कविता माझी

चंद्र नको , तारे नको

अभिषेक पांचाळ's picture
अभिषेक पांचाळ in जे न देखे रवी...
9 Mar 2017 - 2:46 pm

चंद्र नको , तारे नको , नको खोटी भेट
शब्द हवे , शब्दांसारखे , ओठांमधले थेट

भारी नको , साधी नको , नको पुरी गोड
भाषा हवी , प्रेमाची , त्याला प्रेमाचीच जोड

आज नको , उद्या नको , नको काही क्षणांची
साथ हवी , जन्मासाठी , उरल्या साऱ्या जन्मांची

हसू नको , रुसू नको , नको आशा सुखाच्या
बस हात हवा , हातामध्ये , तुफानी त्या दुःखाच्या

अश्रू नको , दुःख नको , नको भाव ते रोशाचे
एक हवे बस , रोज मला , दर्शन तुझ्या हास्याचे

सुख नको , ऐवज नको , नको आस कुणा गंधाची
छंद हवा बस , तुझाच जीवा , ओढ असो या छंदाची

कविता माझीकविता

आदिप्रश्न

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
9 Mar 2017 - 1:56 pm

धगधगे कोटी सूर्यांचे
स्थंडिल अहर्निश जेथे
का अनादि ब्रह्माण्डाचे
लघुरूप जन्मते तेथे ?

अणुगर्भ कोरुनी बघता
जी अवघड कोडी सुटती
त्या पल्याड पाहू जाता
का शून्य येतसे हाती ?

का अंत असे ज्ञेयाला
की ज्ञान तोकडे ठरते
की सीमा अज्ञेयाची
अज्ञात प्रदेशी वसते ?

कविता माझीमुक्तक

मी ....अब्जशीर्ष

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
3 Mar 2017 - 1:53 pm

मी ....अब्जशीर्ष मानवता

मीच फुलविते विझू पाहणारी पहिली ठिणगी
जिला क्रान्तीच्या सहस्र धगधगत्या जिभा फुटतात

मीच गुणगुणते बदलांची बीजाक्षरे
जी दुमदुमतात महामंत्र होऊन आसमंतात

ती मीच, जिच्या पायाशी चिरेबंद चिलखते
भुगा होण्याआधी लोळण घेतात

मीच मळते विश्व वेढून दशांगुळे उरणाऱ्या
अदम्य ज्ञानलालसेच्या पायवाटा

कैकदा मरून
प्रतिकूलांना पुरून
मीच उरते पुनःपुन्हा

अब्जशीर्ष.
अजिंक्य.

रंग,वंश,लिंग या पलीकडची म्हणून मला हिणवू नकोस
दिव्यत्वाच्या शोधात स्वतःला शिणवू नकोस.

कविता माझीमुक्तक

अर्धा घाव

चांदणशेला's picture
चांदणशेला in जे न देखे रवी...
1 Mar 2017 - 11:40 pm

गडद काळ्या अंधाराला फुटे वाचा
अर्धा घाव काळजात राहिला कुणाचा

रिमझिम अशी डोऴ्यांत लागली नाचू
गाभार्यात आठवणींची भेट पुन्हा वेचू

पिऊनी धरणी रात्र निजली
तरी कशी दिशांना जाग आली

थकले सारे दीप व्यथांचे
जळूनी गेले पथ कुणाचे

कविता माझीकविता

आज मला समजलं

अभिषेक पांचाळ's picture
अभिषेक पांचाळ in जे न देखे रवी...
27 Feb 2017 - 6:00 pm

आई ,
ओढ म्हणजे काय असत ,
ते आज मला समजलं
आठवणीच्या डोहामध्ये ,
मन पुरं भिजलं

तहान भूक झोप सारं ,
क्षणात परकं होतं
अनोळखी ते मोठं घर ,
गिळून मला खातं

मनात माझ्या उत्तरांचं ,
काहुर एक माजलं
आई,
ओढ म्हणजे काय असत ,
ते आज मला समजलं

गर्दी असते बाजूला ,
पण हाकेला तो ओ नसतो
दूर जाऊन उमगलं ,
एकटेपणा काय असतो

दूर जाऊन सहवासाच्या ,
किंमतीचं ते बीज रुजलं
आई,
ओढ म्हणजे काय असत ,
ते आज मला समजलं

कविता माझीकविता

...त्या वेळी कळले नाही

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
26 Feb 2017 - 1:08 pm

त्या एक स्वराची बिजली
स्पर्शून निसटती गेली.....
ती मैफल मग जमलेली
ती बंदिश मज सुचलेली
....मग माझी उरली नाही

उघडता दार अज्ञात
होऊन अनावर आत
कोसळतो कुठुन प्रपात
हे काय भिने रक्तात
...त्या वेळी कळले नाही

ओथ॑बुन चिद्घन आला
निष्पर्ण वृक्ष सळसळला
डवरून फुलांनी गेला
अवचित मग कळले मजला
..... मी देही असुन विदेही!!!

कविता माझीमुक्तक

ट्रिंग ट्रिंग !!!!!

बटाटा चिवडा's picture
बटाटा चिवडा in जे न देखे रवी...
24 Feb 2017 - 10:23 am

ट्रिंग ट्रिंग असा वाजतो जेव्हा Tone..
तेव्हा सर्वाना आठवतो तो "Telephone"

१९९० च्या दशकात केलेला तो पहिला कॉल
आजही आठवतो चाळमालकांच्या घरातला हॉल...
हॉल मध्ये फोनचा "डब्बा" असायचा ठेवलेला
येता-जाता निरखत असायचो आम्ही त्याला..

चाळीतले ते जोशी , नाडकर्णी , आणि पाटील
सर्वांचे कॉल त्या डब्बा फोन वर यायचे..
अन कोणाचा फोन आला आहे हे सांगायला
लहान मुलांनी घरोघरी पळायचे...

काही वर्षांनी,

कविता माझीफ्री स्टाइलमुक्त कवितारोमांचकारी.अद्भुतरससंस्कृतीइतिहासकवितामुक्तकजीवनमानराहणीविज्ञानमौजमजारेखाटन

ती वाचत असता कविता

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
24 Feb 2017 - 10:18 am

ती वाचत असता कविता
डोळ्यात तरळले पाणी
गवसले हरवले शब्द
आठवली विस्मृत गाणी

ती वाचत असता कविता
भळभळल्या बुजल्या जखमा
दु:खाच्या शाश्वत प्रहरी
उन्मळल्या अविचल सीमा

ती वाचत असता कविता
मी पुन्हा हलाहल प्यालो
अवलाद नवी सर्पांची
मी गळा माळुनी नटलो

ती वाचत असता कविता
शेवटची बेडी तुटली
करुणेची धून अनाहत
झंकारत आतून आली

कविता माझीमुक्तक

प्रश्नत्रयी

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
16 Feb 2017 - 4:07 pm

कृष्ण-विवराच्या
गर्भीच्या कल्लोळा
वेध का लागती
दिक्काल-मुक्तीचे ?

स्थूलास व्यापून
सूक्ष्मात सांडता
कैवल्य ओलांडी
उंबरे कशाचे ?

तुझ्या नि माझ्या
निर्लेप नात्याला
पाश हे कशाला
जीवन मृत्यूचे ?

कविता माझीमुक्तक

प्रेम

पराग देशमुख's picture
पराग देशमुख in जे न देखे रवी...
14 Feb 2017 - 12:08 pm

प्रेम म्हणजे साला ,
अंधार झालाय अंधार .
अब्रू वेशींवर टांगलेली नि,
भावनांचा चाललेला व्यापार .

नजर वखवखणारी असूनही येथे,
कोवळ्या कळ्यांना धुमारे फुटू लागतात.
अन प्रेमाचा पाऊस पडला तरी कुजण्याइतकी,
नात्यांची बीजे भिकार असतात.

कविता माझीसंस्कृतीकविताप्रेमकाव्यशब्दक्रीडा