नजर
नजरेत कुणा भक्ती,नजरेत कुणा विरक्ती,
नजरेत कुणा मोका,नजरेत कुणा धोका ,
नजरेत कुणा वासना ,नजरेत कुणा कामना ,
नजरेत कुणा युक्ती,नजरेत कुणा सक्ती,
नजरेत कुणा संस्कार ,नजरेत कुणा दुत्कार ,
नजरेत कुणा जरब,नजर कुणाची खराब,
नजरेत दिसे व्यथा ,नजरेत दिसे कथा,
नजरेत प्रगटे ज्ञान ,नजर मनाची शान