एक अधिक एक=दोन!
डायल केल्यावर लागलाच्च पाहिजे फोन!
नेटवर्क बिझी असू शकतं.
रेंज नसू शकते.
कदाचित स्वीच अॉफ असू शकतो
समोरच्याचा फोन!
या वास्तविक शक्यता ग्रुहीत धरणार कोण? .. छे! छे! लागलाच्च पाहिजे फोन.
कारण,एक अधिक एक=दोन!
गणितात आयुष्य पहायचं.
पण आयुष्याचं गणित शिकायचं नाही!
पहिल्या एक आणी दुसय्रा एकच्या किं~मती मधली तफावत..मूल्यांचं वेगळेपण?
त्यांचं मूळ १ असणं,नसणं?
त्यांची भूक तहान तर अमान्य, अस्विकार्यच!
कारण एक अधिक एक=दोन!
यापेक्षा वेगळी जीवननिष्ठा कोण???
ह्हूं!!! लागलाच्च पाहिजे फोन!
कारण,एक अधिक एक=दोन!
एक अधिक एक=पाच!
एक अधिक एक=दहा! कधी कधी मायनस दहा देखील!
अशी उत्तरं सुद्धा असू शकतात,
याच उत्तरांच्या गणितात.
मानवी आयुष्य असच असतं..याच गणितात.. शांत पहुडलेलं!
पण नाही...
एक अधिक एक=दोन!
डायल केल्यावर लागलाच्च पाहिजे फोन!
शब्दांचे शुद्ध-लेखन.. त्यातले व्याकरण.
भाषिक अर्थप्राप्तीचा खटाटोपच सारा हा.
पण अर्थप्रचितीसाठी पुन्हा लागतं ते बोलीभाषेचंच गणित.
वरिल नियमांच्याही आधीचं!
त्याचं काय?????
पण नाही.
एक अधिक एक=दोन!
डायल केल्यावर लागलाच्च पाहिजे फोन!
==================
अत्रुप्त..
प्रतिक्रिया
5 Jul 2017 - 7:37 pm | जेनी...
गुर्जि मला कळलं नाहि नक्कि काय म्हणायच तुम्हाला ते ...
6 Jul 2017 - 9:15 am | अत्रुप्त आत्मा
जे लोक आयुष्यातल्या प्रत्येक घटना,गोष्टी गणीतातल्या सारख्या ग्रुहीत धरतात.. त्यांची तसं काहीही नसतं, हे न कळल्यानी वारंवार फसगत होते. परंतू ते त्यांचा आडमुठेपणा सोडत नाहीत. असं केल्यावर तसच झालं पाहिजे. हा त्यांचा दुराग्रह कायम राहतो. त्यासंदर्भात वरील मुक्तक वाचावे.
6 Jul 2017 - 5:12 pm | जेनी...
ह्म्म ...
5 Jul 2017 - 7:41 pm | सिद्धेश्वर विला...
गुर्जि खाकि गोलि द्या ताइना
5 Jul 2017 - 9:08 pm | जेनी...
:D
5 Jul 2017 - 9:08 pm | मुक्त विहारि
आवडले...
(आजकाल आम्ही स्पांडूरंगाच्या प्रतिसादाची वाट न बघायचे ठरवले आहे.)
5 Jul 2017 - 10:44 pm | ज्योति अळवणी
काहीशी कळली...
गणितात आयुष्य पहायचं.
पण आयुष्याचं गणित शिकायचं नाही!
अगदी खरं
6 Jul 2017 - 7:23 am | कंजूस
वावा!!