न विश्वांची
ठोठाविता उघडती साची
अनवट रूपे तयांची
जाणे केवळ हाॅकिंग