कविता माझी

नवी मैत्री

तृप्ति २३'s picture
तृप्ति २३ in जे न देखे रवी...
13 Oct 2017 - 12:10 am

नवी मैत्री

नवी मैत्री आहे
पण आहे खूप सुंदर
कुठे ही असलो तरी
कुणीच कोणाला देऊ नका अंतर....

आपलं ते गोड़ गुपित
एकमेकींना सहज पणे बोलून गेलो
तुझे तेच माझे म्हणत
एकमेकींमध्ये रमत गेलो...

नवीन आहे आपली मैत्री
तरी जपतोय आपण फुलासारखी
कायमच एकमेकींना साथ देऊ
एकमेकींच्या आनंदासाठी.

तृप्ती समीर टिल्लू
http://www.truptiskavita.com

कविता माझीमाझी कविताकविता

मधुघट१

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
10 Oct 2017 - 12:12 pm

मधुघट कुणा मिळे भरलेला
शोधते जळकुंभ कुणी ।।धृ ।।

बळ कैसे
येईल अंगा
जळही दुर्मिळ भासतसे
अमृताची जरी हाव नसे
ऐकेना व्याकूळ आर्जवाला ।।१।।

लोळे कुणी
मखमालीवरी
वणवण, हाय! कुणा ललाटी
भलीबुरी, ही जगरहाटी!
कमवेना कुणी त्या गोडीला? ।।२।।

भला जाणता
दीन नेणता
कष्ट करी अमाप जरी
जैसे तैसे रहावे धरी
साखरपाणी तो प्यालेला ।।३।।

- संदीप चांदणे

कविता माझीकरुणशांतरसकलाकविता

वासफुलं

Swapnaa's picture
Swapnaa in जे न देखे रवी...
3 Oct 2017 - 12:16 am

वासफुलं

काळोख्या अंधारांत
अचंबनेच्या वळणात,

वेदनांच्या आवाजांत
जळणाऱ्या दिव्यांत,

कळ्यांच्या बाजारांत
पैश्यांच्या व्यापारांत,

शृंगाराच्या पसाऱ्यात
वासनेंच्या डोळ्यांत,

विकृतीच्या प्रहारांत
अश्रुंच्या पुर्णविरामात......

कवी - स्वप्ना

कविता माझीकविता

मुंबईकर . . . . .

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in जे न देखे रवी...
30 Sep 2017 - 11:54 pm

मृत्यूचे दूत आले कुठून हे प्रत्यक्ष मृत्यूलाही सांगता नाही आलं . .
अशी कुठली घाई होती मुंबईकरा जे तुला पाच मिनिटं थांबता नाही आलं ?

रोजची सकाळ तुझ्यासाठी एक नवीन युध्द . . . काल तुला चिलखतही घालता नाही आलं . . .
अशी कुठली घाई होती मुंबईकरा जे तुला पाच मिनिटं थांबता नाही आलं ?

घड्याळाचे काटे तसे रोजच बोचतात नजरेत . . . अजून एक दिवस त्यांना नजरेआड का नाही करता आलं ?
अशी कुठली घाई होती मुंबईकरा जे तुला पाच मिनिटं थांबता नाही आलं ?

कविता माझीकरुणमुक्तकराहती जागानोकरीव्यक्तिचित्र

गहन हे मर्म दु:खाचे

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
22 Sep 2017 - 2:59 pm

गहन हे मर्म दु:खाचे
उमजणे कठिण किती असते
साचले युगांचे अवघे
निमिषात अश्रुरूप घेते

उफराटे गणित विषाचे
समजणे कठिण किती असते
मरण्यास पुरे इवलेसे
जगण्यास कितीही कमी पडते

शब्दांच्या निबिड अरण्यी
बहरणे कठिण किती असते
अमरत्व उमलण्या आधी
का मरण विकटसे हसते

कविता माझीमुक्तक

ह्रदयातुनी

शार्दुल_हातोळकर's picture
शार्दुल_हातोळकर in जे न देखे रवी...
18 Sep 2017 - 11:45 pm

धावत्या पायास माझ्या
लाभु दे आता विसावा
भाबड्या माझ्या मनाला
श्रावणाचा साज यावा

अंतरी आहेत ज्याही
वेदना जाव्या विरुनी
लाभुनी हळुवार माया
घावही यावे भरुनी

शोधतो आहे निवारा
त्या रुपेरी काळजाचा
वाटते यावा जरासा
गारवा आता सुखाचा

अंतरी वाहे झरा जो
माझिया ह्रदयामधुनी
अमृताचा गंध त्याला
ओंजळीने घे भरुनी

उगवु दे सूर्यास पुन्हा
जाळुनी अंधार सारा
संपण्या आता उन्हाळा
बरसु दे श्रावणधारा

कविता माझीकविता

अत्तर

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
12 Sep 2017 - 1:10 am

कपडे
कितीही मळले,
जुने झाले,
रंग उडून गेला
वीण उसवून गेली
घड्या विस्कटून गेल्या
तरी
कधीतरी लावलेले
मायेचे भरजरी अत्तर
मंदपणे दरवळत राहते!
.
.
.
माणसं अशी
अत्तर असती तर..!

शिवकन्या

अदभूतकविता माझीमाझी कवितामुक्त कवितासांत्वनामांडणीसंस्कृती

नेत्र न कोई

दिपक लोखंडे's picture
दिपक लोखंडे in जे न देखे रवी...
11 Sep 2017 - 1:43 pm

दुःख दर्शविण्या मझला
दुजा मार्ग नाही
रंग हजारो माझे
पाहण्या नेत्र न कोई

शोभून दिसते सुंदरी
अन् सुगंध देते मोगरी
फरक इतकाच सखे
भार तुच्छ हा उरावरी

टकटक आवाज करती
चाले गुलाबी परी
मधुर सुगंध तिचा
वाटे नभाची सरी

हे दृश्य पाहण्या मझला
दुजा मार्ग नाही
रंग हजारो माझे
पाहण्या नेत्र न कोई

कविता माझीसंगीतकविताचारोळ्याभाषाव्युत्पत्ती

भेट पावसाची..

दिपक लोखंडे's picture
दिपक लोखंडे in जे न देखे रवी...
8 Sep 2017 - 4:54 pm

भेट तुझी माझी पावसाची
आठवण आहे बावऱ्या मनाची..

तु सजली आहेस लावून गजरा
सह मोहक सुगंध देई मोगरा
भुलून गेलो आहे सजनी
प्रीत रंग पसरला गगणी
ऐकुनी हे बोल तुझे
वाटे मज वाजे बासुरी..

बघुनिया रूप तुझे
घाव झाला हृदयावरी
चंद्र ही निरखून पाही
भेट तुझी माझी पावसाची..

– दिपक.

कविता माझीमांडणीकविताभाषा

मी शोधात आहे अशा कवितेच्या,

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
4 Sep 2017 - 2:08 pm

मी शोधात आहे अशा कवितेच्या,
तारे, वारे, रिमझिम, फुलं, वेली, विरहाचे उमाळे,
असं आळुमाळु काहीच नसेल तिच्यात
हुलकावण्या देईल ती, पण तरीही नेटाने शोधेन ती कविता
जी थेट भिडून उलगडताना देईल अनुभव –
हर एक थर सोलूनही जिवंत राहिलेल्या वास्तवाचा,
थंड दुधारी कट्यारी इतका
खराखुरा

कविता माझीमुक्तक