जिभाऊ
जिभाऊ
जिभाऊ
तमिझ्(तमिळ)ही जगातल्या सर्वात प्रसिध्द अशा भाषांपैकी एक! सर्वात शुध्द द्रविड भाषा! म्हणूनच अन्य भारतीय भाषांच्या तुलनेत थोडीशी अवघड!
कामानिमित्य,प्रवासानिमित्य किंवा एक वेगळी भाषा म्हणून म्हणा,किंवा तमिळ चित्रपट,तमिळ संस्कृती यांची आवड,कुतुहल म्हणून म्हणा 'तमिळ' शिकावीशी वाटते.
अशा तमिळ शिकणार्यांसाठी एक WhatsApp समुह सुरु करत आहोत.
‘टबुडी टबुडी’ चाच (http://www.misalpav.com/node/26051) हा पुढचा भाग आहे असे समजावे, म्हणजे पुन्हा सर्व पात्रांची ओळख करुन द्यायची आवश्यकता नाही.
कमाल आहे बुआ आपल्या भारतीय मानसिकतेची...
ब्रिटीशांनी स्वार्थासाठी बांधलेले इमले आज World Heritage म्हणून मिरवत आहेत..
आणि माझ्या शिवबाने रयतेच्या कल्यानासाठी बांधलेले गडकील्ले मात्र अंधार कोठडिचे जीवन जगत आहे..
बहुदा यालाच भारतीय अस्मिता म्हणत असतील राव.....
भरली होती एकदा 'Social Networking' ची सभा
Twitter होता मध्यस्थानी, Facebook सोबत उभा..
चढ़ाओढ़ होती लागली, कोण Social Networking चा राजा
Google Plus आणि Ibibo करत होते प्रसिद्धीसाठी गाजा - वाजा..
Orkut म्हणाले Facebook ला , तुझ्यामुळे गेली माझी खुर्ची
Facebook च्या आगमनाने Orkut ला भलतीच लागली होती मिरची..
Linked IN म्हणाले आहे मी 'Professional', मलाच करा 'King'
सगळे म्हणाले, "Timepass" की बात करो तो "LINKED IN is Nothing " ..
Whatsapp म्हणाले गर्वाने, करतात मला सगळे Like
काय माहित,देव जाणे, रूसून कोपऱ्यात का बसले Hike..
द मेन्सट्रुअल मॅन, वाचून थोडे दचकलात ना? पण मी आज एका अश्या माणसाची गोष्ट सांगत आहे ज्याला अख्खं जग याच नावाने ओळखायला लागलंय त्याचं खरं नाव आहे अरुणाचलम मुरुगनाथम . आणि विशेष म्हणजे हा माणूस आपल्याच भारतातला आहे. चारचौघातला, पण त्याचं काम एवढं जबरदस्त आहे कि त अनेकांसाठी प्रेरणास्थान बनलाय.
आमच्या क्लासमेट्स फाउन्डेशन ची मूळ प्रेरणाच तो आणि त्याचे कार्य आहे.
मी निरीश्वरवादी माणूस आहे. माझा देवावर विश्वास नाही. देवावर विश्वास नसण्याचं कारण काही सिनेमांत दाखवलं जातं तसं (अष्टविनायक, देऊळ बंद) देवावरच्या रागापोटी नाही, तर देव असल्याचा, मला स्वत:ला पटेल असा शास्त्रसिद्ध पुरावा उपलब्ध नाही म्हणून. देवाचं अस्तित्व असू शकतं, या थिअरीला (सिंद्धांताला) मान द्यायला माझी ना नाही. उद्या मानवजातीला काही पुरावा गवसलाच, तर मी आनंदाने (म्हणजे नाईलाजानेच, पण पद्धत आहे बोलण्याची) माझी मतं बदलेन. पण निरीश्वरवाद्यांमध्ये सुद्धा एकवाच्यता नसते, हे मला जाणवायला काही काळ गेला. आज परिस्थिती अशी उद्भवली आहे, की बहुतेक निरीश्वरवादी माझ्या डोक्यात जाऊ लागले आहेत.
मी या आधीच माझं वय व माझी पार्श्वभुमी आंतरजालावर सांगुन झालेली आहे.मी अविवाहीत आहे.सध्या एका to be or not to be प्रकरणात अडकलो आहे.
डिस्क्लेमरः- वर्षभरापेक्षा जास्त कालावधी नंतर आज ह्या लेखमालेच्या पुढच्या भागाच्या लेखनाचा मुहुर्त लागला आहे . त्यामुळे अगदी नवीन वाचणार्यांना सगळे संदर्भ लागतीलच असे नाही.यासाठी क्षमस्व.परंतू सदर भागापासून या लेखमालेनीही मनातल्या मनात थोडा सांधेबदल केलेला आहे.त्यामुळे हे लेखन मागील संदर्भांशिवायंही सर्ववाचकांना आवडेल अशी आशा धरून पुनः एकवार सुरवात करतो आहे. चुकभूल द्यावी घ्यावी. __/\__
निराकार, निर्विकार, अनासक्त आणि एकूणच सांगायचं झाल तर अनामिक असा मी एक नदीपात्रातील गोटा. तसा मुळात मी घाटी पण सह्याद्री, मंद्राद्री, निलगिरी नि सातपुडा वगैरे कौतुक आमच्या नशिबात अपवादानेच सापडतील. महाराष्ट्राच्या हृदयस्थानी असणाऱ्या मराठवाड्याच्या मध्यबिंदूशी माझी मुळ अजून घट्ट रुजलेली आहेत. माझ्या नाळेशी जोडून असणारा विशाल पाषाण समूह पहिला कि मला मी सर्व व्यापी वगैरे असल्याचा भास होत असे पण, माझ्या मुळ पाषाणाने मला स्वप्नांच्या मागे जाण्याच पाठबळ जरा जबरदस्तीनेच दिल आणि मी या प्रवाहात पडलो.