माझ्या कवितेची शाई
आहे अजब मिश्रण
भस्म अधुऱ्या स्वप्नांचे
त्यात अश्रुंचे शिंपण
कधी माझ्या कवितेचा
शब्द निनादे आभाळी
कधी धरती विंधतो
कधी गुंजतो पाताळी
कवितेची ओळ माझ्या
कधी फुलांनी वाकते
कधी बोलता बोलता
गहनाशी झोंबी घेते
माझ्या कवितेत जेव्हा
फुंकीन मी प्राण नवा
तेव्हा तुम्हा रसिकांचा
पाठीवरी हात हवा
प्रतिक्रिया
16 Mar 2017 - 9:02 pm | संदीप-लेले
छान !
16 Mar 2017 - 11:10 pm | चांदणे संदीप
आधी विडंबक्विचार डोक्यात आलते. पण उघडल्यानंतर कवीचे नाव वाचले आणि... आता कविता वाचायला घेतो! :)
Sandy
20 Mar 2017 - 3:25 pm | अनन्त्_यात्री
धन्यवाद, फूत्कार.
23 Mar 2017 - 10:48 am | पैसा
सुरेख!
10 Apr 2017 - 3:10 pm | अनन्त्_यात्री
धन्यवाद, पैसा!
10 Apr 2017 - 4:52 pm | वेल्लाभट
क्या बात है ! सुरेखच.
12 Apr 2017 - 11:50 am | अनन्त्_यात्री
धन्यवाद, अपूर्व !
12 Apr 2017 - 3:49 pm | सिरुसेरि
छान +१००
13 Apr 2017 - 9:38 am | अनन्त्_यात्री
धन्यवाद सिरुसेरि