पुढील पाच मिनिटात, हे मानवते
"अ" अतिरेकी काळिमा फासतील तुझ्या तोंडाला
"ब" बलात्कारी झुकवतील तुझी मान शरमेने खाली
"क" कोवळी बालपणं विकली जातील बाजारात
"ड" डोकी फुटतील धर्ममार्तंडांच्या एका भृकुटीभंगाने तुझ्या डोळ्यादेखत
ई-पेपर्स सांगून थकतील "अ" "ब" "क" "ड" च्या मिनिटागणिक वाढत जाणाऱ्या किंमती
रोम-रोम जळताना तुझ्या जीर्ण-शीर्ण त्वचेच॑
हे उत्सवी फिड्ल कोण वाजवतंय न थांबता?
प्रतिक्रिया
13 Aug 2017 - 6:32 pm | धर्मराजमुटके
याला कविता किंवा रचना म्हणणे मनाला पटत नाहिये. जे काही लिहिले आहे त्याला 'र' ला 'ट' जोडणे म्हणतात. कृपया पुढील वेळी यापेक्षा चांगले लिहिण्याचा प्रयत्न करा. सडेतोड शब्दांसाठी माफ करा.
17 Aug 2017 - 9:16 am | अनन्त्_यात्री
आपल्या सडेतोड प्रतिक्रियेला दाद देतो. मात्र, त्यात व्यक्त केलेल्या मताशी मी पूर्णतः असहमत आहे.
17 Aug 2017 - 10:05 am | धर्मराजमुटके
धन्यवाद ! शक्य आहे की मला कविता कळाली नसावी, जरा विवेचन केले तर कळेलही कदाचित. कृपया वेळ असेल तेव्हा लिहा.