मिपा विडंबन स्पर्धा २०१६ - मतदानापूर्व चाचणी - (भाग १/९८७६५४३२१०)
मिपावर सध्या विडंबन स्पर्धेसाठी जोरदार मतदान चालु आहे. कधी एक कविता पुढे जाते तर कधी दुसरी. या स्पर्धेवर देशविदेशातल्या बडयाबड्या लोकांचे लक्ष आहे असे मला खुद्द एका साहित्य संपादकाने सांगीतले. परवा तर म्हणे मोदीसाहेबांनी स्वतः फोन करुन या स्पर्धेचा सविस्तर आढावा घेतला. कोणती कविता बाजी मारणार यावर म्हणे मोठा सट्टाही चालला आहे.