चित्र श्री संदीप डांगे यांजकडून साभार
रागाची ती उचल काय, दगड!
विचारांची मजल काय, दगड!
जात पात वजा भाग गणित
गणिताची उकल काय, दगड!
अभेद्य त्यांच्या आयुष्याची शिल्पं
पुतळे तोडून तुटंल काय, दगड!
देऊळ म्हणून आत गेलो बघत
गर्दीपुढे अचल काय, दगड!
बळावलेला ज्वर आहे, जबर
औषधानं निघंल काय, दगड!
तोड-फोड टीका निषेध कहर
सरतेशेवटी सफल काय, दगड!
नीट बघा, कळणार नाही फरक
हात, बाण, कमळ काय, दगड!
उद्या पुन्हा देतीलच ते वचन
निर्लज्जांचं नवल काय, दगड!
आमंत्रणं, आरक्षणं सकल
उरलेल्यांची दखल काय, दगड!
पोखरतील विकून खातील असंच
देशामध्ये उरंल काय, दगड!
चिडचिडच व्हायची लिहून अखेर,
कविता काय, गझल काय, दगड!
- अपूर्व ओक
प्रतिक्रिया
4 Jan 2017 - 3:13 pm | संदीप डांगे
जबरदस्त भावना मांडल्यात. सलाम ची आठवण आली..
4 Jan 2017 - 3:23 pm | आदूबाळ
जबरदस्त!
याचं मिपाच्या यूट्यूब चॅनलसाठी वाचन करावं असं सुचवतो.
4 Jan 2017 - 4:55 pm | सुधांशुनूलकर
मिपाच्या यूट्यूब चॅनलसाठी वाचन करावं - प्रचंड अनुमोदन
4 Jan 2017 - 5:07 pm | वेल्लाभट
नक्की विचार करतो.
4 Jan 2017 - 9:20 pm | पिलीयन रायडर
१०००%
अत्यंत सुंदर जमली आहे रे कविता.. कविता वाचन करच..
5 Jan 2017 - 5:26 am | अत्रुप्त आत्मा
+१ .
एक नंबर जमलीये.
4 Jan 2017 - 3:27 pm | हतोळकरांचा प्रसाद
खूप छान!!
4 Jan 2017 - 3:45 pm | विशुमित
""उद्या पुन्हा देतीलच ते वचन
निर्लज्जांचं नवल काय, दगड!""
लाजवाब...!!
आदूबाळ यांच्याशी सहमत...
4 Jan 2017 - 4:17 pm | अनन्त्_यात्री
मन्गल देशा , पवित्र देशा, दगडान्च्या देशा
4 Jan 2017 - 5:08 pm | वेल्लाभट
सगळ्यांना _/\_
हे कुठे जाऊन संपणार आहे, संपणार आहे की नाही याचा विचार करून त्रास होतो
4 Jan 2017 - 5:22 pm | अनुप ढेरे
खूप छान!
4 Jan 2017 - 5:40 pm | चांदणे संदीप
दगडाला घेऊन अशी सुंदर रचना वेल्लाभटाचं करू जाणे! :)
Sandy
4 Jan 2017 - 5:56 pm | चांदणे संदीप
लिहिणारे वाऱ्यावर सुगंध लिहितात
ही दाद माझी दरवळंल काय, दगड!
Sandy
12 Jan 2017 - 2:43 pm | वेल्लाभट
दरवळंल ना भौ! वाह
4 Jan 2017 - 5:47 pm | पाटीलभाऊ
मस्त कविता
4 Jan 2017 - 6:14 pm | रेवती
समयोचित कविता. आवडली.
4 Jan 2017 - 9:26 pm | शार्दुल_हातोळकर
सत्य आणि स्पष्ट भाषा.
कविता आवडली.
5 Jan 2017 - 12:00 am | रातराणी
अप्रतिम!
5 Jan 2017 - 9:18 am | अजया
अप्रतिम कविता.
5 Jan 2017 - 9:31 am | ज्ञानोबाचे पैजार
उगाच असल्या कविता लिहून कशाला डोकेफोड करुन घ्यायची? दगडांवर त्याचा काही परीणाम होणार आहे का?
दादोजी झाले, गडकरी झाले, शनिवारवाड्याचा नंबर काही फार दूर नाही.
आपण तालिबानला उगाच नावे ठेवतो.
पैजारबुवा,
5 Jan 2017 - 10:45 am | पैसा
माझ्या मना बन दगड म्हणायची वेळ आलीय.
जळजळीत कविता आणि भेदक चित्र.
5 Jan 2017 - 11:02 pm | मित्रहो
जबरदस्त
आवडली कविता
11 Jan 2017 - 2:47 pm | कवि मानव
अस्खलित !!
11 Jan 2017 - 2:51 pm | चाणक्य
.
12 Jan 2017 - 2:41 pm | वेल्लाभट
चाणक्य, कवीमानव, मित्रहो, पैसाताई, पैजारबुवा, अजया, रातराणी, रेवती, पाटीलभाऊ, शार्दुल, सगळ्यांचे अनेक आभार.__/\_
15 Jan 2017 - 1:42 pm | मदनबाण
सुंदर !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अम्बरसरिया..मुंडयावे कचिया कलियाँ ना तोड़, तेरे माँ ने बोले हैं मुझे तीखे से बोल... :- Fukrey
17 Jan 2017 - 1:25 pm | देशप्रेमी
सत्यवचन! एकदम रोखठोक भाषा!
4 May 2017 - 6:17 pm | पिलीयन रायडर
वेल्लाने अत्यंत सुंदर अभिवाचन केले आहे. नक्की ऐका!
4 May 2017 - 9:48 pm | चतुरंग
फारच छान अभिवाचन.
अभिनंदन वेल्ला!
आणि इथे लिंकवल्याबद्दल धन्यवाद पिरा!
4 May 2017 - 9:50 pm | स्रुजा
वा , वा. आपल्या यु ट्युब चॅनल वर एक सुंदर भर पडली, धन्यवाद वेल्ला.
4 May 2017 - 10:18 pm | वेल्लाभट
_/\_ धन्यवाद पिरा इथे डकवल्याबद्दल
आणि चतुरंग, स्रुजा; धन्स !
4 May 2017 - 11:41 pm | संदीप-लेले
सुंदर वाचन !
कविता तर फारच भेदक - क्या बात है !
10 May 2017 - 4:18 pm | पद्मावति
सुरेख अभिवाचन.