देहाचे भाषांतर

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
5 Apr 2018 - 2:17 pm

देहाचे भाषांतर
.....
उठता बसता
बोलता हसता
होतच राहते भाषांतर
देहाचे, त्यावरील छिद्रांचे....

स्पर्शाने स्पर्शाचे भाषांतर
वाचावे, ब्रेल लिपीसारखे
आंधळे होऊन...

कि, स्पर्शाने अनुभवावे
शिलालेखाचे भाषांतर
काळापलीकडे गेलेले .....

कि स्पर्शाने उलगडावी
अगम्य देहलिपी
हजारदा अनुवादीत करूनही
अर्थ न लागणारी....

जरा व्याकरण चुकले तरी
निर्धास्त असावे
देहाचे भाषांतर
असते एका संपूर्ण
काळाचे अर्थांतर .....

-शिवकन्या

कविता माझीमांडणीवाङ्मयकविता

प्रतिक्रिया

अरुंधती रॉय यांच्या 'द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स' या कादंबरीत एक वाक्य आहे. 'बायोलॉजी डिझाइण्ड द डान्स.' त्याची आठवण झाली.

प्रचेतस's picture

7 Apr 2018 - 8:38 am | प्रचेतस

उत्कृष्ट

सत्यजित...'s picture

14 Apr 2018 - 4:27 am | सत्यजित...

अतिशय सुंदर,सुरेख,गहन भाषांतर!
खरंतर रसग्रहणच लिहावसं वाटलं वाचता-वाचता!
अजून लिहा... लिहीत रहा!

पैसा's picture

14 Apr 2018 - 6:20 pm | पैसा

सुरेख कविता