देव, गुरू आणि पालक चिकित्सेच्या पलिकडले आहेत,
त्यांना कुठलेही प्रश्न विचारू नयेत, जसे असतील तसे स्विकारावेत.
त्यांच्यात दोष असू शकत नाहीत हे मुकाट्याने मान्य करा.
जे जे हे सांगतील ते ते नैतिक, महान, अंतिम सत्य,
तुमच्या शंका, तुमचे आक्षेप म्यानबंद करून त्यांच्या वाटेने चालू पडा.
तुम्हाला दिसू शकतील वेगळ्या वाटा, कुठल्यातरी निराळ्याच सत्याची छोटी शलाका,
आम्ही त्याचा बंदोबस्त करू व्यवस्थीत, तुम्ही फक्त ही लेटेस्ट टेक्नॉलॉजीची झापडं बांधा.
देव, गुरू, पालक यांचे मातीचे पाय दिसले कधी चुकून जरी तरी तेच पुनःपुन्हा पुजा.