देहाला चोळुन घेता
देहाला चोळुन घेता
राखेने उदी बनावे
धुवून सारी पापे
स्वर्गात स्थानही द्यावे
घाबर्या कोडग्या मनाते
दुजे न काही रुचते
भस्माच्या पट्टी मागे
ते तोंड लपवुनी बसते
(कुण्या भाग्यवंताचा)
हा तुटता लटका आधार
आत्मरुप दिसे भेसुर
गलीतगात्र मग होई
नरपुंगव तो लाचार,
मग तुटती तटतट पाश
मनी पडतो स्वच्छ प्रकाश
त्या अनंत धेय्या साठी
सुरु अंतहीन प्रवास