स्वातंत्र्य लढा २.०

उमेश धर्मट्टी's picture
उमेश धर्मट्टी in जनातलं, मनातलं
29 Aug 2017 - 5:23 pm

चला झाला स्वातंत्र्यदिन!! जोडून आलेल्या सुट्या पण संपल्या. देशभक्तीचा पूर आता ओसराला असेल आणि सगळं कसं पूर्ववत होऊन जाईल. सगळया थोरामोठ्यांचा तसबिरीवरच्या फुलांच निर्माल्य विसर्जन त्याच्या विचारसहित करून पुढच्या स्वातंत्र्यदिनाची वाट बघू या.
७० वर्षाचा झाला आपला देश आणि आता पंचाहत्तारीकडे वाटचाल. एका मनुष्याच्या आयुष्यात हा एक आयुष्याचा उतरणीचा काळ असतो, पण देशासाठी तेही आपल्या देशात जेथे तरुणाची संख्या प्रचंड आहे, तो देश म्हातारा न होता तारुण्याने सळसळत असतो. इथून पुढचा काळ आहे आपला आहे, जगात आपण आपला ठसा उमटवू शकतो आणि महासत्ता होऊ शकतो. हे आपण सर्वांचा स्वप्न आहे, मनीषा आहे आणि त्या द्रुष्टीने पाऊले पण उचलली जात आहेत. मग त्यात अडचण ती काय आणि मी काय करावं अशी अपेक्षा आहे?
आपण थोडे असहीश्णु होऊ या. Famous / infamous word called Intollerance.
आपल्या आजूबाजूला आपण अनेक गोष्टी अश्या बघतो कि ज्यामुळे आपल्या तळपायाची आग मस्तकात जाते, मन उदास होतं. उदाहरण द्यायची झाली तर अनेक आहेत आणि आपल्या सगळ्यांना माहित आहेत..पण वानगीदाखल काही अशी
१. वाहतूक बेशिस्त
२. कचरा निर्मुलन
३. रस्त्यावरील खड्डे
४. लोकल राजकारण्याचा उच्छाद आणि नाकर्तेपणा
५. स्थानिक स्वराज्य संस्थाचा / शासकीय विभाग यांचा अनागोंदी कारभार
६. कामाचा दर्जा आणि त्याची थोड्याच कालावधी मध्ये होणारी धूळधाण
७. शासकीय अधिकारी, व्यावसायिक, राजकारणी ह्यांनी चालवलेली पद्धतशीर लूट
हे वं तत्सम सगळे अन्याय आपण निमूटपणे सहन करत असतो आणि मनातल्या मनात चरफडत असतो. बऱ्याचवेळा असे वाटते आपण इंग्रजाच्या जाचातून सुटलो पण आता आपल्याच लोकांच्या कचाट्यात सापडलो आणि त्यांचे गुलाम झालोत. तोंड दाबून बुक्क्याचा मार.
१९४७ मध्ये माहित होत शत्रू कोण आहे आहे आणि आपल्याला काय मिळवायचं. सगळा देश एकाच ध्येयांनी पेटून उठला होता.
आता परीस्थिती फार बिकट झाली आहे...आपलेच दात अन आपलेच ओठ.....आणि ह्या सगळ्याला आपणच जबाबदार आहोत.
ह्याचा अर्थ आपल्यालाच सूत्र हाती घ्यावी लागतील. म्हणजे आपल्याला लाठ्या काठ्या घेऊन कुठे जायच नाही तर आपली कर्तव्य आपण निष्ठावानपणे पाळण गरजेच आहे. संविधानामध्ये एका नागरिकाची कर्तव्ये अतिशय स्पष्टपणे उधृत केली आहेत, त्याचे आपण पालन करू या. तुम्ही म्हणाल मी तर इमाने इतबारे सगळे कर भरतो, वाहतुकीचे नियम पाळतो, कोणाला रिश्वत देत नाही...वगैरे वगैरे....
पण हे एवढंकरून थांबून चालणार नाही. आता अवघड प्रश्न विचारावे लागतील आणि संबंधिताना त्याची समाधानकारक उत्तरं द्यावी लागतील...तो आपला हक्क आहेच आणि तोही आपल्याला आपल्या संविधाने दिलाय....मग कशाला उद्याची बात....चला विचारू या प्रश्न....होऊन जाऊ दे सवाल जबाब....करू या दुसऱ्या स्वांतत्र्य लढयाची सुरुवात...
प्रश्न कोणाला विचारयाचे आणि कोण उत्तर देणार असा एक प्रश्न आपल्याला नेहेमी पडतो आणि मला कुठे वेळ आहे.....आणि ह्याचाच गैरफायदा घेऊन आपली पिळवणूक सुरु आहे अव्याहतपणे....प्रश्न विचारून तर बघू....झाला तर फायदाच होईल...नुकसान तर नक्कीच नाही होणार.....So Lets Challenge the Statusquo and seek freedom from all those evils which haunt us everyday!!

समाजविचार

प्रतिक्रिया

उमेश धर्मट्टी's picture

29 Aug 2017 - 5:26 pm | उमेश धर्मट्टी

स्वातंत्र्य लढा - आपल्याच लोकांशी, आपल्याच सिस्टीम बरोबर

पैसा's picture

29 Aug 2017 - 6:42 pm | पैसा

विचार आवडले