पटवर्धन अण्णा
पटवर्धन सरांकडे आम्ही इंग्लिश विषयासाठी क्लासला जायचो. युनायटेड इंग्लिश स्कूल अर्थात आमच्याच शाळेतून खूप पूर्वी सर रिटायर्ड झालेले होते. शाळेत होते म्हणून सर नाहीतर त्यांना अण्णा म्हटलेलंच आवडायचं. बरीच मुलं त्यांना सर म्हणायच्या ऐवजी अण्णाच म्हणत. सर घरीच इंग्रजीचे क्लास घ्यायचे. फक्त 9 वी आणि 10 वी ची मुलं. सकाळी 7.30 ते 8.30 10 वीची बॅच, 8.30 ते 9.30 9 वीची बॅच आणि शेवटी 9.30 ते 10.30 परत एक दहावीची बॅच. एवढ्या तीनच बॅच दिवसभरात असायच्या. त्यांच्या घरातल्या त्या छोट्याश्या पडवीत हा क्लास चालायचा.एक वेळी जास्तीत जास्त 15 ते 17 मुलं माऊ शकतील एवढीच खोली होती ती.