हाॅकिंगे जे प्रेडिक्टले
ते म्यां चक्षुर्वै पाहिले
कृष्णविवरासी भेदिले
आरपार म्यां आजची
कृष्णविवराचा चव्हाटा
तेथ पुंजभौतिकीचा बोभाटा
चारी मितींचा उफराटा
कोलाहल माजला
कार्यकारणाची तर्कटे
उलटी पालटी पडती येथे
आधी कळस मग पायथे
हाची लोच्या येथला
कवाडे विभिन्न विश्वांची
ठोठाविता उघडती साची
अनवट रूपे तयांची
जाणे केवळ हाॅकिंग
प्रतिक्रिया
5 Apr 2018 - 10:14 pm | डॉ सुहास म्हात्रे
भारी !
हॉकिंगने ही कविता वाचली तर तो त्याच्या थडग्यात टाळ्या वाजवेल !
6 Apr 2018 - 11:13 am | ज्ञानोबाचे पैजार
म्हात्रे काकांना +१
पैजारबुवा,
6 Apr 2018 - 10:12 pm | मदनबाण
शॉलिट्ट्ट्ट्ट्ट...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मोहराच्या दारावर कैर्या मागनं... [ * काय बाई एका-एकाच वागनं ] :- बबन
6 Apr 2018 - 10:34 pm | कंजूस
अनादी अनंत काळाची महती
सांगूनी तो गेला साची
कृषणविवरे ती लहानमोठी
पाहिली आम्ही त्याच्याच डोळी
मॅक्सवेल आणि आइनस्टाइन
करिती उकल विश्वाची
प्रचिती घेणे असाध्य ज्याची
मिती वर्तवे तो हॅाकिंग
7 Apr 2018 - 2:29 pm | अनन्त्_यात्री
सर्वांना धन्यवाद!
8 Apr 2018 - 1:19 pm | नाखु
सार्थ केले यात्री कविता एकदम खत्री!!!
काथ्याकूट कृष्ण विवरापासून दूर असलेला नाखु पत्री
8 Apr 2018 - 6:44 pm | ज्ञानोबाचे पैजार
"बीन सुपारीवाला" लिहायचे राहिले का?
पैजारबुवा,
11 Apr 2018 - 9:48 pm | अनन्त्_यात्री
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!