आंतरजातीय विवाह

निकुंज's picture
निकुंज in जनातलं, मनातलं
22 Mar 2016 - 10:08 am

काल एका मैत्रीनीचा मेसेज आला. एक कविता पाठवली होती. "चुक कोणाची? माझी का त्याची?". खोदुन विचारल्यावर तीने सांगितल. एका मुलावर तीच प्रेम होत अजूनही आहे. दोघही एकमेकावर मनापासुन प्रेम करत होते, अजुनही करतात. एकमेकांनी घरी सगळ काही घरी सांगितलं. पण घरच्यांनी विरोध केला.

कारण एकच दोघांची जात वेगळी म्हणुन. पळुन लग्न करण्याचा सल्ला मी दिला पण घरच्यांना दुखवुन लग्न न करण्याचा निर्णय दोघांनी घेतला होता. जो कोणत्याही संस्कारी मुलाला आणि मुलीला शोभणारा होता. त्यांची गोष्ट ऐकताना १८५० च्या काळ चालु असल्या सारख मला वाटत होत. लग्नासाठी अजुनही मुलगा आणि मुलगी एकच जातीची असायला पाहिजे हे मला माहितच नव्हत.

नेहमीच लग्नाच्या रस्त्यात ही जात, काळ्या माजरा सारखी आडवी का येते अजुनही मला काळल नाही. आणि नेहमीच मुलाला किवा मुलला दहा पावले मागे घ्यावी लागतात. पण ही दहा पावले त्याचं आयुष्य त्यांना एव्हड मागे घेऊन जातात की तीथुन त्यांना पुढे येन अवघड होऊन बसत. पेपर मधुन, पुस्तकातुन खुपवेळा समानते बद्दल वाचाल आणि ऐकल आहे. पण हे विचार अजुनही फक्त पुस्तकातच आहेत.

भारतीयांच्या गंज लागलेल्या मेंदु आणि बुरसटलेले विचार अजुन किती जणांच्या प्रेमाचा बळी घेणार आहे कोणास ठाऊक

धोरणमांडणीसंस्कृतीइतिहासप्रकटनविचारप्रतिक्रियासमीक्षाअनुभवमतसल्लामाहिती

प्रतिक्रिया

इथे लिहून काय उपयोग?

मराठी कथालेखक's picture

22 Mar 2016 - 12:31 pm | मराठी कथालेखक

पळुन लग्न करण्याचा सल्ला मी दिला पण घरच्यांना दुखवुन लग्न न करण्याचा निर्णय दोघांनी घेतला होता. जो कोणत्याही संस्कारी मुलाला आणि मुलीला शोभणारा होता.

हे संस्काराचे लोढणे फेकून द्यावे मग सगळे काही सोपे होते.
पाल्यावर 'निर्णय लादणं' हे फक्त लग्न किंवा प्रेमविवाह या एकाच बाबतीत घडत नाही. आयुष्यात अनेक गोष्टीत घडत असतं किंवा तसा प्रयत्न चालू असतो. ज्याला स्वातंत्र्य पाहिजे त्याने ते बंधन झुगारुन द्यावे.

माझ्या एका मैत्रिणीचा किस्सा आठवला.
ती वडीलांची अतिशय लाडकी. खरंतर तिनं ठरवलं होतंच की असं काही (म्हणजे प्रेमात पडणं वगैरे) करायचं नाहिच. पण पडलीच प्रेमात. वडील पोलीस नोकरीत (मला वाटत AI होते तेव्हा). त्यांनी तिच्यावर दबाव आणला, बरेच दिवस घरीच डांबलं वगैरे (अगदी तपशिलात माहीत नाही) , या बिनपगारी रजेमुळे तिची नोकरी जाण्याची वेळ आली होती. मग कसंबसं घरी पटवून पुन्हा नोकरीच्या ठिकाणी आली, आधी नोकरी वाचवली. काही महिने गेले मग रजिस्टर लग्न केले. पुढे काही काळाने आई-वडीलांनीही तिला माफ केले आणि शेवट गोड झाला.
या ठिकाणी ती अतिशय ठाम राहिली हे महत्वाचे.

गरिब चिमणा's picture

22 Mar 2016 - 12:48 pm | गरिब चिमणा

मुलगा स्वतंच्या पायावर उभा असेल, स्थिरस्थावर असेल तरच पळुण जाऊन लग्न करावे ,अन्यथा हाल कुत्रेही खात नाही.

अप्पा जोगळेकर's picture

22 Mar 2016 - 1:10 pm | अप्पा जोगळेकर

,अन्यथा हाल कुत्रेही खात नाही
चालायचंच. लग्न झालेल्या प्रत्येक नर/मादी ला असं कधी ना कधीतरी वाटतच.
समर्थांसारखा दूरचा विचार करणारा एखादाच/एखादीच.

अमृता_जोशी's picture

22 Mar 2016 - 1:11 pm | अमृता_जोशी

भारतीयांच्या गंज लागलेल्या मेंदु आणि बुरसटलेले विचार अजुन किती जणांच्या प्रेमाचा बळी घेणार आहे कोणास ठाऊक

तुम्ही भारतीय नाही का?
सांगितलेली परिस्थिती सर्वज्ञात आहे, बदल व्हायला हवा हे मान्यही आहे, पण तो असा अच्चानक कसा घडेल? जरा आजूबाजूला पहा, परिस्थिती बदलली आहे. आंतरजातीय विवाह मान्य करायला थोड्याशा का होईना लोकांनी सुरुवात केली आहे. आजही आंतरजातीय विवाहात खूप अडचणी असतील, पण चाळीस वर्षापूर्वी जितके अवघड होते, तितके नक्कीच नाही.

आंतरजातीय विवाह सर्वमान्य व्हावेत, हा विचार पटण्याजोगा आहे. पण, तो आपणाला काहीसा नवीन आहे, शेकडो वर्षांची जुन्या पिढीने जतन करत आणलेली एखादी गोष्ट मान्य करायला आणि तिच्यात थेट मुलापासून बदल घडायला वेळ लागतोच कि नाही? थोडा वेळ द्या, तुम्हीही प्रयत्न करा, बदल घडल्यावाचून राहणार नाही.

बायदवे, सध्याच्या तरुणांपैकी बऱ्याच जणांना समलिंगी संबंध मान्य नाहीत, तेही गंज लागलेल्या मेंदूचे व बुरसटलेल्या विचारसरणीचे आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

आणि तुमच्या त्या मित्राला सांगा प्रेम केले आहेस तर मागे होऊ नकोस, प्रयत्न करत राहा. आजुबाजूच्यांसाठी एक उदाहरण बन, जेणेकरून निकोप व सहिष्णू अश्या पुढच्या पिढीचा पाय रचला जाइल.

अमृता.

चलत मुसाफिर's picture

22 Mar 2016 - 4:07 pm | चलत मुसाफिर

लग्न तर दूरची गोष्ट झाली!

"प्रखर" हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणाऱ्या, मंदिर वही बनाएंगेचा स्टिकर हौसेने दारावर लावणाऱ्या आणि समान नागरी कायदा हवाच असे ठासून सांगणाऱ्या माझ्या स्व. वडिलांनी, दलित कुटुंबाला मी भाडेकरू म्हणून घेणार नाही असे मला स्पष्ट सांगितले होते.

माझ्यासाठी ते मुली पाहू लागले तेव्हा मी आंतरजातीय लग्नासाठी तयार आहे असे सांगितले. यावर, ती आमची जबाबदारी आहे, भलतीकडे नाक खुपसू नका अशी तंबी मिळाली. (पुढे माझा जातीतच प्रेमविवाह झाला ती गोष्ट वेगळी).

सिरुसेरि's picture

22 Mar 2016 - 5:28 pm | सिरुसेरि

यामागे खाप पंचायत हे एक कारण असु शकते .

तर्राट जोकर's picture

23 Mar 2016 - 2:36 am | तर्राट जोकर

घरच्यांना दुखवुन लग्न न करण्याचा निर्णय दोघांनी घेतला होता. जो कोणत्याही संस्कारी मुलाला आणि मुलीला शोभणारा होता

संस्कारी मुलामुलींची सुटसुटीत व्याख्या आवडली. :(
-(आईवडीलांना फार रडवून जातीबाहेर लग्न केलेला कुसंस्कारी) तर्राट जोकर.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

23 Mar 2016 - 2:49 am | निनाद मुक्काम प...

माझ्या आंतराष्ट्रीय लग्नास माझ्या पालकांचा असलेला पाठिंबा पाहून समाजात खूप जणांना ते आधुनिक विचारसरणीचे वाटू शकतात मात्र मी जर आंतरजातीय विवाह करायचा ठरवला असता तर त्यांनी नक्कीच विरोध केला असता असे माझे प्रामाणिक मत आहे, माझ्या नात्यात आंतरजातीय विवाह झाले तेव्हा बराच मेलोड्रामा झाला.
शहरात काही अपवाद वगळता अजूनही लग्न जातीत होतात , छोट्या गावात किंवा शहरात अजूनही
प्रखर विरोध होतो त्यांचे पर्यावसन अनेकदा ओनर किलिंग मध्ये सुद्धा होते
आंतरजातीय लग्नाला नुसता पाठिंबा देऊन सरकार चे काम होत नाही
माझ्या मते ज्या लोकांना अशी लागणे केल्यावर आपल्या नातलगाच्या किंवा समाजातील लोकांकडून जीवाला धोका वाटतो
अश्या व्यक्तींना परदेशात विटनेस प्रोटेक्शन सारखी सुविधा सरकार ने पुरवली पाहिजे मात्र असा कायदा सध्याच्या परीस्थित कोणतेही सरकार व पक्ष करू शकत नाहीत. काही गोष्टी जनहित याचिका द्वारे कोर्टाकडून सरकार ला सांगण्यात याव्यात

स्वतंत्र असलेल्या मुलांनी वाट्टेल त्याच्याकडे लग्न करावे काय फरक पडतो ? घरची काय म्हणून करणार आहेत ? आपला जोडीदार आपण निवडावा.

धनंजय माने's picture

23 Mar 2016 - 5:24 am | धनंजय माने

तुमच्या मैत्रीणीला घरी कशी परीस्थीती आहे याची कल्पना होती. म्हणजे घरातील लोक आंतरजातीय विवाहास मान्यता देणार नाहीत वगैरे. वर घरच्यांचे मन मोडून लग्न करायचे नाही हेही ठरवले होते. मग हे सर्व तीने प्रेम करताना ध्यानात ठेवायला हवे होते. प्रेम हे जात पाहून होत नाही हे मान्य. तरीही एकदा दोनदा एकमेकांशी बोलल्यावर जातींची माहीती घेउन प्रकरण तीथेच थांबवयास हवे होते.
कीतीही आटापीटा केला तरी लग्न होउ शकत नाही हे माहीत असून फक्त टाइमपास साठी, अनुभव घेण्यासाठी कींवा अन्य काही कारणासाठी प्रकरण पुढे नेले असल्यास सोडून द्या.

आपण जे म्हणता आहात ते एकदम बरोबर आहे. पण अजुनही प्रेम करताना घरी आंतरजातीय विवाह चालेल का? असा प्रश्न कोणीही विचारात नाही. जेव्हा लग्नाचा प्रश्न समोर येतो तेव्हाच आंतरजातीय विवाह चालेल का नाही हे सुद्ध समोर येत.
जस तुम्ही म्हणालात त्या प्रमाणे प्रेम हे जात विचारून होत नाही. तसच ते घरी आंतरजातीय विवाह चालेल का नाही हे विचारून सुद्ध होत नाही

कविता१९७८'s picture

23 Mar 2016 - 6:31 am | कविता१९७८

पळुन लग्न करण्याचा सल्ला मी दिला पण घरच्यांना दुखवुन लग्न न करण्याचा निर्णय दोघांनी घेतला होता. जो कोणत्याही संस्कारी मुलाला आणि मुलीला शोभणारा होता

यालाच सन्स्कार म्हणताय मग आन्तरजातीय व्यक्ति बरोबर प्रेम करताना असले सन्स्कार आठवले नाहीत का?

माझ्या एका ओळखीच्या मुलाने प्रेम तर दुसर्‍या जातीच्या मुलीबरोबर केले होते पण लग्न मात्र आईवडील म्हणाले त्याच मुलीशी केले मग त्यालाही तुम्ही सन्स्कारी म्हणाल म्हणजे एका मुलीला फसवणे असले याला सन्स्कार म्हणता का?

कीती बुरसटलेले विचार आहेत हे.

अन्नू's picture

23 Mar 2016 - 7:35 am | अन्नू

...म्हणजे एका मुलीला फसवणे असले याला सन्स्कार म्हणता का?
अगदी अगदी.
आपल्या घरातले मान्यता देणार नाहीत आणि आपण टीपिकल मुलाप्रमाणे त्यांच्या म्हणण्याच्या बाहेर जाणार नाही, हे माहीत असूनही काही बहाद्दर असे (अवास्तव) प्रेम करताना आणि ते प्रकरण टोकाला नेताना दिसतात. त्यामध्ये मग त्यांना स्वतःचं एंटरटेनमेंट करुन घ्यायचं असतं कि काय कळत नाही!

अत्रुप्त आत्मा's picture

23 Mar 2016 - 7:12 am | अत्रुप्त आत्मा

परिस्थिती प्रत्येकाला सांभाळता येईल, असे नसते. पण माझे मत असे कि जातीयविवाहवाद्यांना अज्जिब्बात जुमानू नये.

(मी याप्रसंगी काही नातेवाईक व माझे धंद्यातले नाकं मु'रडणारे ..अश्याना सरळ फाट्यावर मारलं होत..
मियां बिवी राजी, तो चल हट तू पाजी! )

उडन खटोला's picture

23 Mar 2016 - 9:11 am | उडन खटोला

आता हळूहळू रंग भरायला लागलाय. पोपकोर्न मागवायला हरकत नाही.. माझी काडी टाकेनच लवकर.

उगा काहितरीच's picture

23 Mar 2016 - 9:30 am | उगा काहितरीच

लेखक महाशय कुठे गायबलेत कोण जाणे ? लेखकाशिवाय मजा नाही येत हो.

माझ्यामते प्रेमाला कोणतीच बंधन नसतात. प्रेम जात, धर्म बघुन केल जात नाहीत. ते फक्त समोरचा माणुस आणि त्याचा स्वभाव बघुन केल जात. खर तर होत.
बंधन येतात ती लग्न करताना. नाहीतर लौल-मजनु, हिर-राझ्या सारखी प्रेम युगुल प्रेमात पडूनही प्रेमा पासुन वंचित राहतात.

मी मांडलेला प्रश्न फक्त माझ्या मैत्रीनीचा नाहीये. तश्या अनेक मुलांचा आणि मुलींचा आहे

कविता१९७८'s picture

23 Mar 2016 - 10:51 am | कविता१९७८

आजकाल कुणी जुमानत नाही आणि आईवडीलही मान्यता द्यायला लागलेत फक्त धर्म वेगळा असेल तर विरोध होतो पण मुलगा आणि मुलगी विरोधात जाउन लग्न करतातच.

माझ्यामते प्रेमाला कोणतीच बंधन नसतात. प्रेम जात, धर्म बघुन केल जात नाहीत. ते फक्त समोरचा माणुस आणि त्याचा स्वभाव बघुन केल जात. खर तर होत.
बंधन येतात ती लग्न करताना. नाहीतर लौल-मजनु, हिर-राझ्या सारखी प्रेम युगुल प्रेमात पडूनही प्रेमा पासुन वंचित राहतात.
मी मांडलेला प्रश्न फक्त माझ्या मैत्रीनीचा नाहीये. तश्या अनेक मुलांचा आणि मुलींचा आहे>>>>>>>>>>>>>>१००% सहमत तुमच्याशी निकूंज जी

मला काही वेगळे प्रश्न आहेत. कदाचित ते इथे मांडल्यामुळे मी प्रतिगामी ठरेन, पण ते नाही मांडले तर मला बरे वाटणार नाही..
काही उदाहरणे घेऊ..
१. मुलगा पूर्ण मांसाहारी आणि मुलगी पूर्ण शाकाहारी - हे त्यांना प्रेमापूर्वी माहीत असते, आणि त्याला त्यांची हरकत नसते, पण लग्न झाल्यावर ती संकष्टीचा उपास धरते आणि त्या दिवशी हा जाऊन चिकन घेऊन येतो.. हा अगदी कॉमन scenario आहे, आणि त्याला तुम्ही कसे सामोरे जाता यावर सगळे अवलंबून असते.
२. मुलगा पूर्ण मांसाहारी आणि मुलगी पूर्ण शाकाहारी - पुन्हा तोच प्लॉट आहे - पण फरक इतकाच की मुलीला नॉनव्हेजचा वास पण सहन होत नाही, आणि मुलगा बिचारा बाहेर जाऊन चोरून नॉनव्हेज खातो.
३. प्लॉट ३- मुलगा खालच्या जातीचा आणि मुलगी मराठा (वादासाठी असे लग्न होऊ दिले जाईल असे गृहीत धरू, खरेम्हणजे यात मुलगा स्वर्गातच जाणार) मुलगी जर खरेच खमकी असेल तरच टिकेल, नाहीतर कुटुंबात बरीच कल्चरल गॅप असते.

तर माझा मुद्दा असा - की आंतरजातीय विवाह करताना बर्‍याच गोष्टींचा विचार करणे आवश्यक असते -
१. शाकाहारी/ मांसाहारी असणे
२. कल्चरल गॅप
३. शैक्षणिक गॅप
४. एकत्र कुटुंबासोबत राहण्याची वेळ येण्याची शक्यता.
५. सामाजिक/आर्थिक स्थिती.

या प्रत्येक पातळीवर जर तुम्ही पुरेसा विचार केलेला असेल, तुम्ही आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी असाल, आणि तुमचे वय किमान २२-२३ च्या पुढचे असेल (रेकमंडेड २५), तर माझ्यामते आंतरजातीय विवाह करण्यास हरकत नाही. अजूनही भारतीय समाजात लग्नापूर्वी सेक्स करण्याची पद्धत नाही, अश्या परिस्थितीत अगदी मुलाच्या/ मुलीच्या शरीराला येणारा गंध देखील टर्न ऑफ करणारा फॅक्टर बनू शकतो, आणि तोपर्यंत लग्न होऊन गेलेले असते. मग उरते की केवळ तडजोड.

असो, म्हणून आंतरजातीय विवाह करूच नयेत का? तर तसे नाहीच. पण त्या अनुषंगाने किमान भारतीय समाजाचा भाग म्हणून येणारे वरचे ४ मुद्दे पूर्ण विचारात घेणे आवश्यक आहे. आणि याचा सम्यक विचार करण्याचे वय १८ नाही. एव्हढेच नमूद करू इच्छितो.

अवांतर - मला आंतरजातीय लग्नाचा अनुभव नाही. कदाचित मी प्रतिगामी असेन, पण मी प्रॅक्टिकल आहे.

तर्राट जोकर's picture

23 Mar 2016 - 12:02 pm | तर्राट जोकर

तर माझा मुद्दा असा - की आंतरजातीय विवाह करताना बर्‍याच गोष्टींचा विचार करणे आवश्यक असते -
१. शाकाहारी/ मांसाहारी असणे
२. कल्चरल गॅप
३. शैक्षणिक गॅप
४. एकत्र कुटुंबासोबत राहण्याची वेळ येण्याची शक्यता.
५. सामाजिक/आर्थिक स्थिती.

>> हे सर्व सजातीय विवाहातही आवश्यक असतेच की?

अजूनही भारतीय समाजात लग्नापूर्वी सेक्स करण्याची पद्धत नाही, अश्या परिस्थितीत अगदी मुलाच्या/ मुलीच्या शरीराला येणारा गंध देखील टर्न ऑफ करणारा फॅक्टर बनू शकतो, आणि तोपर्यंत लग्न होऊन गेलेले असते. मग उरते की केवळ तडजोड.

>> सजातीय विवाहात लग्नापूर्वी सेक्स करुन शरीराला येणारा गंध टर्न ऑफ करणारा आहे की नाही ह्यावरुन लग्न ठरवत नसावेत. ;-)

अवांतरः लग्नाचे वय काहीही असू देत. पहिल्या सेक्सचे वय मुलामुलींसाठी १६-१८ असले पाहिजे ह्या मताचा मी आहे.

आनन्दा's picture

23 Mar 2016 - 12:14 pm | आनन्दा

हो, हल्ली सजातीय विवाहात देखील या गोष्टी आवश्यक झाल्या आहेत.. परंतु बर्‍याच अंशी या गोष्टी तुमचे जीन्स, तुमच्या खाण्यात येणार्‍या गोष्टी, आणि त्याअन्वये शरीरात वाढणारे सूक्ष्मजीव ठरवतात, त्यामुळे सजातीय विवाहांमध्ये या गोष्टी फेल जाण्याचे प्रमाण कमी असते. अर्थातच जातीजातींमधील कल्चरल गॅप जशी भरत जाईल तसे हे घटक कालबाह्य होत जातील हे पण खरेच.

बाकी याच्याशी सहमत

अवांतरः लग्नाचे वय काहीही असू देत. पहिल्या सेक्सचे वय मुलामुलींसाठी १६-१८ असले पाहिजे ह्या मताचा मी आहे.

परंतु मध्यंतरी मला कोणीतरी सांगितले की पौगंडावस्थेतील मुलांमध्ये आत्महत्या करण्याचे हे देखील कारण आहे - कारण त्या वयात सेक्सही झालयावर मुलांना आता आणखी मिळवण्यासारखे काही उरतच नाही. (अर्थात हे माझे मत नाही, कारण माझे या विषयावर वाचन नाही. व्यक्तिश: मी तुमच्याशी सहमत आहे.)

तर्राट जोकर's picture

23 Mar 2016 - 12:33 pm | तर्राट जोकर

पौगंडावस्था म्हणजे १२-१६. ज्याकाळात मुला-मुलींना शरिरात होणारे बदल जाणवू लागतात. त्याकाळात सेक्स नकोच. योग्य वेळ तीच जेव्हा शरीर, मन आणि उर्जा पूर्णपणे तयार होते. योग्य शिक्षण आणि काळजी घेतली तर हे सहज शक्य आहे.

बाकी आणखी काही मिळवण्यासार्खे उरत नाही हे तद्दन संस्कृती वाचवायला निघालेल्या आजोबांनी म्हटलेलं वाटते, ;-)

नाही, हे एका बर्‍यापैकी लिबरल माणसाकडून ऐकलेय मी. जो स्वतः सायकॉलोजी चा अभ्यास करतो. नाहीतर त्या मताला एव्हढे महत्व दिले नसते. फक्त त्याने मला विदा दिलेला नाही म्हणून मी विश्वास ठेवू शकत नाही.

तर्राट जोकर's picture

23 Mar 2016 - 1:13 pm | तर्राट जोकर

ओके. वैद्यकिय जाणकारांकडून माहितीची शहानिशा झालेली बरी.

उगा काहितरीच's picture

23 Mar 2016 - 12:58 pm | उगा काहितरीच

अवांतरः लग्नाचे वय काहीही असू देत. पहिल्या सेक्सचे वय मुलामुलींसाठी १६-१८ असले पाहिजे ह्या मताचा मी आहे.

कमीत कमी १०० प्रतिसादाचे पोटेन्शीयल असलेली प्रतिक्रिया ... ;-)

मराठी कथालेखक's picture

23 Mar 2016 - 2:42 pm | मराठी कथालेखक

लग्नाचे वय काहीही असू देत. पहिल्या सेक्सचे वय मुलामुलींसाठी १६-१८ असले पाहिजे ह्या मताचा मी आहे.

+१ , पण

असले पाहिजे

ऐवजी "असायला हरकत नाही" असे म्हणणे अधिक योग्य ठरेल, म्हणजे कुणाला नको असेल तशी काही खास इच्छा निर्माण झाली नसेल तर उगाच "असले पाहिजे" चे दडपण नको ना

तर्राट जोकर's picture

23 Mar 2016 - 3:11 pm | तर्राट जोकर

ओ. सॉरी. विसरलो. माझ्या प्रतिसादांमधे कायदेशीर भाषा व योग्य ते खुलासे असायलाच हवे. अन्यथा कायदेमंडळात गोंधळ व्हायचा आणि माझ्या प्रतिसादांवर आधारित कायदे करतांना नको त्या तृटी राहून जायच्या. =))
(ह.घ्या.)

मराठी कथालेखक's picture

23 Mar 2016 - 3:36 pm | मराठी कथालेखक

:)
तुमच्या प्रतिसादातल्या त्रुटी काढायच्या नाहीत , पण मला इतकेच म्हणायचे होते की ज्याची ओपनिंग १६-१८ या वयात होणार नाही त्याला/तिला न्यूनगंड येवू नये नाहितर या टोकापासून त्या टोकाला असा आपला सामाजिक प्रवास होईल.

तर्राट जोकर's picture

23 Mar 2016 - 3:42 pm | तर्राट जोकर

आदिवासी जमातींमधले ह्याबद्दलचे वर्तन अभ्यासले तर लक्षात येईल. आताच्या सामाजिक व्यवस्थेत होणारा शारीरीक-भावनिक कोंडमारा ज्या प्रमाणात आहे त्या प्रमाणात तर तो न्युनगंड नसेल तेव्हा काळजी नसावी असे वाटते. प्रगत व खुल्या विचारांच्या देशांमधे पहिल्या सेक्सचं सरासरी वय आनि त्यांच्याकडे ह्या न्युनगंडाच्या केसेस ह्यांची काय परिस्थिती आहे हे तिथे राहणारे मिपाकर आपल्या निरिक्षणाद्वारे सांगू शकतात.

तर्राट जोकर's picture

23 Mar 2016 - 3:46 pm | तर्राट जोकर

बाकी, ज्याला इच्छा नाही त्याला बळजबरी नाही. पण ज्याला इच्छा आहे त्याची इच्छा दमन होऊ नये कुठल्याच परिस्थितीत.

तर्राट जोकर's picture

23 Mar 2016 - 3:50 pm | तर्राट जोकर

देशांनुसार सरासरी वयाची माहिती. http://chartsbin.com/view/xxj

Country name Average age at first sex Year
Malaysia 23 2007
India 22.9 2007
Singapore 22.8 2007
China 22.1 2007
Thailand 20.5 2007
Hong Kong 20.2 2007
Vietnam 19.7 2005
Nigeria 19.7 2007
Japan 19.4 2007
Spain 19.2 2007
Indonesia 19.1 2005
Poland 19 2007
Italy 18.9 2007
Taiwan 18.9 2005
Russia 18.7 2007
Mexico 18.7 2007
South Africa 18.7 2007
France 18.5 2007
United Kingdom 18.3 2007
Switzerland 18.2 2007
Canada 18.1 2007
Netherlands 18.1 2007
Greece 18.1 2007
United States 18 2005
Australia 17.9 2007
Turkey 17.8 2005
New Zealand 17.8 2007
Slovakia 17.8 2005
Germany 17.6 2007
Brazil 17.4 2007
Ireland 17.3 2005
Croatia 17.3 2005
Austria 17.3 2007
Czech Republic 17.2 2005
Chile 17.2 2005
Belgium 17.2 2005
Portugal 16.9 2005
Bulgaria 16.9 2005
Israel 16.7 2005
Finland 16.5 2005
Norway 16.5 2005
Sweden 16.2 2005
Denmark 16.1 2005
Iceland 15.6 2005

हिंदू संघटनांनी याबद्दल समाजजागृती करावी. तमिळनाडूचे (आजच्या भाषेत बहुजन!) नेते पेरियार हे फक्त आंतरजातीय विवाहांना जात असत असे कुठेतरी वाचले आहे. विहिंप, संघ यासारख्या प्रबळ संघटनांना हा पायंडा भारतभर पाडता येणार नाही का?

मंगल कार्यालयांनी "दोन्ही पालकांच्या संमतीने होणाऱ्या आंतरजातीय विवाहांसाठी अमुक इतकी सूट" अशा योजना सुरू कराव्यात.

तर्राट जोकर's picture

23 Mar 2016 - 2:42 pm | तर्राट जोकर

विहिंप, संघ यासारख्या प्रबळ संघटनांना हा पायंडा भारतभर पाडता येणार नाही का? >> खिक् =))

राजेंद्र मेहेंदळे's picture

23 Mar 2016 - 3:08 pm | राजेंद्र मेहेंदळे

माझ्या नात्यातल्या एका बहिणीने २५ वर्षा पुर्वी आंतरजातीय प्रेम विवाह केला. तेव्हा प्रेम विवाह आणि तोही आंतरजातीय (मराठी/ तामिळ) दुर्मिळ होते. पण सर्वप्रथम माझी ७० वर्षांची आजी तयार झाली आणि ठामपणे म्हणाली की जर मुलगा शिकलेला आहे,स्वतःच्या पायावर उभा आहे आणि तिला आवडलाय तर लग्न करुन द्या.
उद्या जर मुलगी पळुन वगैरे गेली तर तुमचीच छी थु होइल. शेवटी घरचे तयार झाले आणि लग्न लावुन दिले.
कहाणी इथेच संपत नाही. पुढे माझ्या बहिणीने अथक मेहनत करुन तामिळ भाषा शिकुन घेतली, सगळ्या चालीरिती शिकुन घेतल्या आणि एकिकडे नोकरी करता करता त्या सांभाळल्याही. तिच्या नवर्‍यानेही तिला चांगली साथ दिली.
पुढे तिला मुले झाली आणि मग सगळीकडे आनंदी आनंद झाला.
पण एव्हढी मेहनत घ्यायची आजकाल कोणाची तयारी असेल का? आधीच लग्न म्हणजे तारेवरची कसरत, त्यात नुसते कोकणस्थ/देशस्थ किंवा कर्हाडे असेल तरी "आमच्याकडे असे असते" किंवा "नसते" असे संवाद झडतात आणि त्यातुन रोजच्या ठिणग्या पडत असतात. कटुता तर येतेच पण कधी कधी त्या ठिणग्यांचा वणवा होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.आणि मग त्या वणव्यात सुखी संसाराची आहुती पडते किंवा मग नवराबायको सोडुन ईतर नात्यांची विल्हेवाट लागते.
आता ह्या कठीण समीकरणात "आंतरजातीय" हा अजुन एक फॅक्टर घातला की त्याची गुंतागुंत अजुन वाढते.
तेव्हा आंतरजातीय विवाह करताना जोडप्याने आणि त्यांच्या कुटुंबियांनी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केलाय का हे महत्वाचे.

मराठी कथालेखक's picture

23 Mar 2016 - 3:10 pm | मराठी कथालेखक

हा केवळ आई वडिलांचा प्रश्न नसतो. यात कौटुंबिक/सामजिक गुंतागुंत असते म्हणजे एखादे वडील अनेकदा असा विचार करतात की
"मी माझ्या मुलाला/मुलीला आंतरजातीय लग्नाला परवानगी /पाठिंबा देईनही पण मग मला माझे इतर नातेवाईक खास करुन आई-वडील, मोठी भावंडे, काका-मामा ई काय म्हणतील, या आधी घरात असे कुणी केलेले नाही"
किंवा "काही वर्षापुर्वी अमक्या तमक्या नातेवाईकास आंजा विवाह करायचा होता, पण सगळ्यांनी विरोध केला, मीही पाठिशी उभा राहिलो नाही आता मी माझ्या मुला/मुलीला परवानगी दिल्यास वाईट दिसेल"
ई. ई.
याउलट घरात आधी कुणी आंजा विवाह केला असेल तर इतरांचाही मार्ग सुकर होतो.
उदा: माझा आंजा (आणि आंतर्धर्मीयसुद्धा) विवाह झाला आहे (प्रेमविवाह नसून , पाहून केलेली मुलगी) . मी एका संख्येने कमी असलेल्या समाजातून आहे, त्यामुळे निवडीला फारसा वाव नाही आणि मी काही निकषांवर ठाम (शिक्षण, करियर ई) असल्याने पालकांनी मला समजून घेतले इतकेच नव्हे तर त्यांनीही वृत्तपत्रातील जाहिराती वगैरेच्या माध्यमातून काही आंजा /आंध स्थळे पाहिलीत.
पुढे माझ्यापेक्षा लहान अशा एका भावाल विवाहात अडचणी येत होत्या (शिक्षण , मिळकत कमी असल्याने फारशी स्थळे येत नव्हती) सुरुवातीला त्याचे वडील आंजा विवाहास तयार नव्हते, पण नंतर नातेवाईकांनी सुचवले, समोर माझ्या लग्नाचेही उदाहरण होते (लग्नानंतर लवकरच माझी पत्नी माझ्या नातेवाईकांच्या कौतुकास पात्र ठरली) यामुळे ते तयार झाले आणि त्या भावाचे (अ‍ॅरेंज्ड/स्थळ पाहून) आंजा लग्न झाले.

नाखु's picture

23 Mar 2016 - 3:25 pm | नाखु

या विषयाचा काथ्याकुट आणि चर्चाचोथ्या पाहिला तर एखादे बखरीवजा साहीत्य तयार होईल . पोपशास्त्री+चिनार यांनी हे संकलन करावे म्हण्जे "गरजू,लाभार्थी,होतकरू" ची सोय होउन सगळी माहीती या "रियासतीत" मिळतील.

अ‍ॅरेंज की लव्ह पे़क्षा सुखी आणि समाधान्सहजीवनी लग्नाला पाठींबा असलेला नाखु