अन्नोत्सव
आमची सोसायटी म्हणजे एक छोटासा गाव. म्हणजे बघा कहाणीतल्या आटपाट नगरा सारखा. मुआँ करोना आला आणी गावात सन्नाटा करून गेला. बरेच दिवस गाव चिडीचूप्प,हळु हळू गावाला जाग येऊ लागली .
पुढाऱ्यांची मादियाळी जमा झाली. काहितरी करुयात म्हणत दवंडी आली. हाकारे पिटारे डांगारे कळवण्यात येते की आन्नोत्सव आयोजित होत आहे. जनमानसात आनंद पसरला. हौशे, गवशे आणी नवशे सगळ्याचीच गर्दी झाली. उत्तम आयोजन, गावातले गावकरी तृप्त झाले. सकाळी सकाळी सुर्यवंशींचा फेरा आला. अन्नोत्सवाचे भग्नावशेष बघून गत सध्यांकाळच्या वैभवशाली खुणा पुन्हा जागवू लागला.