गहन हे मर्म दु:खाचे
गहन हे मर्म दु:खाचे
उमजणे कठिण किती असते
साचले युगांचे अवघे
निमिषात अश्रुरूप घेते
उफराटे गणित विषाचे
समजणे कठिण किती असते
मरण्यास पुरे इवलेसे
जगण्यास कितीही कमी पडते
शब्दांच्या निबिड अरण्यी
बहरणे कठिण किती असते
अमरत्व उमलण्या आधी
का मरण विकटसे हसते