शून्याची महती

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
16 Mar 2018 - 1:49 pm

शून्याची महती भारी

या भूवरी शून्यावरी

शून्य बैसे शून्यापरी

शून्यात असे दुनिया सारी

शून्यात देखता शून्य भासे

शून्य शून्यात हासे

शून्यात अनन्य अर्थ असे

शून्यासम दुजा कुणी नसे

शून्यात बेरीज शून्य

शून्यात वजा शून्य

शून्य गुणिले शून्य

शून्य भागिले शून्य

धन्य धन्य तो शून्य

ज्याने शोधिला ते त्याचे पुण्य

शून्यात सुरु सारे

शून्यात मिळे सारे

का वाढावी उगा रे ?

दुःखाचे हे पसारे

उगा धावीशी तू अनन्य

जाण कर्म मर्म शून्य

सुरुवात तुझी शून्य

अंतही तो शून्य

तिमिरतेज जो खाई

परमात्मा तोही शून्य

धन्य धन्य केवळ शून्य

दुजा नसे कुणी अन्य

सिद्धेश्वर विलास पाटणकर

कविता माझीमांडणी

प्रतिक्रिया

एकविरा's picture

17 Mar 2018 - 3:31 pm | एकविरा

शून्यात सुरु सारे

शून्यात मिळे सारे

का वाढावी उगा रे ?

दुःखाचे हे पसारे

छानच

आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद ...

सिद्धेश्वर विलास पाटणकर