कहाणी महापुराची - माझ्या नजरेतून (भाग 3)
23 जुलै ला पाणी बरचसं उतरलं होत पण अनेक ठिकाणी अजूनही साचून होत. काही ठिकाणी पाणी उतरलं असलं तरी चिखल, आडवी झालेली झाडे, विजेचे खांब, तारा इत्यादी मुले जाणे अशक्य होते. मित्राचे आई वडील होते त्या शंकरवाडीत हीच परिस्थिती होती. ते सुखरूप आहेत हे समजलं पण त्यांची भेट घडू शकली नाही. 2 दिवसात इन्व्हर्टर संपल्याने नेलेल्या मेणबत्त्या आणि कडेपेट्या उपयोगात आल्या. चिपळुणात निदान 3 4 दिवस लाईट येणार नाहीत हे समजून चुकलो होतो. उदयाला पाणी पूर्ण उतरेल आणि मग प्रत्यक्षात सगळीकडे कामाला सुरुवात होईल याचा अंदाज आला. भाऊ ज्याचं कापडाच दुकान होत, त्याच्या इथे देखील अजून ढोपर भर पाणी रस्त्यावर होत.