कविता माझी

निघाला शिकारीला कालीयानाग

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जे न देखे रवी...
20 Aug 2017 - 8:26 am

घालून विळखा दोन्ही धृवांना
दाबून शेपटीत हिमालयाला
दहाफणांनी ओकीत विषारी आग

निघालाआहे शिकारीला
कालीयानाग.

अदृश्य या दैत्य पुढे, व्यर्थ आहे
मानवी अस्त्र, शस्त्र, क्षेपास्त्र सारे.

कारण

दशेंद्रीयांच्या रथावर स्वार होऊनच
निघाला आहे शिकारीला
कालीयानाग.

कविता माझीकविता

पहिला पाऊस

तृप्ति २३'s picture
तृप्ति २३ in जे न देखे रवी...
15 Aug 2017 - 6:45 pm

ह्या कवितेत मी पावसाच्या थेंबांनी मन कसे बहरते ते सांगितलं आहे .

☔ पहिला पाऊस ☔

पहील्या पावसात भीजतांना
आठवण तुझी होते
पावसाच्या त्या सरीमधे
मन माझे उमलते
☔☔☔☔☔
हाती तुझा हात घेऊन
भीजावेसे वाटते
दाटलेल्या त्या धुक्यांमधे
रमावेसे वाटते
☔☔☔☔☔
पावसाच्या सरीने
दरवळतो सुगंध मातीचा
भीजतांना त्या सरीमधे
विसर पडतो स्वतःचा

कविता माझीप्रेम कविताकविताप्रेमकाव्य

ती सध्या काय करते ?

बाळ ठोंबरे - प्रकाश's picture
बाळ ठोंबरे - प्रकाश in जे न देखे रवी...
14 Aug 2017 - 8:19 pm


ऐका ! ती सध्या काय करते
उठल्या उठल्या वाय- फाय करते
सकाळ पासून खाय खाय करते
तिखट खाऊन हाय हाय करते
बिल आले की नाय नाय करते
रोज नव्या मित्राला 'हाय' करते
संध्याकाळी त्याला 'बाय' करते
रोज नवा ड्रेस 'ट्राय' करते
वय लपावे म्ह्णून 'डाय' करते
खोटं खोटंच 'शाय' करते
दुसऱ्याचा भेजा 'फ्राय' करते
स्वतः मस्त 'एन्जॉय' करते
तीच जाणे कसे काय करते
कळलं ? ती सध्या काय करते ?

------ बाळ ठोम्बरे

कविता माझीकविता

ती मला आवडते

निओ's picture
निओ in जे न देखे रवी...
11 Aug 2017 - 2:56 pm

ती मला आवडते

जेव्हा लाडिकपणे
अंगाशी झोंबते
तेव्हा ती मला खूप आवडते

जेव्हा किरकोळ गोष्टीला
खट्याळपणे Oh My God म्हणते
तेव्हा ती मला खूप आवडते

माझ्या टोमण्यांवर
गुद्द्यांचा प्रसाद देते
तेव्हा ती मला खूप आवडते

मी टकाटक आवरून बाहेर जाताना
हूं... करून नाक मुरडते
तेव्हा ती मला खूप आवडते

जेव्हा माझा पचका होतो
तिला कशी जिरली एकाची
असा लहान मुलासारखा आनंद होतो
तेव्हा ती मला खूप आवडते

कधी कधी माझ्या रागवण्यावर
भोळा भाबडा चेहरा करते
तेव्हा ती मला खूप आवडते

कविता माझीप्रेम कवितामाझी कविताशृंगारहास्यकविताचारोळ्याप्रेमकाव्यविनोद

अस्वस्थ बरसात

रवि बदलापूरेकर's picture
रवि बदलापूरेकर in जे न देखे रवी...
4 Aug 2017 - 10:20 pm

अस्वस्थ बरसात
अशीच अवचित आली
सर ती पावसाची,
सोबत दाटून आली
सय तुझ्या आठवणींची

तो पाऊस बेफाम
तो वारा मदहोश,
ती चिंब बरसात
असलेली तुझी साथ

ते गारठलेले हात
ते उष्ण श्वास,
होणारे ते स्पर्श
हवेहवेसे सारे क्षण

आली होतीत मिठीत
जेव्हा कडाडली होती वीज,
होते मानले किती आभार
मी तिचे मनातल्या मनात

त्या न संपणार्‍या गप्पा तुझ्या
ते न विरणारे हास्य तुझे,
आता छळते ही बरसात सदा
जेव्हा आठवतात ते क्षण पुन्हा

कविता माझीकविता

पुस्तक

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
16 Jul 2017 - 6:23 am

ते पुस्तकच आहे.
दूर तुझ्या घरात ठेवलेलं
काचेआड.

एकदा तू वाचलेलं.
तू तिथं नसताना
मी वाचलेलं.
तिसरं कुणीही ते वाचलेलं नाही.

एकदा तू, नंतर मी.
कथा तुझ्या डोळ्यांनी वाचली
मी तुझे डोळे वाचले.

ते पुस्तकच आहे? अजूनही?
दूर तुझ्या घरात ठेवलेलं
काचेआड...
-शिवकन्या

कविता माझीप्रेम कवितामांडणीवावरकवितासाहित्यिक

उध्दु . . तुला माह्यावर भरोसा नाय काय ?

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in जे न देखे रवी...
11 Jul 2017 - 2:52 pm

उद्धुचे वडील किती मोठे . . मोठे . .
त्यांचे पण नशीब करंटे . . . . करंटे . .
त्यांच्या पोटी आला हा गोटा गोल . . गोटा गोल . .
उध्दु तू माझ्याशी गोड बोल . . . गोड बोल . . .

उद्धुचा मुलगा आदू . . . आदू . . .
आहे तो पक्का लडदु . . . लडदु . . .
पेंग्विनचा खर्च करतंय कोण . . करतंय कोण
उध्दु तू माझ्याशी गोड बोल . . . गोड बोल . . .

उद्धुचा पेपर सामना . . . सामना . . .
संपादकाला काही येईना . . येईना . . .
गुहेचा झाला पांजरपोळ . . . . पांजरपोळ . . . .
उध्दु तू माझ्याशी गोड बोल . . . गोड बोल . . .

अदभूतआता मला वाटते भितीकविता माझीकाहीच्या काही कविताफ्री स्टाइलबालसाहित्यरतीबाच्या कविताहास्यनाट्यप्रेमकाव्यमुक्तकविडंबनमिसळव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणराजकारण

परीक्षा

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in जे न देखे रवी...
9 Jul 2017 - 12:37 pm

परीक्षेला बसवलं आहेस तू अशा देवा
किती पानं लिहितोय तरी वेळच संपत नाही
इतकी अवघड परीक्षा काय ही कामाची
हजारदा वाचला तरी तुझा प्रश्नच कळत नाही !

परीक्षेचं वेळापत्रक तरी आधी सांगायचं असतं
कोणालाही असं थेट पेपरला बसवायचं नसतं
अभ्यासक्रम वेगळा आणि हे प्रश्न भलतेच आहेत
गोंधळ झाला तरीही वर मार्क मिळवायचे आहेत ?

मागे एकदा दिला होता मी धैर्याचा एक पेपर
त्याचं काय झालं पुढे ते कळलंच नाही नंतर
आता चालू आहे सहनशक्तीची अफाट चाचणी
करतोस तरी कशी तू असल्या प्रश्नांची जुळवणी ?

अभय-काव्यकविता माझीमाझी कविताकवितामुक्तक

मराठी माणसा झोपलाच राहा

अरूण गंगाधर कोर्डे's picture
अरूण गंगाधर कोर्डे in जे न देखे रवी...
8 Jul 2017 - 10:32 pm

मराठी माणसा झोपलाच राहा
पॅसे मिळविण्या मात्र तत्पर राहा
घरिदारी अन बाजारीही
जातीपातीचे राजकारण करी

नको तेथे अध्यात्म लावुनी
विसरुनी जा तू दिव्य लक्ष्मी
हरलास जरी जीवनी तू
अध्यात्माचे धडे गिरवी तू

वास्तवाचे भान सोडुनी
नवा मार्ग शोधू नको तू
मिळणाऱ्याचा द्वेष करी तू
बाणा आपुला सोडू नको तू

बदलू अथवा पेटू नको तू
आस प्रगतीची ठेवू नको तू
जुने सारे संत पकडुनी
कीर्तन भंडारे करी तू

मंदिरांपुढे रांग लावुनी
वेळ आपुला व्यर्थ दवडी तू
वाद घाल तू जयंत्यांवरी
शासकीय तिथी दिनांकांवरी

कविता माझीकविता