नेणिवेला जाणिवेने छेदता जे उरतसे
ते पुरे समजून घेणे कधिच का सोपे नसे?
या क्षणी ते स्तंभ भासे, शूर्प ते पुढच्या क्षणी
पाहू मी गजरूप कैसे, नेत्र माझे झाकुनी
कोणी त्या म्हणतात माया; वास्तवाचा विभ्रम
कोणी त्या म्हणती अविद्या; सर्जनोद्भव संभ्रम
वास्तवाचे रूप कैसे? कोण जाणे सर्वथा?
ज्ञेय-ज्ञाता भेद फिटता शेष आदिम शांतता
प्रतिक्रिया
6 Nov 2017 - 2:50 pm | ज्ञानोबाचे पैजार
"ज्ञेय-ज्ञाता भेद फिटता शेष आदिम शांतता"
हे कळाते पण वळत नाही, मग उगाच पाण्यावर काठी मारुन पाणी दुभंगवयचा प्रयत्न करत बसतो.
पैजारबुवा,
6 Nov 2017 - 3:08 pm | अनन्त्_यात्री
परमेश्वर
6 Nov 2017 - 6:20 pm | प्राची अश्विनी
सुरेख. किती सुंदर शब्द वापरलेत.
7 Nov 2017 - 3:46 pm | माहितगार
तुमचा हा प्रतिसाद, क्लिष्ट अध्यात्मिक संकल्पना तुम्हाला सुलभतेने समजातात हेच सिद्ध करतो. तर आपल्याला आवडलेल्या या काव्यातील कठीण शब्द आणि संकल्पनांचे अर्थ आणि जमल्यास रसग्रहण देऊ शक्ल्यास वाचणे आवडेल.
8 Nov 2017 - 8:37 am | प्राची अश्विनी
:)
आजकाल असे शब्द कोण वापरतं? वाचताना खरंच ज्ञानेश्वर कालीन वाटलं. प्रसन्न वाटलं.
7 Nov 2017 - 3:27 pm | अनन्त्_यात्री
धन्यवाद.