कविता माझी

(ए, बैठ ना जरासा)

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
8 Jul 2017 - 1:33 pm

पेरणा

ए, बैठ ना जरासा, मीठी मीठी करेंगे बाते,
अभी तू आता नई रे, पहेले इधरीच गुजारता राते,

वो पक्या गया कल, मेरेको बहोत बेइज्जत करके,
दिखा दो सालेको औकात, दो चार फटके मारके,

समझताहै मुझको भी, बहोत देर हो गयी है,
चलना भुर्जीपाव खायेंगे, बहोतही भुख लगी है,

पैले बोतता था, रानी तूम रोज मेरे ख्वाब मे आती हो,
लेकीन आजकल तो तुम, किसी और पास ही जाते हो,

चौराहेपे खडे रहे रहे के, गुजर जाती है सारी सारी रात,
आजकल सब दूर से जाते है, कोई लगाता नही मेरेको हाथ,

कविता माझीप्रेमकाव्य

एक अधिक एक...

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
5 Jul 2017 - 7:24 pm

एक अधिक एक=दोन!
डायल केल्यावर लागलाच्च पाहिजे फोन!
नेटवर्क बिझी असू शकतं.
रेंज नसू शकते.
कदाचित स्वीच अॉफ असू शकतो
समोरच्याचा फोन!
या वास्तविक शक्यता ग्रुहीत धरणार कोण? .. छे! छे! लागलाच्च पाहिजे फोन.
कारण,एक अधिक एक=दोन!

कविता माझीमाझी कविताकवितामुक्तकसमाज

..तिथे ती भेटते

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
4 Jul 2017 - 3:42 pm

ढगाच्या आतले
विजेचे वेटोळे
सुटून मोकळे
डोंगरा डसते...तिथे ती भेटते

निबिड रानात
पोपटी पानात
झुकून बघत
मोतिया थेंबात ...किणकिण हासते

भणाण वाऱ्यात
लाटेच्या गाजेत
चांदीच्या वर्खात
किनारा कोरत ... माझ्याशी बोलते

कविता माझीकविता

आयुष्याची गाडी

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in जे न देखे रवी...
28 Jun 2017 - 9:48 am

रिकामी दिसली एक गाडी
त्यात जाऊन बसलो मी
आता मजा येईल प्रवासाची
म्हणून स्वतःशीच हसलो मी

कधी वाटलं गाडीला थांबवावं
कधी सुसाट पळवावं तिला
पण आयुष्य नामक चालकाने
माझा पूर्ण भ्रमनिरास केला

मी नेईन तसंच जायचं तू
म्हणालं मला माझं आयुष्य
कसला हट्ट करायचा नाही
विचारायचं नाही कधी भविष्य

घडवीन तुला सफर मी आता
एका वेगळ्याच जादुई दुनियेची
कुठे फार थांबायचं नाही आपण
आणि घाईही नाही करायची

आलास जसा जन्माला
सगळे रंग तू बघून घे
लक्षात नाही यायचा खेळ हा
हे पहिल्यांदा समजून घे

अभय-लेखनकविता माझीप्रवासवर्णनकवितामुक्तकजीवनमानप्रवास

वारी हो वारी

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in जे न देखे रवी...
23 Jun 2017 - 10:45 am

होता आषाढी कृष्णमेघांची दाटी
मन केवळ विठूसाठी आक्रंदे ।

चालती पाऊले दिशा पंढरीची
वारकरी आम्ही नाहू आनंदे ।

घोष एक गजर एक एक नाम
जीव पिसावला या मधुर नादे ।

ना जुमानू आता ऊन पावसासी
मार्ग क्रमु पांडुरंगाच्या आशिर्वादे ।

पडता दिठीस चरण ते सावळे
जैसे भ्रमर प्राशी तो मकरंदे ।

वारीस न जाताही मनाने वारीमय
हळवा अवघा महाराष्ट्र विठ्ठल छंदे ।

अभंगकविता माझीविठोबाविठ्ठलसंस्कृतीधर्म

साक्षात्कार

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
12 Jun 2017 - 9:23 pm

माझ्या चित्रातले पक्षी चौकट तोडून मोकळ्या आकाशात आले
तेव्हा दिसलं
इंद्रधनुष्य कवेत घेण्यासाठी
रिमझिमतं आभाळ तर
कधीचं ओथंबून वाकलंय

वीट वीट पारखून बांधलेल्या माझ्या कुंपणापलीकडे मी पाहिलं
तेव्हा दिसलं
मी सहज फेकलेल्या विटेवर
माझं श्रेय-प्रेय तर
कधीचं उभं ठाकलंय

अंधार पीत पीत मी इथवर आलो उजेडाच्या प्रतीक्षेत
तेव्हा दिसलं
माझ्या रोमरोमात तर
पहाटेचं तेज
कधीचं फाकलंय

कविता माझीकविता

येथे पाहिजे जातीचे .....

अरूण गंगाधर कोर्डे's picture
अरूण गंगाधर कोर्डे in जे न देखे रवी...
12 Jun 2017 - 7:45 pm

एक होता गुरू
त्याचा एक महागुरू
भेटल्यावर म्हणाले,
" आपण अभ्यास करू
आणि चराचरात शिरू "
मी म्हंटले , " ओके "
त्यांनी मला वह्या दिल्या
मी त्यांच्या नावाने त्या भरवल्या
त्यांना अर्पण केल्यावर
हसून ते म्हणाले, "
" भल्या गृहस्था, हा कसला अभ्यास ? "
आम्ही आधुनिक गुरू
वेगवेगळ्या धंद्यात शिरू,
यात तर धंद्याचा लवलेषही नाही
अर्थाचा नुसता अनर्थ आहे
काल हरणासाठी अर्थ हवा
जो इतरांकडून घ्यावा
आणि गोणींमध्ये भरावा
कालसर्प, राहू शांत , नारायण नागबली
मनः शांती, ही तर आमची हत्यारे

कविता माझीकविता

पहिले प्रेम आणि पहिला पाऊस सारखाच!

bhavana kale's picture
bhavana kale in जे न देखे रवी...
12 Jun 2017 - 3:08 pm

आताच हिंजवडीत मस्त पाऊस पडला आणि मग हे सुचलं....

आभाळ आला कि मन हळवं होतं....
असंख्य आठवणी बरसू लागतात..
मग माझी मीच ह्या पावसासोबत वाहत जाते...

सरींसारखे विचार मनात सरसर कोसळतात
भूतकाळाच्या पानात मग मी रमत जाते..
पावसात भिजली नाही तरी मनात खूप पाऊस पडतो..

कितीही नाही म्हटलं तरी वेळेचा काटा पळत असतो..
पाऊस संपत संपत माझा आनंदही घेऊन जातो..
का हा पाऊस असा ह्रदयाला चिरून चेहऱ्यावर एक गोड हास्य देऊन जातो...

कविता माझीवाङ्मय

मीच का ?

अरूण गंगाधर कोर्डे's picture
अरूण गंगाधर कोर्डे in जे न देखे रवी...
11 Jun 2017 - 1:50 pm

मीच का ओझे वाहावे ?
संस्कृतीचे सभ्यतेचे
पांढऱ्या कॉलरीत माझ्या
मीच का गोड बोलावे ?

मीच का पूजा करावी ?
मीच का वारी करावी ?
मीच का त्यांच्या चुकांना
पदरात घ्यावे पुन्हा पुन्हा

मीच का साफ करावा
माझाच चष्मा हरघडी
त्यांनी चालावे रुबाबात
काळा चष्मा वापरोनी

मीच चोरटेपणाने
का पाहावे स्त्रीकडे
ते भोगुनीयाही तिला
लेऊनी घेती हारतुरे

मीच बांधलेला समाजी
मीच बाधलेला भिडेने
मीच छाती आत घेउनी
का चालावे घाबरोनी ?

कविता माझीकविता

ढग . . !

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in जे न देखे रवी...
10 Jun 2017 - 11:06 am

आभाळातले ढग कधीतरी
त्याला खूप त्रास देतात
कारण नसताना उगीच
तिचाच आकार घेतात . . . .

मग तोही नादावतो वेडा
बघत बसतो तासन् तास
ढगाचं नुसतं निमित्त एक
त्याला फक्त तिची आस....

कधी कधी एकाच क्षणात
तो ढग जातो अचानक विरुन
अन् अचानक जाणवतं रितेपण
भकास वास्तव टाकतं घेरुन

ढगासारखंच स्वप्न विरलं
आणि संपला सगळा खेळ
तो मात्र अजून जपतो उराशी
आठवणींच्या जगातली वेळ !

कविता माझीकविताप्रेमकाव्य