कविता माझी

मुळांनी धरू नये अबोला

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
14 Dec 2016 - 2:40 pm

मुळांनी जमिनिशी अबोला धरून पानाफुलांना अडचणीत आणू नये
त्या बिचाऱ्यांच्या वाऱ्याशी बहराच्या गप्पा रंगलेल्या असतात

आपले अधाशी कोंब घेऊन वाट फुटेल तिकडे फुटू नये
जुन्या खंबीर इमारतीही मग भेगाळून ढासळू लागतात

घनघोर तूफान येतं चालून तेव्हा आपली जागा सोडू नये
मुळांवर विसंबूनच तर फांद्या तूफानाशी लढू शकतात

जावं खोल खोल रूजून, मातीवर उघडं पडू नये
वर कोरड्या उफाड्यात खाली झुळझुळ झरे असतात

इमान राखावं जमिनीशी, आभाळाकडे व्यर्थ पाहू नये
उन्मळून वर आलेल्या सांगा, मुळांना काय अर्थ आहे?

- संदीप चांदणे

कविता माझीशांतरसकवितामुक्तक

भिकारी

शार्दुल_हातोळकर's picture
शार्दुल_हातोळकर in जे न देखे रवी...
3 Dec 2016 - 11:38 am

असे एक वेडा तिथे तो भिकारी
भुकेच्या आकांती जगाला पुकारी

तमा न तयाला उन्हा-पावसाची
दिसे भुक डोळी किती त्या दिसाची

नसे आप्त कोणी तया पामराला
जीवा साथ द्याया कुणी न घराला

थकुनी कधीचा फिरे तो अभागी
कुठे श्वान वेडे तयापाठी लागी

अधु पाय त्याचा अधु लोचनेही
नसे त्राण त्याच्या जराजीर्ण देही

करुणा जगाची कुठे आज गेली
दशा मानवाची खुलेआम झाली

दिले हाकलोनी जया अन्न मागी
अखेरी उपाशी बसे एक जागी

आगीने भुकेच्या जणु अर्धमेला
म्हणे तुच देवा पाहा लेकराला

कविता माझीकरुणकविता

तू फक्त.....

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जे न देखे रवी...
26 Nov 2016 - 2:05 pm

तू फक्त चल म्हण
मी कधीची तयार आहे
बेगडी समाजाच्या बेड्या
तोडायला आतुर आहे

तू फक्त बोल म्हण
मी सांगायला तयार आहे
न उल्लेखलेल्या घटनांची
आज फुटणार माळ आहे

तू फक्त हो म्हण
सगळं मी निभावणार आहे
संगत-सोबत असेल तुझी तर
समाजाला अंगावर घेणार आहे

तू फक्त.... फक्त....
आहे मी म्हण.......
म्हण मात्र ...
जोवर अंगात प्राण आहे...

कलेवरा जवळ बसून राडण्यापेक्षा
जोवर तू अन् मी आहे तोवर 'जहां हें'

कविता माझीकविता

मनाचा एकांत - सरोवरातील नाव

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
26 Nov 2016 - 12:46 pm

['मनाचा एकांत' ही शृंखला इथे संपत आहे.
सगळ्या कवितांना मनापासून दाद देणाऱ्या,
त्यातल्या काहींचे विडंबन पाडणाऱ्या सर्व रसिकजनांचे दिल से आभार! :)]

पहाडातला जख्ख दद्दू
सरोवरात नाव सोडून
पलीकडे निघून गेला
तेव्हापासून,
नाव हलत नाही, डुलत नाही,
पण जराशीही कुजत नाही!
सरोवरात कुणाला येऊ देत नाही,
सरोवरातून कुणाला जाऊ देत नाही!
सरोवरभर तिचीच प्रतिबिंबे खोलवर....
भरल्या सरोवरातल्या रित्या नावेसाठी,
.
.
.
दुसरं काय असतो
एकांत म्हणजे तरी!

शिवकन्या

कविता माझीकाणकोणकालगंगाभावकवितामुक्त कवितासांत्वनाशांतरसवावरसंस्कृतीवाङ्मयकवितासाहित्यिकजीवनमानप्रवासभूगोल

कुण्या गावचा कोण?

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
24 Nov 2016 - 11:36 am

ते गाव मला माहित नाही, म्हणून बरं आहे.
तिथल्या सावल्या, चांदणे, उन्ह .. सारं काही माझ्याकडे सहज येतं.

कुठल्याही प्रकारच्या नात्याचा अडसर लागत नाही त्यात!

मी ही त्याच्याच सारखा 'सहज' ..,
म्हणून त्याला सहजपणे सामावून घेतो माझ्यात.

एकदा त्या गावाने मला विचारले, "अरे मुला.. , येत का नाहिस इकडे आत.. वेस ऒलांडून!? "

मी म्हटले, "नको रे , कशाला उगाच गावकरी होऊ मी? त्यापेक्षा हेच चांगलं आहे."

गाव म्हणते, " जे तुझ्याकडे न मागता सहज येतय, त्याच्याकडे तू नाही येणारं.. सहज... एकदातरी? "

कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तक

लिहितो कविता तुमच्यासाठी...

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
22 Nov 2016 - 5:10 pm

नाखु
Tue, 22/11/2016 - 15:26
नवीन कवीता कधी ? लोक खोळंबून राहिलेत तुम्ची नवकविता वाचायला. लवकर टाकणे नवकविता.

अखिल मिपा नवकवितांची हिवाळी भुईमूग लागवड व नवकाव्याची रब्बी पेरणी संघाची संयुक्त मागणी

--------------------------------------

(खुला सा :- नाखु(न) ;) अंकल आणी त्यांचे मंडळाचे विनंतीस मान देऊन , आंम्हाला त्यांनी टाकलेल्या (वरील) ताज्या खरडीवरून हे काव्य शीघ्र प्रसविले आहे! धीराने घ्यावे! )

लिहितो कविता तुमच्यासाठी
जमवून सारी सामग्री
शब्द, कल्पना, यमके सारी
करूनी त्यांची "ही" जंत्री!

कविता माझीशांतरसकवितामौजमजा

खुळ्या सांजवेळा...

प्राजु's picture
प्राजु in जे न देखे रवी...
22 Nov 2016 - 2:05 pm

खुळ्या सांजवेळा खुळा तोच गहिवर कुणी रोज त्याला कसे सावरे ??
कधी मुक्त उन्मुक्त गंभीर केव्हा.. मनाची किती हाय! स्थित्यंतरे ..

उन्हासोबतीने असे चालते की जणू सावलीशी न नाते जुळे
झुगारून देई जुन्या रीतभाती मिठी मारते वादळाला खुळे
फिरे धुंद, संदिग्ध पण सोवळेसे, थव्यातून फिरती जशी पाखरे
कधी मुक्त उन्मुक्त गंभीर केव्हा.. मनाची किती हाय! स्थित्यंतरे ..

कविता माझीकविता

कसा फुलताना दिसू?

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
18 Nov 2016 - 2:57 pm

नाही ओठावर हसू
डोळा नुसतेच आसू
उभा आत जळताना
कसा फुलताना दिसू?

रूपाची तुझ्या चांदी
झळाळे उष्ण बेभान
माझ्या उघड्या मनाने
सांग कसे आता सोसू?

तुझी साद खोलवर
चिरत मला गेलेली
आता नव्या पाखरांच्या
गाण्यांना मी कसा फसू?

तुला मिळालाय कोरा
चकाकता तो आईना
माझी जागा सांग कुठे
सांग कुठे आता बसू?

- संदीप चांदणे

कविता माझीकरुणकलाकविता

मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
17 Nov 2016 - 11:10 am

मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली

सांगा तुम्ही मला कशी जावू मी आता बाजारी
सांगा तुम्ही मला कशी जावू मी आता बाजारी
या मोदी सरकारने, या तुमच्या मोदी सरकारने
या या मोदी सरकारने
पाचशे हजाराची नोट बंद केली ||धॄ||

मार्केटात आता आल्या नव्या नव्या साड्या
घेण्यासाठी आम्हा सार्‍यांच्या पडतात उड्या
लेटेस्ट फॅशन करायची आता पंचाईत झाली
मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली
या या मोदी सरकारने
पाचशे हजाराची नोट बंद केली ||१||

कविता माझीकवितासमाजजीवनमान

मनाच्या खिशात...

संदीप डांगे's picture
संदीप डांगे in जे न देखे रवी...
14 Nov 2016 - 12:37 pm

समर्थकांच्या देशात
सर्वत्र मंगल वातावरण आहे,
प्रत्येक माणूस अतिशय आनंदात आहे,
देशप्रेमाची लाट आहे,
विजयाचा जयघोष आहे!

विरोधकांच्या देशात लुटालूट, दंगे,
अराजक माजलय, लोक मरत आहेत,
पोरं उपाशी, रुग्ण रस्त्यावर आहेत,
सर्वत्र फक्त आक्रोश आहे!

आपण आपलं चाचपून बघावं,
खिशात किती कॅश आहे,
मनात किती संतोष आहे,
किती असंतोष आहे!

कविता माझीवावरकविता