परीक्षा

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in जे न देखे रवी...
9 Jul 2017 - 12:37 pm

परीक्षेला बसवलं आहेस तू अशा देवा
किती पानं लिहितोय तरी वेळच संपत नाही
इतकी अवघड परीक्षा काय ही कामाची
हजारदा वाचला तरी तुझा प्रश्नच कळत नाही !

परीक्षेचं वेळापत्रक तरी आधी सांगायचं असतं
कोणालाही असं थेट पेपरला बसवायचं नसतं
अभ्यासक्रम वेगळा आणि हे प्रश्न भलतेच आहेत
गोंधळ झाला तरीही वर मार्क मिळवायचे आहेत ?

मागे एकदा दिला होता मी धैर्याचा एक पेपर
त्याचं काय झालं पुढे ते कळलंच नाही नंतर
आता चालू आहे सहनशक्तीची अफाट चाचणी
करतोस तरी कशी तू असल्या प्रश्नांची जुळवणी ?

एक पेपर झाला की मध्ये थोडा वेळ द्यायचा असतोय
तुझ्या शाळेत मात्र मी सतत परीक्षेलाच कसा बसतोय
पेपर संपव तुझे सगळे आता, सांग मी पास की नापास
मनापासून उत्तरं देतोय म्हणून किती द्यायचा तो त्रास ?

कळतंय मला की मीही तुझा एक आवडता शिष्य आहे
आता तरी सांग आधी देवा की माझं काय भविष्य आहे
तू शिक्षक आणि तूच परीक्षक तरीही कठीण पेपर हा
माझा निकाल राखून ठेवलायस, खास सोहळ्यात देणार का ?

अभय-काव्यकविता माझीमाझी कविताकवितामुक्तक

प्रतिक्रिया

संदीप-लेले's picture

10 Jul 2017 - 11:40 pm | संदीप-लेले

आवडली

नवनीत खा आणि परीक्षेला बसा /उभे राहा

पद्मावति's picture

11 Jul 2017 - 2:17 pm | पद्मावति

आवडली.