अत्तर
काव्यरस
कपडे
कितीही मळले,
जुने झाले,
रंग उडून गेला
वीण उसवून गेली
घड्या विस्कटून गेल्या
तरी
कधीतरी लावलेले
मायेचे भरजरी अत्तर
मंदपणे दरवळत राहते!
.
.
.
माणसं अशी
अत्तर असती तर..!
शिवकन्या
वाचने
2914
वाचनखूण
प्रतिक्रिया
3
सुरेख! शांताबाईंची पैठणी
वा! सुरेख कविता!
छान