मिपा संस्थापक, श्री तात्या अभ्यंकर, यांना श्रध्दांजली - पुण्यतिथी ३

Trump's picture
Trump in जनातलं, मनातलं
15 May 2022 - 2:35 pm

तात्या १५ मे २०१९ रोजी वारले. साधारणतः २००७ मध्ये मिपाची स्थापना केली. आपल्या सारख्या अनोळखी लोकांना मन मोकळे करण्याचा आणि उत्तमोत्तम लेखनाचा आस्वाद घेण्याचा मार्गे उपलब्ध करुन दिला, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो.
त्यांच्या विषयी इतरांनी भरभरुन लिहिले आहे. मला त्यांना शेवटी भेटता आले नाही आणि कोणतीही मदत करता आली नाही यांची खंत वाटते.

मटामधील श्रध्दांजली
https://maharashtratimes.com/maharashtra/thane/chandrashekhar-abhyankar-...

---------------------------
त्यांचे काही निवडक साहित्य येथे देत आहे, नवीन लोकांना ओळख होण्यास मदत होईल.

मिपावरील त्याचा आयडी: विसोबा खेचर - https://www.misalpav.com/user/6 आणि त्यांचे सर्व लेखन - https://www.misalpav.com/user/6

त्यांची लेखनवही (ब्लॉग)
http://tatya7.blogspot.com/

त्यांची चित्रवाहिनी
Tatya Abhyankar a.k.a Visoba Khechar -
- https://www.youtube.com/watch?v=YjiB-cKDLUA
- https://www.youtube.com/user/tatya7/videos
- https://www.nghenhachay.net/artist/UCHkQVSmnudzuIJVDT2fXOGA

---------------------------
इतर रसिकांनी, मित्र-मैत्रींणीनी व्यक्त केलेल्या भावना:

मांडणीइतिहासमुक्तकसाहित्यिकजीवनमानप्रकटनविचार

प्रतिक्रिया

Trump's picture

15 May 2022 - 2:40 pm | Trump

Tatya photo - तात्या फोटो

त्यांच्या पुज्य मातोश्रींच कसं काय आहे आता?

कर्नलतपस्वी's picture

15 May 2022 - 4:31 pm | कर्नलतपस्वी

तात्यांचे ही मिसळपाव टपरी सदा गजबजलेली राहो.
तात्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

मिपाच्या आद्य संस्थापकांना विनम्र अभिवादन आणि श्रद्धांजली __/\__

चौथा कोनाडा's picture

16 May 2022 - 12:01 pm | चौथा कोनाडा

मिपा संस्थापक, श्री तात्या अभ्यंकर, यांना भावपुर्ण श्रध्दांजली.
तात्यांना भेटता आलं नाही याचं कायमच शल्य राहील.

हॉटेल मिपा नेहमीच हाऊसफुल्ल राहो!

नगरी's picture

16 May 2022 - 3:08 pm | नगरी

कोणालातरी आठवण आहे हे पाहून बरे वाटले.
भावपूर्ण श्रद्धांजली,खरेच ग्रेटच माणूस होता

राजाभाउ's picture

16 May 2022 - 4:42 pm | राजाभाउ

श्री तात्या अभ्यंकर यांना भावपुर्ण श्रध्दांजली.

पांथस्थ's picture

16 May 2022 - 5:06 pm | पांथस्थ

विनम्र श्रद्धान्जलि _/\_

आपण आज व्यक्त होऊ शकतो. माझा कधीही संबंध आला नाही, पण त्यांच्याविषयी कायम कृतज्ञ राहीन.

सुक्या's picture

17 May 2022 - 1:33 am | सुक्या

कित्येक सिध्दहस्त लेखकांना मिपा वर बोलावुन त्यांनी मिपा एका उंचीवर नेले होते. ईतरांच्या तुलनेत मिपा अजुनही उंचच आहे ..

२००८ साली अमेरिकेत आलो आणि माय मराठीचा संपर्क तुटला. घरात जे काही मराठीत बोलायचो तेव्हढेच. मराठीत बोलायची, संवाद साधायची प्रचंड निकड भासत होती आणि माझ्या एका मित्राने (महेश अभ्यंकर) मिपा सुचवले. आधी बिचकत बिचकत नंतर बिनधास्तपणे लिहू लागलो. वाचकांच्या प्रतिक्रियेप्रमाणे लेखनात सुधारणा करू लागलो व आजमितीला ५०-६० लेख कविता लिहून झाल्यात.
मिपावरचा वेगवेगळ्या विषयांवरचा लेखकांचा गाढा व्यासंग पाहता इतर कोणत्याही साईटवर जावेसे वाटत नाही. येथे कौतुकाची थाप लाभते तर कधीकधी पाठीत दणका देखील बसतो. कोणताही विषय मिपाला वर्ज्य नाही आणि प्रत्येक विषयावरचे पंडित मिपावर आहेत. कोणतीही नवी वस्तू, तंत्रज्ञान विकत घ्यायचे असो, वापरायचे असो, अचूक असे सल्ले नेहेमी मिळतात.
थोडक्यात सांगायचे म्हणजे तात्यांनी आपल्यावर मिपा सुरु करून अगणित उपकारच केले आहेत. मी मिपाकर असल्याचा मला अभिमान वाटतो.

श्रीरंग_जोशी's picture

18 May 2022 - 2:42 am | श्रीरंग_जोशी

मिपासंस्थापक अन मराठी आंतरजालावरचे प्रसिद्ध लेखक स्व. तात्यां अभ्यंकर यांच्या स्मृतीस अभिवादन.
तात्या आपल्यात नसले तरी त्यांच्या लेखनाच्या व त्यांनी लावलेल्या मिपाच्या रोपट्याच्या स्वरुपात ते कायमच आपल्यासोबत असतील.
सर्व मिपाकरांच्या सहकार्‍याने मिपाची पताका उंचावत ठेवणे ही तात्यांच्या कार्याला उत्तम श्रद्धांजली ठरेल.

कानडाऊ योगेशु's picture

18 May 2022 - 7:26 am | कानडाऊ योगेशु

तात्यांना सश्रध्द श्रध्दांजली.
खादाडी सदर आणि सोबत एका नव्या ललनेचा फोटो व त्यावर "ही आमची अमुक तमुक. हिच्यावर आमचा फार जीव" ही तात्यांची ट्रेडमार्क कॉमेंट नेहेमीच स्मरणात राहिल.

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 May 2022 - 11:37 am | ज्ञानोबाचे पैजार

त्यांना कधी भेटायचा योग आला नाही पण माणूस मोठा रसिक आणि दिलदार होता हे त्यांच्या लिखाणातून आणि त्यांच्या बद्दल इतरांनी जे लिहिले आहे त्यातून समजते.
पैजारबुवा,