आताच हिंजवडीत मस्त पाऊस पडला आणि मग हे सुचलं....
आभाळ आला कि मन हळवं होतं....
असंख्य आठवणी बरसू लागतात..
मग माझी मीच ह्या पावसासोबत वाहत जाते...
सरींसारखे विचार मनात सरसर कोसळतात
भूतकाळाच्या पानात मग मी रमत जाते..
पावसात भिजली नाही तरी मनात खूप पाऊस पडतो..
कितीही नाही म्हटलं तरी वेळेचा काटा पळत असतो..
पाऊस संपत संपत माझा आनंदही घेऊन जातो..
का हा पाऊस असा ह्रदयाला चिरून चेहऱ्यावर एक गोड हास्य देऊन जातो...
प्रतिक्रिया
13 Jun 2017 - 1:59 pm | किरण कुमार
भाव उतरले आहेत
21 Jun 2017 - 2:15 pm | अत्रे
कसले?
21 Jun 2017 - 11:46 am | नितिन५८८
वाह मस्त ......
21 Jun 2017 - 12:21 pm | सच६४८६
खुप छान ....
21 Jun 2017 - 12:25 pm | सच६४८६
सगळेजण पहिल्या पावसाच्या आठवणीत रमून जातात .. आणि मग मान्सून संपत आला तरी दुसरा पाऊस काही पडत नाही..