एक वादळी जीवन: ओशो!
एक वादळी जीवन: ओशो!
सर्व मान्यवरांना नमस्कार! हा लेख उघडल्याबद्दल धन्यवाद. नुकतीच ओशोंची पुण्यतिथी झाली, त्या निमित्ताने लिहिलेला लेख आपल्यासोबत शेअर करत आहे. मी ओशोंवर पूर्वी लिहिलेला लेख इथे वाचता येईल.
एक वादळी जीवन: ओशो!
सर्व मान्यवरांना नमस्कार! हा लेख उघडल्याबद्दल धन्यवाद. नुकतीच ओशोंची पुण्यतिथी झाली, त्या निमित्ताने लिहिलेला लेख आपल्यासोबत शेअर करत आहे. मी ओशोंवर पूर्वी लिहिलेला लेख इथे वाचता येईल.
गावगाड्यात हरवलेला चेहरा: नारायणमामा
महाराष्ट्र हा प्राचीन काळापासून एक समृद्ध, प्रगतीशील आणि पराक्रमी देश आहे, हे त्रिकाळ अबाधित सत्य आहे. प्राचीन काळी हा प्रांत ऋषीमुनींचे आणि महारथींचे दंडकारण्य म्हणून ओळखला जायचा. भक्ती आणि शक्तीचा सुरेख संगम हे येथील राष्ट्रीकांचे वैशिष्ट्य राहिले आहे. अगदी कला, स्थापत्य आणि निसर्गसौंदर्य हे देखील या भूमीला वरदान ठरले आहेत. अजिंठावेरुळचे स्थापत्य तर जगाला भुरळ घालत आहेत. लोणारचे खारयुक्त सरोवर हे खगोलतज्ञ आणि वैज्ञानिक यांचे आवडते ठिकाण.
चला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आणि छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला पुन्हा आठवले!
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावामध्ये महाराज जोडून ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्यात येणार आहे. छत्रपतींचा यथोचित मान राखणे चांगले आहे.
पण मुळात, ज्या क्षेत्राचा छत्रपती शिवाजी महाराजांशी काही संबंधच नाही, त्याला त्या राजर्षीचे नाव देण्यात रम्यत्व काय? जे महाराजांशी अंतस्थ निगडित आहेत, ते छत्रपतींचे गडकिल्ले ढासळत आहेत, त्याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाही.
खाs वोरा पुथा चाओ,
आव मनो लय सिरा क्रान,
नोप फ्रा फुमि बान बुन्यडीरेक.
"थाई रॉयल अँथम" च्या ह्या सुरवातीच्या ओळी. या ओळींचा अर्थ असा होतो कि "हे महान राजा आम्ही तुझे नोकर/सेवक आहोत, आम्ही झुकून, मनापासून आदरपूर्वक तुला आणि तुझ्यातल्या अमर्याद गुणवत्तेला नमन करतो". अँथममधे पुढे बरंच काही चक्री साम्राज्याच्या स्तुतीपर लिहिलं गेलेले आहे. थाई राष्ट्रगीत रोज सकाळी ८ आणि संध्याकाळी ६ वाजता प्रसारित होते तर वरील "रॉयल अँथम" सिनेमागृहांत, सार्वजनिक कार्यक्रमांच्या सुरवातीला आणि खेळ सुरु होण्यापूर्वी म्हटली जाते.
समाजाचं वास्तव झपाट्याने बदलत आहे. काही बदल टाळता येत नाहीत, हे मान्य. ते राजकीय असोत की आर्थिक, सांस्कृतिक; त्यांना मर्यादांची सीमा असावीच लागते. माणसाचे बंधमुक्त जगणे सीमित अर्थाने आवश्यकच; पण सर्वबाजूंनी बंदिस्त जगणं कसे समर्थनीय असेल? जागतिकीकरण, संगणक, मोबाईल, माहितीचे मायाजाल जगाच्या सीमा आणखी लहान करीत आहे; पण त्यामुळे संवादाचे सेतू उभे राहण्याऐवजी संकुचितपणाच्या भक्कम भिंती बांधल्या जातायेत. आत्मकेंद्रित अभिमान वाढतो आहे. येथेही समान विचारांचे अनुसरण करणाऱ्यांचे कळप तयार होतात. ते दुसऱ्या कळपाच्या भूमिकांना तपासून पाहतात, नाहीतर नाकारतात. आणि दुसरे पहिल्यांच्या भूमिका झिडकारतात. यात मजा अशी की, यातल्या प्रत्येकाला आपणच समाजशील, प्रयोगशील, प्रगत वगैरे असल्याचे प्रत्यंतर येत असते. विज्ञानतंत्रज्ञानाने माणसांना समानस्तरावर आणून उभे केले आहे. विज्ञानतंत्रज्ञानात कोणताही आपपर भाव नसतो. पण वापरणाऱ्यांच्या विचारांमध्ये तो नसेल कशावरून? बऱ्याचदा अभिनिवेशाने वागणारे एकतर समर्थनाच्या तुताऱ्या फुंकतात किंवा विरोधाचे नगारे बडवत असतात. माध्यमांमध्ये सहज संचार करणे सर्वांसाठी सुलभ असले, तरी समाजात सगळ्यांचा वकुब तेवढा असतो का? नाहीच, कारण अद्यापही ज्या समाजाची रचना विषमतामूलक पायावर उभी असेल, तेथे समानता स्थापित करणे सहज, सुगम कधीच नसते. म्हणूनच समाजात समानता किती आली आहे, या प्रश्नाचं उत्तर सहज हाती लागणं अवघड असतं.
" प्रकट व्हा, अभिव्यक्त व्हा !! "
ट्विटर हे एक जागतिक व्यासपीठ आहे.ह्या व्यासपीठावर रोज करोडो लोक आपले मत आपल्या भाषेत नोंदवत असतात.एकेकाळी फक्त इंग्रजी भाषेचा बोलबाला असणारे ट्विटर आज जगातील प्रत्येक लिपी असणारी भाषा सामावून घेत आहे.मग अशा ह्या ट्विटरवर मराठीचे अस्तित्व किती आहे ? असा तुम्हाला प्रश्न पडेल.सध्या मराठीचे ट्विटरविश्व जरी उगमावस्थेत असले तरी त्याचे भविष्य उज्जवल आहे. मराठीचे ट्विटरविश्व अधिकाधिक फुलावे आणी मराठीत रोज एक लक्ष ट्विट्स लिहल्या जाव्यात ह्या ध्येयातूनच #ट्विटरसंमेलन ह्या कल्पनेचा जन्म झाला.
चित्र श्री संदीप डांगे यांजकडून साभार
रागाची ती उचल काय, दगड!
विचारांची मजल काय, दगड!
जात पात वजा भाग गणित
गणिताची उकल काय, दगड!
अभेद्य त्यांच्या आयुष्याची शिल्पं
पुतळे तोडून तुटंल काय, दगड!
देऊळ म्हणून आत गेलो बघत
गर्दीपुढे अचल काय, दगड!
बळावलेला ज्वर आहे, जबर
औषधानं निघंल काय, दगड!
स्त्री-पुरुष मैत्री हा विषय अनेकदा अनेक स्तरांवार चर्चेत आला आहे. वाद-विवाद, चर्चा, मत-मतांतर अनेकदा वाचनात आली आहेत. त्यातलाच एक लेख नुकताच वाचनात आला. विषय काहीसा स्त्री-पुरुष मैत्री आणि पुरुषांना समाजाने मान्य केलेली मोकळीक आणि स्त्रियांना दिली जाणारी म्हणा किंवा स्त्रियांनी घेतलेली 'मोकळीक' याविषयी स्त्रियांबद्दलचा समाजाचा दृष्टीकोन. असा काहीसा होता. त्यात अस म्हंटल होत की स्त्रियांनी पुस्तकांवर लिहावं, समाजातल्या, धर्मातल्या, राजकारणातल्या समस्यांना हात घालावा पण यात जिथे जिथे सेक्स आहे तिथे बाईने हात घालू नये.
एटीयमचिये द्वारी। उभा क्षणभरी।
तेणे पाचशेच्या चारी। मिळतीया।।
कार्ड चार हाती। स्लॉटमधे घासी।
निकडीची रोकड मग। निघतीया।।
रांगेत बहु जन। स्वतःचेच धन।
घामेजलेले तन। ताटकळ्या।।
ब्यांकेतही तेच। होई खेचाखेच।
शिव्या कचाकच। निघतीया।।
ऐसे शूराभिमानी। न देखिले कोणी।
तयांसी देशाभिमानी। म्हणतीया।।
एकच दिला धक्का। गुर्जर तो पक्का।
'मित्रों' ऐसी हाक। मारतोया।।
सुका म्हणे बास। किती रोखावे श्वास।
काय ३१ डिसेंबरास। करतोया???
- भारी समर्थ!