ये साजणी आंबराईतल्या आडापाशी
आतुरल्या भेटाया दोन जीवांच्या वेशी
सांगू नकोस सखीला आपुलं गुपित
होईल गावभर बोभाटा विसरून रीत
किती दिस झालं होईना नजरेच्या गाठीभेटी
बघाया तुला केली झाडांवर राघू मैनांनी दाटी
बगळ्यांनी बांधल्या नभात शुभ्र कमानी
वाहणाऱ्या ओढ्यतले जरासे थबकले पाणी
ये चुकवून आडवाटेचे खट्याळ डोळे
घुमू लागली काळजात एकांताची मुकी वादळे