समाज

एक संध्याकाळ..

दिपक लोखंडे's picture
दिपक लोखंडे in जनातलं, मनातलं
6 Sep 2017 - 10:22 am

" अहो ऐकताय ना?.."
" नाही.. कानात तेल ओतलयं मी.."
" काय ओ, कधीतरी प्रेमाने बोलत जावा माझ्याशी.."
" अगं आज खूप कंटाळा आलाय.. मी एक झोप काढू का?"
" ओ.. झोपताय काय?.. आज काय आहे माहीत आहे ना?"
" काय आहे?..."
" अहो, ती मागच्या गल्लीतली कविता आहे ना, आज तिच्या बहिणीचा साखरपुडा आहे.."
" मग?.."
" मग काय?.. चला ना जाऊया आपण पण.."
" छ्छे... काय गं... कोण कविता आणि कोणाची बहीण?.. मला कंटाळ येतो बाई ह्या सगळ्याचा.."
" काय ओ, सगळ्या बाया वाट बघतील ना माझी.."
" बरं मग, तू जाऊन ये "
" मी एकटी नाही जाणार.."

कलासंगीतकथाकविताप्रेमकाव्यभाषाप्रतिशब्दशब्दार्थविनोदसमाजजीवनमानअनुभववादभाषांतर

बोलशील तर मरशील...

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
6 Sep 2017 - 12:54 am

बंदुकीची गोळी कशी गोल गोल
गोल गोल
रक्ताचा रंग कसा लाल लाल
लाल लाल
सोनू, तू माझ्याशी नीट बोल
नीट बोल....

पैशाचा झोल कसा गोल गोल
गोल गोल
सत्तेचा माज कसा खोल खोल
खोल खोल
सोनू, तू माझ्याशी नीट बोल
नीट बोल..

सोनूची केस कशी वायलंट वायलंट
सोनूचा आवाज कसा सायलंट सायलंट
सोनू, बोलशील तर मरशील
मरशील.....

सोssssनूssss

शिवकन्या
#GauriLankesh etc....

gholअनर्थशास्त्रआता मला वाटते भितीइशाराधोरणवावरविडंबनसमाज

यांगोंमधलं श्री. मोदी यांचं भाषण : भाग १

आतिवास's picture
आतिवास in जनातलं, मनातलं
5 Sep 2017 - 2:30 pm

जून २०१६ मध्ये मी यांगोंला आले. तेव्हापासून दोन वेळा इथल्या भारतीय दूतावासात जाणं झालं. २०१६ चा स्वातंत्र्यदिन समारंभ आणि २०१७ चा प्रजासत्ताक दिन समारंभ या निमित्ताने जाणं झालं होतं. बाकी तसा माझा दूतावासाशी काही संबंध येत नाही. दूतावासाला फेसबुकवर ‘लाईक’ केलं होतं, त्यामुळे घडामोडी कळत राहतात.

ऑगस्टच्या दुस-या आठवड्यात कधीतरी ‘पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी म्यानमा भेटीवर येत आहेत आणि यांगोंमध्ये ते जनतेशी संवाद साधतील’ असं फेसबुकवर कळलं. ‘अधिक माहितीसाठी दूतावासाशी संपर्क साधावा’ असंही एक आवाहन जाहीर झालं. मग मी दूतावासाशी संपर्क साधला.

समाजअनुभव

आली गौराई अंगणी

इरसाल कार्टं's picture
इरसाल कार्टं in जनातलं, मनातलं
30 Aug 2017 - 8:18 pm

नमस्कार मंडळी,
या चतुर्थीपासून उभ्या महाराष्ट्रात वातावरण कसे गणेशमय झालाय ना, आता कालपासून त्यात भर पडलीय गौरींची. पण तुम्ही एक गोष्ट अनुभवलीत का? आपला लाडका बाप्पा महाराष्ट्रभर घरोघरी येत नसला तरी त्याचे लाड आणि साजशृंगार मगाराष्ट्राभर जवळ जवळ जवळ जवळ सारखेच केले जातात. पण माहेरवाशीण बनून येणारी गौरीचं तसं नाहीये, ती घरोघरी येते आणि तिचं कोडकौतुक मात्र वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. तिचं स्वरूपही वेगवेगळं असतं. म्हणून म्हटलं चला तुम्हाला आमच्या साध्या भोळ्या गौराईची ओळख करून द्यावी.

मांडणीकलासमाजजीवनमानअनुभव

स्वातंत्र्य लढा २.०

उमेश धर्मट्टी's picture
उमेश धर्मट्टी in जनातलं, मनातलं
29 Aug 2017 - 5:23 pm

चला झाला स्वातंत्र्यदिन!! जोडून आलेल्या सुट्या पण संपल्या. देशभक्तीचा पूर आता ओसराला असेल आणि सगळं कसं पूर्ववत होऊन जाईल. सगळया थोरामोठ्यांचा तसबिरीवरच्या फुलांच निर्माल्य विसर्जन त्याच्या विचारसहित करून पुढच्या स्वातंत्र्यदिनाची वाट बघू या.

समाजविचार

लिंगायत समाज हिंदू धर्मा पासून वेगळा होऊ इच्छितो. पण का ?

साहना's picture
साहना in जनातलं, मनातलं
23 Aug 2017 - 2:22 pm

लिंगायत समाजाने आपणाला वेगळा धर्म अशी ओळख मिळावी अशी मागणी केली आहे. भारताच्या इतिहासात हि काही पहिली घटना नव्हे, ह्या आधी रामकृष्ण मिशन ने तीच मागणी केली होती. येत्या काही वर्षांत हि मागणी इतर अनेक पंथ करतील ह्यांत काहीही शंका नाही. वीरशैव लोकांनी सुद्धा हि मागणी करायला सुरुवात केली आहे.

समाजविचार

आबा (क्रमश)

शेवटचा डाव's picture
शेवटचा डाव in जनातलं, मनातलं
22 Aug 2017 - 8:01 pm

आतापर्यंत 'आबाा' यांंचावर बरच लिहल गेलय पण हे जरा वेगळ आहे चार भाग लिहतोय
त्यातील भाग एक
तिन्ही बंगल्यांच्या म्होर वावरात आबा बशेल व्हता
मन भरुन बंगले पाता पाता आबाला हुंदका आला आन आबान माग वळुन पाह्यल तसा आबा भूतकाळाच्या गर्द झाडीत शिरला
      "दादा य दादा"
दिगु न त्याच्या मोठ्या भावाला हाक मारलि
" काय झालर दिग्या "
विहरी जवळ गेलेल्या पुरुषोत्तम दादा ने वो देत प्रश्न केला
"आर पंकु बेसुध झालीय अन आबा अन भागु तिला दामुनानाच्या  बैलगाडी त घेऊन वैद कड नेताल "
 दादान सायकला टांग मारली अन तडक वैद्या कड गेला

कथामुक्तकसमाजजीवनमानव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणविचारसमीक्षालेख

संस्कृती vs अंधश्रद्धा

योगेश कोयले's picture
योगेश कोयले in जनातलं, मनातलं
22 Aug 2017 - 1:48 pm

हे माझ्या मनातील द्वंद्व आहे काही दिवसांपासून..
शीर्षक कदाचित साजेसं नाही (मी स्पर्धापरीक्षांचा अभ्यास करणारा विध्यार्थी आहे लेखनाबाबत अजूनतरी प्रगल्भता आलेली नाही) परंतु जे मला सांगायचं आहे त्यासाठी तेच बरोबर वाटतं!
झालं असं आहे की या आठवड्यात गणपती येतायत सगळी कडे लगबग सुरू आहे..
घरी असतो आमच्या गणपती..
सुरुवात मीच केली आहे त्याची किंवा माझाच हट्ट होता त्यासाठी काही वर्षांपुर्वी..
त्यामुळे तयारीही माझ्याचकडे असायची..
साफ सफाई, सजावट सगळंच..

समाजविचारप्रश्नोत्तरे