पहिला पाऊस

Primary tabs

तृप्ति २३'s picture
तृप्ति २३ in जे न देखे रवी...
15 Aug 2017 - 6:45 pm

ह्या कवितेत मी पावसाच्या थेंबांनी मन कसे बहरते ते सांगितलं आहे .

☔ पहिला पाऊस ☔

पहील्या पावसात भीजतांना
आठवण तुझी होते
पावसाच्या त्या सरीमधे
मन माझे उमलते
☔☔☔☔☔
हाती तुझा हात घेऊन
भीजावेसे वाटते
दाटलेल्या त्या धुक्यांमधे
रमावेसे वाटते
☔☔☔☔☔
पावसाच्या सरीने
दरवळतो सुगंध मातीचा
भीजतांना त्या सरीमधे
विसर पडतो स्वतःचा

कविता माझीप्रेम कविताकविताप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

धर्मराजमुटके's picture

17 Aug 2017 - 8:41 am | धर्मराजमुटके

कविता छान आहे पण कृपया शुद्धलेखनाकडे लक्ष द्या.

पहिल्या = बरोबर
पहील्या = चुक
भिजताना = बरोबर
भीजताना = चुक

लिहित रहा.

अनन्त्_यात्री's picture

17 Aug 2017 - 9:19 am | अनन्त्_यात्री

चुक = चूक
चूक = बरोबर

धर्मराजमुटके's picture

17 Aug 2017 - 9:50 am | धर्मराजमुटके

आय आय सर ! :)

अभ्या..'s picture

17 Aug 2017 - 4:27 pm | अभ्या..

छत्र्या छान आहेत मधल्या मधल्या.

sudhirvdeshmukh's picture

19 Aug 2017 - 4:57 pm | sudhirvdeshmukh

छान कवीता !

sudhirvdeshmukh's picture

19 Aug 2017 - 4:57 pm | sudhirvdeshmukh

छान कवीता !

Swapnaa's picture

20 Aug 2017 - 5:41 pm | Swapnaa

भीजतांना त्या सरीमधे
विसर पडतो स्वतःचा..

वरील सुंदर आणि रमणीय ओळी....