मी शोधात आहे अशा कवितेच्या,
तारे, वारे, रिमझिम, फुलं, वेली, विरहाचे उमाळे,
असं आळुमाळु काहीच नसेल तिच्यात
हुलकावण्या देईल ती, पण तरीही नेटाने शोधेन ती कविता
जी थेट भिडून उलगडताना देईल अनुभव –
हर एक थर सोलूनही जिवंत राहिलेल्या वास्तवाचा,
थंड दुधारी कट्यारी इतका
खराखुरा
प्रतिक्रिया
9 Sep 2017 - 10:51 pm | सोन्याभाऊ
http://www.misalpav.com/node/24897
12 Sep 2017 - 2:29 pm | अनन्त्_यात्री
धन्यवाद!
12 Sep 2017 - 5:50 pm | धर्मराजमुटके
ही कविता मस्त आहे. आवडली आहे.
ती 'पाच मिनिट' वाली नव्हती आवडली.
13 Sep 2017 - 11:05 am | अनन्त्_यात्री
आभार.