कशी वाटली आमची दहा बाय दहा ?

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
12 Mar 2018 - 7:12 pm

कशी वाटली आमची दहा बाय दहा

आनंद ओसंडून चाललाय पहा

शेजारी शेजारी मांडलीय चूल छोटी

सासू लाटतेय चपाती

भाजतेय सून मोठी

धाकटीने घातलाय कपड्याना पीळ

मधली करतेय पोरांचा सांभाळ

छोटंसं घर त्याचं इनमीन चार वासं

इवल्याश्या घरात राहतात बाराजण कसं ?

महालाला लाजवेल अशी घराची शोभा

महादेव प्रसन्न हस्ते जागोजागी उभा

घराला घरपण माणसांनीच येते

भुई चालेल कमी पण लागते घट्ट नाते

सिद्धेश्वर विलास पाटणकर

कविता माझीमांडणी

प्रतिक्रिया

इथे कवितेत चुकून " बारका " टंकल गेलंय. ते " बाराजण" असं पाहिजे होत . एक नम्र विनंती सा सं ना .. चूक दुरुस्त होईल का ?

जेम्स वांड's picture

13 Mar 2018 - 11:59 am | जेम्स वांड

ही कविता कुठल्या छंदात लिहिली आहे?

अभिजीत अवलिया's picture

13 Mar 2018 - 12:09 pm | अभिजीत अवलिया

कविता पटली नाही.

शेजारी शेजारी मांडलीय चूल छोटी

एकापेक्षा जास्त चुली आहेत घरात म्हणजे.
मग नाते घट्ट आहे असे कसे म्हणता येईल?

प्राची अश्विनी's picture

13 Mar 2018 - 1:00 pm | प्राची अश्विनी

नाही हो, चूल एकच आहे. तुम्ही "ऑंखों में. ऑंखों में तेरा ही चेहरा .. "हे गाणं ऐकलंय का? त्यात कसं ऑंखों में दोन वेळा म्हटलंय? तसंच इथे आहे. :)

manguu@mail.com's picture

13 Mar 2018 - 1:18 pm | manguu@mail.com

एकाच चुलीवर सगळे कसे होईल ? शेजारी शेजारी २-३ चुली असतात.

manguu@mail.com's picture

13 Mar 2018 - 1:18 pm | manguu@mail.com

एकाच चुलीवर सगळे कसे होईल ? शेजारी शेजारी २-३ चुली असतात.

जेम्स वांड's picture

13 Mar 2018 - 2:02 pm | जेम्स वांड

महारावळ रतनसिंह होऊन तुटून पडलेले दिसतात

अगदी प्रांजळपणे सांगायचे झालं तर मला कवितेतलं काहीही माहित नाही ... मी जे दिसतं ते मांडायचा प्रयत्न करतो ...बहुधा पद्यामध्ये असल्याने त्या तुम्हाला आवडत नसतील ... हि कविता म्हणजे माझं बालपण आहे असं समजा हवंतर ... आम्ही लहान असताना , माझे आई बाबा आणि तीन काका आणि त्यांची कुटुंबं , आजी आजोबा असे सारे मिळून जवळजवळ पंधराजण अक्षरशः दहा बाय दहा मध्ये राहिलो होतो जवळजवळ आठ एक वर्ष ... काळ बदलला आणि त्याबरोबर सर्व काही .. आता प्रत्येकाचा वरळीमध्ये आलिशान फ्लॅट आहे पण ती मजा नाही जी पूर्वी होती ... पूर्वी काका दुकानातून जेवायला घरी येताना काही फळ आणायचा ,, बच्चेकंपनी त्या फळांसाठी लाईन लावायची .. प्रत्येकाच्या वाट्याला फक्त एकेक फोड यायची आणि चिक्कार मजाही ... ते दिवसही गेले आणि ती मजाही ... आता घरी फळांचा ढीग पडलेला असतो पण माझी मुलं त्याकडे चुकूनही बघत नाहीत .. त्यामुळे खरंच हळहळ वाटते ...

सिद्धेश्वर

खिलजि's picture

13 Mar 2018 - 3:43 pm | खिलजि

"ख" लावून ऊ , "श" ला लावला आ

" ल " ला ठेवलं असंच

खुशाल झाला पहा

" च " ला लावला ए, टिम्ब टाकलं एक

" ड " लावला परत ऊ ,

चेंडू झाला मऊ