पण, लक्षात कोण घेतो!!!
परवा ऑफिसला जाताना बालगंधर्वच्या चौकात आले अन सिग्नल लाल झाला, म्हणून मग गाडी बंद करून सिग्नल पुन्हा हिरवा होण्याची वाट बघत उभी राहिले. तेव्हढ्यात साधारण अठरा-एकोणीस वर्षांची मुलगी गर्दीतून वाट काढत, सिग्नलवर थांबलेल्या काही निवडक लोकांना भेटून त्यांच्याशी काहीतरी बोलून त्यांना हातातल्या पुड्यातून एक-एक चॉकलेट काढून देताना दिसली. माझ्यासकट सगळेच 'ती नक्की काय बोलतीये आणि चॉकलेट्स का वाटतीये' या उत्सुकतेने तिच्याकडे बघत होते.