जनरेशन गॅप आणि निळाई

Primary tabs

झपाटलेला फिलॉसॉफर's picture
झपाटलेला फिलॉसॉफर in जनातलं, मनातलं
2 Aug 2017 - 12:43 pm

CD प्लेयर मध्ये बिप्या बघताना अचानक light जाऊन CD आतमध्ये अडकण्याची जी भीती आहे.....त्याची जाणीव आजच्या generation ला नाही.

वरचा मेसेज कायप्पा वर भिरभिरत आला आणि डोळ्यासमोर अनेक निळ्या पिवळ्या आठवणी रुंजी घालु लागल्या (त्या यथावकाश डोक्यात विसावल्या). त्यांना शब्दरुप देउन जोवर प्रसारित करत नाहित तोवर त्या तिथेच ठाण मांडुन बसणार याची खात्री पटल्याने लगोलग जिल्बी टंकायला घेतली. तरी टंचनिका हाताशी नसल्याने (आणी विषय इतका स्फोटक असताना ती हाताशी वगैरे नसणेच जास्त श्रेयस्कर असल्याने) अंमळ जास्त वेळ लागला टंकायला.

तर सांगायचा मुद्दा हा की आजच्या पिढीला सिड्याच काय बर्‍याच गोष्टींमध्ये अडकण्याची जाणीव कधीच होणार नाही. सिड्या किंवा व्हिडो कॅसेट फार नंतरच्या गोष्टी झाल्या. आम्ही जेव्हा शाळेत होतो त्या काळात (त्याला आता फार काळ लोटला पण तरीही आजोबांच्या काळातल्या कल्पना अशी उपमा लागेल इतकाही काळ नाही लोटलेला. फारतर २० -२२ वर्षे फ्लॅशबॅक मध्ये गेलात तर तो काळ डोळ्यासमोर उभा राहु शकेल). तर मी काय म्हणत होतो की आम्ही जेव्हा शाळेत होतो त्या काळात भावनांचा निचरा होण्यासाठी फार साधनेच अस्तित्वात नव्हती. किंबहुना निचरा होण्यासारख्या भावना निर्माण होण्यासाठी शाळेतुन बाहेर पडण्याचे वय होइल अश्या जनरेशन मध्ये आम्ही होतो. त्या आधीच्या भावना तर आजकालची मुले नर्सरीतच मागे सोडून येतात. सांगायचा मुद्दा असा की आमच्या काळात हुरहुर लावणार्‍या भावना निर्माण करणार्‍या साधनांमध्ये व्हिडीयो कॅसेट फार नंतर आल्या. आधी आली काही पिवळट पुस्तके. ती पुस्तके पण अशी सहजी मिळायची नाहित. पण एकुणच परोपकाराची भावना समाजामध्ये खुप प्रबळ असल्याकारणाने वर्गातल्या एकाकडे साहित्य आले की वाचनाची गोडी वर्गातल्या सगळ्यांना आपोआप लागायची आणि साहित्याची मनोभावे आराधना करण्याची चढाओढच लागायची. व्हायचे काय की साहित्य मिळाले तरी ते दफ्तरात ठेवणे म्हणजे अव्वल कोटीचा मुर्खपणा होता आणि त्या काळात आजच्या पिढीसारखी स्वतंत्र खोलीची सोय नव्हती. असली तरी आई वडिलांना घर आवरण्याची इतकी हौस असायची की अगदी माळ्यावर जरी लपवले तरी एक दिवस ते साहित्य हाती लागण्याची पुर्ण शक्यता होती. आमच्या एका मित्राने या समस्येवर रामबाण उपाय शोधला होता. तो सहित्य आजोबांच्या गादीखाली लपवायचा. त्यातही दोन गाद्यांच्या मध्ये. बापजन्मात कुणाला सापडणार नाही अशी जागा. आजच्या जनरेशला ला अश्या समस्येवर उपाय काढायला जमेल का? मुळात त्यांना अश्या समस्या येतीलच का?

आमच्या जनरेशन मध्ये तर हा प्रश्न इतका गहन होता की अश्या साहित्याच्या दुर्मिळते मुळे वयात आलेली (म्हणजे लग्नाच्या) मुले देखील अगदी बेसिक ज्ञानापासुन वंचित असायची. त्यामुळे विवाहितांचे कामजीवन वगैरे असल्या पुस्तकांची चलती होती. आजकालची मुले विचारतील "But Uncle why did you need the books at the time of marriage? Were you virgin at the time of your marriage. Ohh. God. You are simply impossible" ज्या वयात आमची थियरीची मारामारी होती त्याच्या अर्ध्या वयात आजकालच्या मुलांची प्रॅक्टिकल्स पक्की असतात. त्यांना निम्मे प्रश्न पडतच नाहित. जे पडतात त्यांची उत्तरे शोधताना आमची पिढीसुद्धा अजुन चाचपडत असते. पुढची पिढी आम्हालाच शिकवेल अशी भिती वाटते. चलता है. It happens dude. Chilllll.

तर आपण बोलत होतो अडकलेल्या सिड्यांबद्दल. हा किस्सा एकदा आमच्या बाबतीत घडला होता. तसा आमच्यापैकी २-३ जणांकडे व्हीसीआर होता. पण सगळ्यांच्याच घरात कोणी ना कोणी तरी असायचे असे असतान भक्त प्रल्हाद बघावेत कसे ?? त्या काळी आजच्यासारखे नेट नव्हते . म्हणजे होते तसे पण परवडायचे नाही आणि बर्याचदा गोगलगायीच्या गतीने पुढे सरकायचे. त्यामुळे ज्ञानाजर्नाचा राजमार्ग बाबा व्हिडो पार्लर मधुन जायचा. तिथे जाउन भक्त प्रल्हादच्या कॅसेटी मिळवण्याचा आमच्यापैकी कोणाच्याच पार्श्वभागात दम नव्हता. १८ - १९ वर्षांच्या घोड्यांना सुद्धा व्हिडियो पार्लर मध्ये जाउन बिप्या मागायला भिती वाटायची. आमच्यातला एकच होता ज्याच्या पार्श्वभागात दम होता. तो मात्र मंडईत जाउन ताजे सफरचंद निवडावेत त्या सहजपणे चांगली प्रिंट निवडुन आणायचा. मंडईत भाजीवाल्याला लाडिक दम देतात तसा दमही द्यायचा 'बघा चांगाली नसेल तर पैसे नाही देणार' म्हणुन. समोर व्हिडो पार्लर मध्ये बाबा नसुन बाबी असेल तरी तो त्याच निर्विकारपणे काम तडीस न्यायचा.

एकदा एका मित्राने जाहीर केली की त्याची आई नाटकाला जाणार आहे आणि बहिण ऑफिसला. त्यामुळे मधले ४-५ तास फ्री होते. आम्ही लगेच काँट्री जमवली. त्यावेळेस खिषात फार पैसेही नसायचे आणि पिक्चर बघायचा म्हणुन आईकडे पैसे मागितलेच तर तिला कुठला पिक्चर? काय? कुठे? कुणाबरोबर वगैरे रिपोर्ट द्यायला लागायचा. शिवाय आल्यावर पिक्चरची स्टोरी सांगणे आलेच (हे खात्री करुन घेण्यासाठी की पैसे इतरत्र कुठे उडवले नाहि ना म्हणुन). त्यामुळे त्या मार्गाने पैसे मिळवणे अवघड होते. त्यामुळे फार मुश्किलीने साठवलेले ८ - १० रुपये सापडायचे फारतर. असे आम्ही ७-८ जण जमलो ( त्यावेळेस काय लगेच जमायचे सगळे आणि उपास सोडायचा म्हटले की तर फारच लवकर). सीडी आणणार्या मित्राने नेहमीप्रमाणे घोळ घातला आणि ४- ५ तासात बघण्यासाठी तो ४ सिड्या घेउन आला. आधी त्याच्यावर पडी घेतली. खिशातले ५- १० रुपये आणी हातात असलेला २-३ तासाचा वेळ याचा मेळ ४ क्यासेटशी कसा जोडायचा हे तुच सांग म्हणुन त्याच्यावर भडकुन झाले. त्यात ४ -५ मिनिटे गेली. मग राग आवरता घेतला कारण वेळ कमी होता.

क्यासेट सुरु झाल्यावर सुरुवातीची टायटल्स आणि त्याबरोबर दिसणारी फक्त चित्रे बघावीत की बघु नयेत यावर चर्चा झाली (तेवढ्या वेळात ती टायटल्स संपलीच). मग भक्तगण एकाग्रतेने भक्तीसाधनेत रमले. २-३ मिनिटे झाली असतील आणी लाइट गेले. लाइट जाण्याचा वार नसल्याने ज्याच्या घरी भक्तगण जमले होते त्याने सगळ्यांना निवांत राह्यला सांगितले. अपेक्षेप्रमाणे १५ -२० मिन्टात लाइट आले. आणी त्यानंतर मोजुन २ मिनिटाच्या आत त्या मित्राची बहिण घरी येउन धडकली. तिचा एक्सिडेंट झाल्याने पायाला भलेमोठे बँडेज गुंडाळुन आली होती. आम्ही सग्ळे जण भयाण शांततेत तिच्याकडे बघत होतो . तिला इतके लागले होते याच्या बद्दल हळहळ व्यक्त करण्याऐवजी डोळ्यासमोर त्या ४ सिड्या नाचत होत्या. त्या पार वाया जाणार. पण देवाने तिला सदबुद्धी दिली आणि तिने जाहीर केले की ती झोपायला जाणार आहे. ती तिच्या खोलीत निघुन गेली.

ती गेल्यानंतर परत २-५ मिनिटे चर्चाविनिमय झाला की ती घरात असताना रिस्क घ्यावी की नाही. शेवटी आवाज कमी करुन (कारण आवाज बंद करुन "फील "येत नाही असे काही जणांचे मत होते) परत सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. लोक सरसावुन बसले. एक मित्र हातात रिमोट घेउन बसला. थोड्याच काळात भक्तगण भक्तीत लीन झाले. इतके तल्लीन झाले की मित्राच्या बहिणीने दार उघडल्याचे फक्त मलाच लक्षात आले. सुदैवाने लक्षात येणारा दुसरा रिमोटवाला होता. त्याने अगदी ऐन मोक्याच्या क्षणी टीव्ही आणि व्हीसीआर ऑफ केले. खुप ऑकवर्ड सिन होता तो. त्या मित्राची बहिण हॉलच्या दारात उभी होती. मी आणी रिमोटवाला मित्र दाराकडे बघत होतो. बाकी सगळेजण आ वासुन टीव्हीकडे बघत होते. त्यातल्या एकाने मधुनच टीव्ही बंद केल्याबद्दल रिमोटवाल्या मित्राला झापायला पण सुरुवात केली होती आणी मित्राची बहिण पार गोंधळुन आमच्याकडे बघत होती की हे सगळे एवढ्या शांततेत का बसले आहेत? बर सगळेजण टीव्हीकडे नजर लावुन का बसले आहेत (टीव्ही बंद असताना)? आणि आम्ही दोघे (मी आणि रिमोट वाला) तिच्याकडे भूत बघितल्यासारखे का बघतो आहोत? तिने पुर्ण गोंधळुन विचारले "काही आवाज येत होता का रे कुणाच्या तरी रडण्याचा? " (आम्हीच रडण्याच्या बेतात होतो. बाकी रडण्याचा आवाज म्हणजे काय हे सूज्ञ वाचक समजुन घेतीलच). कुणाच्याही तोंडुन शब्द फुटेनात.

त्यानंतर तिला चहा प्यायची हुक्की आली. किचन मधुन टी व्ही दिसत असल्याने आम्ही असंबंद्ध ग्प्पा मारत होतो कारण टीव्हा चालु करायचा प्रश्नच नव्हता. आमचा तब्बल एक तास खाल्ल्यानंतर तिच्या मैत्रिणीने आमची सुटका केली. ही धड पडलेली असल्याने तिची मैत्रीण तिला भेटायला आली होती. मग दोघी परत मित्राच्या बहिणीच्या खोलीत जाउन गप्पा मारायला लागल्या (सुदैवाने दार बंद करुन) . ५ मिनिटे शांत बसल्यानंतर आमाच्या **भागात किडे परत वळवळायला लागले. आम्ही परत व्हीसीआर सुरु केला. पण यावेळेस सगळेच सजग होते. त्यामुळे १० मिनिटात मित्राची बहिण आणि तिची मैत्रिण परत खोली बाहेर पडल्या तेव्हा ४-५ जणांनी रिमोट वाल्या मित्राला सावध केले. परत तोच पुर्वीचा सीन. यावेळेस मित्राच्या बहिणीची मैत्रिण मित्राच्या बहिणीला घेउन तिच्या घरी निघाली होती. ती बाहेर जाणार याचा अर्थात सगळ्यांनाच परमानंद झाला. ती गेल्याच्या दुसर्या मिनिटाला व्हीसीआर परत सुरु झाला आणि मोजुन पाच मिनिटाच्या आत परत लाईट गेले.

परत एकदा अर्धा तास वाट बघितली. लाइट येत नाहिसे बघुन मित्रांनी क्रिकेट खेळायची टूम काढली. मित्राचे घर पहिल्या मजल्यावर होते त्याच्या घराच्या बरोब्बर खाली आम्ही बॉक्स क्रिकेट खेळत होतो. साधारण तास भर खेळलो. पण लाईट काही आले नाहित (गॅलरीचा लाइट चालु ठेवला होता मुद्दाम आणि दर ओव्हर नंतर जवळ जवळ सगळेच जण तिकडेच बघत होते). पब्लिक लय वैतागले होते. मित्राला भिती की च्यायला लाईट आलेच नाहित तर भक्त प्रल्हाद राह्यला बाजुला, क्यासेट काढायची कशी? आणि घरी सगळे आल्यावर तर अशक्यच होते. त्यात कुणीतरी व्हीसीआर लावला की झालाच गोंधळ. सगळ्यांचीच वरात निघायची. आम्हा सगळ्यांच्या घरचे एकमेकांना ओळखायचे आणि आम्ही सभ्य सज्जन मुले म्हणून प्रसिद्ध होतो. त्याकाळी आम्ही हे असले काही बघताना पकडले गेलो असता तर सांस्कृतिक भुकंप झाला असता पुण्यात.

To make the matters worse, आम्ही खेळत होतो तिथुन मित्राच्या सोसायटीचे गेट दिसायचे आणि आम्हाला गेटवर मित्राची आई कुणाशीतरी बोलत असतान दिसत होती. मित्र रडण्याच्या बेतात होता. घेतली ती परीक्षा पुरे असे वाटुन देवानेच बहुधा बल्बात जीव फुंकला. एव्हाना मित्राची आई बिल्डींगच्या पायर्‍या चढायला लागली होती. एक मित्र पाईपवरुन उडी मारुन बाल्कनीत पोचला आणि तिथुन व्हीसीआर मधुन क्यासेट काढुन परत तसाच माघारी फिरला आणि आमच्या सोज्ज्वळतेचे मुखवटे फाटता फाटता वाचले.

अश्या छोट्यामोठ्या अडचणींमुळे डगमगुन जाणार्‍यातले आम्ही नव्हतो. कारण ज्ञानार्जनाची उपजत उर्मी आम्हाला कुठलीही आव्हाने स्वीकारण्यावाचुन परावृत्त करु शकतच नव्हती. त्यामुळे अश्याच अजुन एका दिवशी जेव्हा संधीने दार ठोठावले तेव्हा दुसर्या एका मित्राने अशीच भाकरी फिरवली. परत भक्तगण जमले. परत मित्राने तोच घोळ घातला. ४ तासात चार क्यासेट बघायच्या म्हणजे गाणी फॉरवर्ड करुन सिनेमा बघायचा. पण या सिनेमात तर गाणीच नव्हती. मग घुमाव रिवाइंड फॉरवर्ड. त्या व्हीसीआरच्या पट्ट्याला इतका घुमवला की बिचार्याने अखेर क्यासेटच्या रिळाला लटकुन जीव दिला. त्याच्या आत्महत्येने आमच्या जीवाला घोर लागला कारण मित्राची आई परत एकदा सोसायटीच्या दारात उभी दिसली (हा दुसरा मित्र होता. हा सुदैवाने तिसर्या मजल्यावर रहायचा आणी याच्या घरातुनच सोसायटीचे गेट दिसायचे. नाहितर काही खरे नव्हते). आया अश्या नको त्या वेळेस कश्या बरोब्बर हजर व्हायचा हे एक कोडेच आहे. आमच्याकडे घरचे परत कधी येणार हे जाणून घ्यायची काही यंत्रणाच नव्हती. आता पोरे किमान आयांना कुठ्पर्यंत पोचलीस हे मोबाइल घुमवुन विचारु शकतात. तर त्या जीव दिलेल्या व्हीसीआरची विल्हेवाट लावणे गरजेचे होतेच. पण जिच्या पदराला गुंडाळुन त्याने जीव दिला होत्या त्या क्यासेटला आधी मोकळे करणे गरजेचे होते. त्यासाठी परत त्या रिवाइंंड - फॉरवर्ड च्या बटणांवर अक्षम्य असे अत्याचार केले गेले. तरी त्याने हु का चु केले नाही. To make the matter worse...... you guessed it right, लाइट गेले. घोर अंधःकार. डोळ्यासमोर परत काजवे चमकले. वीज चमकण्याची शक्यता दिसेना. गनीम गडाच्या पायथ्याशी येउन ठेपला होता. वीज मंडळाच्या अधिकार्यांच्या आया बहिणींची प्रेमळ विचारपूस करुन झाली होती. अखेर एका मित्राने आपले (नसलेले) कसब पणाला लावुन तो व्हीसीआर खोलला. टीव्ही कपाटात बंद करुन ठेवण्याचा आचरटपणा बंद झाल्याचा काळ नुकताच संपला होता. त्या काळात घरातल्या दिवट्याने (खरे सांगायचे तर त्याच्या मित्राने) आख्खा व्हीसीआर खोलणे ही अतिशय क्रांतिकारी घटना होती. मित्राने त्याच धैर्याने तो व्हीसीआर खोलला. जीर्ण शीर्ण झालेली ती क्यासेटची रीळ सोडवली. व्हीसीआर परत कसाबसा ( म्हणजे कसाही) बंद केला. चिकटपट्टीने ती क्यासेट परत चिकटवली. मग त्या क्यासेट ला असलेल्या त्या पांढर्‍या चाकाला गरगर फिरवुन ती गायब केली. बाबा व्हिडियो पार्लर मध्ये गपगुमान क्यासेट परत नेउन दिली आणि नंतर बराच काळ त्याच्याकडे फिरकलोच नाही. तिकडे मित्राचे वडील व्हीसीआर मधुनच खराब कसा झाला याचे आश्चर्य वाटुन मधुन मधुन मित्राकडे शंकेखोर नजरेने बघायचे. सिड्यांमध्ये रीळच नसते हो आता. ते अडकणार कसे. आणि मुळात सिड्या बघतो कोण आजकाल? इंटरनेट वर ३ शब्द टाइप केले की आख्खे ब्रह्मांड समोर उभे होते तर क्यासेटच काय पण सिड्यांचीही गरज उरलेली नाही आता.

लपुन छपुन प्रेम करणे आता हळु हळु कालबाह्य होत आहे. इतक्या यातना सोसुन बिप्या बघणे तर कधीच हद्दपार झाले आहे. छ्या आजच्या generation ला बर्याच गोष्टींची जाणीव कधी होणारच नाही.

कलानृत्यनाट्यइतिहासवाङ्मयकथाबालकथासाहित्यिकसमाजजीवनमानप्रकटनआस्वादलेखअनुभवमदतविरंगुळा

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

2 Aug 2017 - 1:18 pm | कपिलमुनी

जबर्‍या लेख !

मी-सौरभ's picture

2 Aug 2017 - 1:35 pm | मी-सौरभ

आम्ही 'शहाणे' होईपर्यंत थोडे का होईना संगणक होते आणि त्यांचा सगळ्यात चांगला गुण म्हणजे ते लाइट परत आल्यावर पुन्हा पहिल्या पासून सुरू व्हायचे :p

कपिलमुनी's picture

2 Aug 2017 - 1:41 pm | कपिलमुनी

पिवळी पुस्तके लपवली नाहीत का ?

मी-सौरभ's picture

2 Aug 2017 - 2:26 pm | मी-सौरभ

ती शाळेतच मित्राकडे ठेऊन द्यायचो ;)

मोहनराव's picture

3 Aug 2017 - 2:10 pm | मोहनराव

चान चान गोष्टीची पुस्तके!!

प्रास's picture

2 Aug 2017 - 1:37 pm | प्रास

निळा विषय असा फिलाॅसोफीकली मांडणं शक्य होईलंसं वाटलं नव्हतं. प्रात्यक्षिकासह छान लिहिलंय. लगे रहो...

मिपा वयात आलं(च) आहे म्हणा....

टवाळ कार्टा's picture

2 Aug 2017 - 2:19 pm | टवाळ कार्टा

लेख भन्नाट जमलाय....बर्याच बाप्या लोकांच्या मनाला गुदगुल्या करुन जाईल...बायांचे माहित नाही

बाकी "मिपा वयात आलं(च) आहे म्हणा...." यासाठी
GHANTA

मिपा खरोखर वयात आले असते तर असे लेखसुद्धा खर्या आयडीने लिहिले गेले असते ;)

हा आयडी खरा नसल्याचं ज्ञान तुम्हाला बरं झालं.

भारतीय न्यायसंस्थेच्या मते कल्प्रीट नाॅट गिल्टी टील् प्रूवन अदरवाईज...

रावणराज's picture

2 Aug 2017 - 3:06 pm | रावणराज

मस्तच लेख..

सूड's picture

2 Aug 2017 - 3:18 pm | सूड

कहर!!

खटपट्या's picture

2 Aug 2017 - 3:31 pm | खटपट्या

बाबौ ! थोडक्यात वाचलात.

आपल्या क्षणिक आनंदासाठी आजोबा, बहीण वगैरे घरातल्या लोकांना गुंडाळून ठेवून कंपू करुन मिटक्या मारत निळाई बघणारे पुणेकर याची देही पाहून धन्य झालो !

आणि वर दिग्विजय करून आल्यासारखं लिहिलं आहे . . . आज एक मिपाकर म्हणून शरम वाटली !

कपिलमुनी's picture

2 Aug 2017 - 4:38 pm | कपिलमुनी

हा आयडी ठाण्याचा आहे , पुण्याचा आहे हा निळा शोध कुठून लावलात ??

माम्लेदारचा पन्खा's picture

2 Aug 2017 - 4:56 pm | माम्लेदारचा पन्खा

त्याकाळी आम्ही हे असले काही बघताना पकडले गेलो असता तर सांस्कृतिक भुकंप झाला असता पुण्यात . . . .

हे वाक्य पुरेसे नाही का . . . . . असो . . . . हल्ली पुणेकरांशी बोलायची भीती वाटते . . . .

इथून तिथून सगळे"कर" सारखेच हो भाऊ.

आणि प्रतिसाद सुद्धा खऱ्या आयडीने दिले असते :-)

धर्मराजमुटके's picture

2 Aug 2017 - 5:12 pm | धर्मराजमुटके

पुर्वीचे जनरेशन आणी हिरवाईमधे एक गॅप होती म्हणून पिवळाई आणि निळाई चे एवढे कौतुक असावे. आताशा जनरेशन आणि हिरवाईत फारसा गॅप नसतो त्यामुळे बहुधा निळाई चे एवढे कौतुक राहिले नसावे. पिवळाई अजुनही आहे मात्र ती एवढी सॉफ्ट आहे त्यामुळे तिला कोणी हळद लाऊनही विचारत नाही.

यसवायजी's picture

2 Aug 2017 - 6:19 pm | यसवायजी

असलं वाचून तरुण बिघडतील. संपादकांनी इकडे लक्ष द्यावे.

असलं वाचून संपादकही बिघडतील. तरुणांनी इकडे लक्ष द्यावे.

मस्त जून्या आठवणी जागवल्या

फारएन्ड's picture

3 Aug 2017 - 3:20 am | फारएन्ड

जबरी :)

यात काही "बफर" चित्रपट असत. मित्र लोक व्हिडीओ बघायला जमले आहेत म्हटल्यावर कोणता पिक्चर असा प्रश्न आला, तर सांगायला व प्रूफ दाखवायला एक "नॉर्मल" पिक्चरची सीडी/कॅसेट असे. एकदा आम्ही काही मित्र पिक्चर ला जाणार होतो, तेव्हा एकाच्या भावाने घरी मित्र जमवले होते. त्याला विचारल्यावर त्याने "एस व्हेण्चुरा" ची सीडी दाखवली व तो बघणार आहोत असे सांगितले. हा पिक्चर बघायला त्याचे मित्र लांबलांबहून रात्री आले होते यावर आम्ही विश्वास ठेवला असे त्याला जेन्युइनली वाटले असावे, किंवा डोण्ट आस्क डोण्ट टेल असे काहीतरी असेल :)

सौन्दर्य's picture

3 Aug 2017 - 9:14 am | सौन्दर्य

कित्येक वेळा पोलिसांना जर एखाद्या घरात 'भक्त प्रह्लाद' वगैरे पाहणे चालले असेल तर बघणाऱ्याना मुद्देमालासह पकडण्यासाठी मुद्दाम त्या घराचे इलेक्ट्रिक कनेक्शन बाहेरून बंद करायचे. अशी इलेक्ट्रिसिटी मध्येच गेली तर व्हीसीआरमध्ये ती टेप अडकून पडायची व मग पोलीस येऊन तो व्हीसीआर जप्त करून, बघणाऱ्याना पकडून कोर्टात उभे करायचे आणि न्यायाधीशां समोर "हा सूर्य आणि हा जयद्रथ" करायचे असे ऐकून होतो.

अभिजीत अवलिया's picture

3 Aug 2017 - 9:45 am | अभिजीत अवलिया

ह्यावरून दोन प्रसंग आठवले.
आमच्या एक मित्राला ११वीत असताना अशी पुस्तके वाचण्याचा इतका नाद लागला होता की वर्गात देखील तो शिक्षक शिकवत असताना बेंच मध्ये लपवून वाचायचा. एकदा तो वाचनात इतका गुंग झाला की सर जवळ आलेले त्याला समजलेच नाही. सरानी रेड हॅन्ड पकडले. त्याला बेंच वरून खेचून बाहेर काढला. पुस्तक हातात घेऊन राहुल गांधींनी जसा सरकारचा अध्यादेश फाडून टाकला होता तसे फाडून फेकले आणि २ वाक्य बोलले त्या मित्राला. (इथे लिहू शकत नाही ती वाक्ये).

दुसरा प्रसंग - एकदा एका मित्राकडे मी पुस्तक (शालेय अभ्यासाचे) आणायला गेलो होतो. मित्र घरी न्हवता. त्याची आई मला त्याच्या खोलीत घेऊन गेली. तिथे शेल्फ मध्ये सगळी अभ्यासाची पुस्तके होती त्यातले तुला हवे होते ते शोधून घे म्हणाली. मी मला हवे होते ते पुस्तक काढले तर त्याबरोबर त्याच्या मागे लपवलेली दोन पिवळी पुस्तके उघडी पडली. मित्राची आई तिथेच. कशी बशी लपवली ती पुस्तके आणि धूम ठोकली.

लपवून वाचायला भूगोलाच्या पुस्तकाची साईज एक लंबर.
टेक्निकल वाल्यांसाठी त्यांची पुस्तके पण उपयोगी.

आमच्या शाळेतले काही महाभाग भुगोलाच्या पुस्तकाच्या आड अगदी दुसर्‍या तिसर्‍या बाकावरपण निवांत वाचत असत.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Aug 2017 - 1:05 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ह्या ह्या ह्या. अश्या विषयावर धागा असुन अजुन टिकुने? मिपा अ‍ॅडल्ट झालं एकदाचं म्हणायचं. बाकी एका मित्राला शाळेत असताना हा नाद होता. सायबर मधे जाउन हे किडे चालायचे. एकदा त्याचं एकाशी भांडण झालेलं तर ज्याच्याशी भांडला तो ह्याच्या वडीलांना घेउन थेट सायबर कॅफेवर हजर झालेला. ढिंच्याक धुतलेला त्याच्या फादरनी त्याला. =)).

बरं एवढं होउन सुधारला का? नाही. परत एकदा सापडलेला. तेव्हा धोपटला का नाही माहिती नाही. =))

बाकी शाळेत असं साहित्यं लिहिणारे महाभागही होते. त्यांच्याविषयी पुन्हा कधीतरी.

बाकी ऑन सिरियस नोट.

सेक्ससारख्या नैसर्गिक घटनेला टॅबु केल्याने असे प्रकार होतात. ज्या सहजपणे आपण एकमेकांशी क्रिकेटवर बोलु शकतो त्याचं सहजपणे सेक्सविषयी बोलता आलं तर खरं. नाहीतर अश्या माध्यमातुन माहिती घेण्याच्या नावाखाली चुकीची माहिती मिळतेचं आहे.

ज्या सहजपणे आपण एकमेकांशी क्रिकेटवर बोलु शकतो त्याचं सहजपणे सेक्सविषयी बोलता आलं तर खरं.

जब्बरदस्त शॉट

दमामि's picture

3 Aug 2017 - 4:23 pm | दमामि

जबराट.
आमच्या होस्टेलमधे फक्त गणपतीच्या वेळी व्हीसीआर आणायला परवानगी असे. बरं , एकाच इमारतीत एक विंग मुलांचे होस्टेल दुसरी विंग मुलींचे होस्टेल . पण टी व्ही रूम सामाईक होती. मग रात्री सुरवातीला मैने प्यार किया वगैरे लागत. आणि मग सगळ्या मुली गेल्या की गुपचूप टीव्ही उचलून आमच्या होस्टेलवर आणला जाई. सकाळी सहा वाजता परत नेहमीच्या जागी.
एक रात्री वोर्डन बाहेरून उशीरा परत आले. बघतात तर टीव्ही गायब. वाचमनला विचारले तर तो काय बोलणार. "अकरा वाजेपर्यंत तर होता." खाली गोंधळ चालू आणि वरती कोरीडोरमध्ये अख्खं होस्टेल पिच्चर बघतंय.
सर होस्टेलमधे टिव्ही शोधायला निघाले.जिन्याकडचा इस्त्रीवाला जिन्याने धावत आला सावध करायला.
जी पळापळ झाली. सर दुस-या मजल्यावर लिफ्टने पोचेपर्यंत जिन्याने टीव्ही जाग्यावर पोचला सुद्धा.

त्या इस्त्रीवाल्याचे भले होवो.

गामा पैलवान's picture

3 Aug 2017 - 7:08 pm | गामा पैलवान

झफि,

तुमचे अमृतानुभव ऐकून मनोरंजन जाहले. व यांस आम्ही मुकल्याचा अंमळ खेदही झाला. आमचे मातापिता कार्यबाहुल्यानिमित्त दिवसभर घराबाहेर दूर असल्याने कुठलीही गोष्ट लपूनछपून करायची वेळ आलीच नाही. आजूबाजूचा एकंदरीत मामला इतका उडाणटप्पू होता की विवस्त्र स्त्रीदेहाची तितकीशी ओढ नव्हतीच. सायकलीवरून भटकणे, पेरूजांभळं आदि पाडणे, बेडूक पकडणे वगैरे कार्यक्रमात दिवस जायचा. कॉलेजच्या वयात सगळं मुक्तपणे उपलब्ध होतं. त्यामुळे अप्रूप नसे. शिवाय भक्तप्रल्हाद सगळे एकसारखेच असतात असंही निरीक्षण होतं. त्यामुळे अर्धवस्त्रांकित लौल्य वाढीस लागलं होतं. ते गुळगुळीत मासिकांत खुलेआम सर्वत्र उपलब्ध असे.

आ.न.,
-गा.पै.

योगी९००'s picture

3 Aug 2017 - 8:50 pm | योगी९००

जबरा अनुभव कथन...यावरून शुक्रवारी रात्री दुरदर्शनवर लागणारे चित्रपट आठवले आणि ते पाहण्यासाठी मारलेल्या थापा आठवल्या.

बाकी प्रत्येक प्रतिक्रियेच्या सुरूवातीला मुठ का दिसतेय याचा आज उलगडा झाला.

चिगो's picture

4 Aug 2017 - 5:27 pm | चिगो

बाकी प्रत्येक प्रतिक्रियेच्या सुरूवातीला मुठ का दिसतेय याचा आज उलगडा झाला.

ठ्ठो ऽ ऽ ऽ काय हाणलाय.. हा प्रतिसाद कळससाध्य आहे ह्या लेखाचा..

भारी लिहीलाय लेख.. दणक्या.