ग्रीष्मोत्सव साजरा!

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
10 Aug 2021 - 10:15 am

वसंतोत्सव
नंतर ...
वसंताने खो दिल्यावर ग्रीष्म चक्र उभे ठाकते.ग्रीष्म हा अवघडलेल्या अवस्थेसारखाच भासतो. शुष्कतेची जाणीव देणारा मधेच पावसाच्या सरी देऊन मोकळा होत जातो नाही का?ग्रीष्मातला उकाडा आता कडक जाणवत नाही, की वातानुकुलित यंत्राने तो हरवून गेला आहे.पण भव्य आकाशमंडपाखाली रुजू पाहणाऱ्या पालवीने आता हिरवाईचा बहरच धारण केलाय.पक्ष्यांची आता पिल्लांसाठी नवी घरटे बांधायची लगबग असते.वसंतात रुजलेला निसर्ग इवले इवले जीवांच पोषण पूर्ण होणार असते.
हिरवी पाती
1
गुलमोहर-बहावा वसंतवैभव पण ग्रीष्मात अशा अनेक वैभवाने सृष्टी न्हाऊन जाते.गच्च गच्च हिरव्या पानात लिली,जाई –जुई,चाफा विविधरंगी फुलांच्या राशी बागेमध्ये ओसांडत असतात.तर लोणची ,गुळांबा ,साखरांबा पदार्थ तयार करून यांची वर्षभरासाठी साठवणूक होते.गुळांब्याच महत्व ‘डायटवाल्या दिवेकर बाईंनीही’ मानले आहे व त्याचा आग्रह धरला आहे.
ज्येष्ठातल पुष्पवैभव स्त्रियांना पाहता याव म्हणुन ‘वटपौर्णिमा’ व्रत असावं.मान्सूनचे आगमन होताच हवेत गारवा भरला जातो.वाऱ्याचा तुफान वेग त्याच्याबरोबर पानाच्या सळसळीचा आवाज कानांत घुमतो. आषाढातले दिवस मेघांच दार अलगद उघडतात .सावळ्या मेघांची सैरभैर धावाधाव सुरु राहते .तासंतास समाधी लावून पहावे एव्हढे सुंदर आकाश या काळात दिसते.कालिदासाला देखील हे दूत भासले आणि मेघदूताची निर्मिती झाली.
आषाढाच्या प्रथम दिनिं तया दिसे मेघ गिरिशिखरा
आलिंगुनिया रम्य, जणों गज तटा धडकतां झुकला
(अनुवाद : रा. प. सबनीस)

सावळा मेघ
2

पाऊस भावना कवितेत,लेखात,भटकंतीत,एका छत्रीत दोघांना आणि प्रत्येक मनाला चिंब करीत राहतात.त्याबरोबर चहाचे घोट आणखिण काय हवं?
तिथेच रानातल्या वनस्पती विज्ञान भाषेतील विड(weed) असलेल्या या वनस्पतींनी तर “खिलनेकी जिद पर अडी” करत अक्षरशःनिसर्गात तल्लीन होतात.सोनकी,तगर ,किरळ,टणटणी,वाघनख्या इत्यादी यांची फुले रानावनात फुललेली असतात.यातली काही औषधी असतात.
वाघ नखी
9
रानफुल १
3
रानफुल २
8
एरवी काट्यांनी सजलेला बाभळीचाही बहरही निराळच आनंद देतो. मागे मी बाभळीच्या बहरावर चार ओळी लिहिल्या होत्या,तो पर्यंत बाभळीचा बहर मी मन लावून पाहिलाच नव्हता,यंदा मन भरून अनुभवला:)
आणि बाभळ शोधता-अनुभवता बापट यांची ‘बाभूळझाड –एक सल’,इंदिरा संत यांची ‘बाभळी’ या कवितांचा आस्वाद मिळाला. यांनीही काट्यांमध्ये एक मनोहारी सोन बहर व्यक्त केलाय..
बाभुळमाय
6
विठ्ठल नाम घेत भक्तीरसात वारकरी दिंडीत अखंड मार्गक्रमण करीत राहतो.अलैकिक शक्तीने वातावरण भारावून जाते.आषाढी एकादशीला विठूच्या पायी माथा टेकवत उभा महाराष्ट्र भरभराटीच साकड त्याला घालतो.हेच शक्ती सामर्थ्य गुरुपौर्णिमाला पूर्णानंद देते.
वरुणराजा बरसत बरसत थकत नाही.शेतातली पिक डोलत राहतात.
आषाढी अमावस्येला दीप अमावस्येचा मान देत ग्रीष्म वर्षा ऋतूला प्रकाशाचे देणे देतो.
-भक्ती

मुक्तकआस्वाद

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

10 Aug 2021 - 10:23 am | कुमार१

छान फोटो व वर्णन !

वारा वारा धारा धारा सांगतसे काही , तापलेल्या जीवा थोडी द्यावीशी तरारी...

प्रचेतस's picture

10 Aug 2021 - 4:01 pm | प्रचेतस

मस्त झालाय लेख.

कुमार,गोजिरा,प्रचेतस धन्यवाद.

मदनबाण's picture

10 Aug 2021 - 6:59 pm | मदनबाण

छान लिहलंय !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : -jumbalaka jumbalaka... :- En Swasa Kaatre

कंजूस's picture

10 Aug 2021 - 7:05 pm | कंजूस

या भीतीने लेख उघडला नव्हता सकाळपासून. पण दोनचार फोटो पाहिल्यावर हायसं वाटलं.
छान.

Bhakti's picture

10 Aug 2021 - 7:43 pm | Bhakti

ललित लेख नाही पण मला मराठी निबंध वाटतोय!;)
कंजूस काका, मदनबाण धन्यवाद.

उग्रसेन's picture

11 Aug 2021 - 9:21 am | उग्रसेन

दवनीय असेल म्हणुन लेख उघडला नव्हता. फोटो पाहुन आनंद जाहला.

काल्पनिक नसल्याने दवनीय नाही :)
धन्यवाद.

मित्रहो's picture

11 Aug 2021 - 12:11 pm | मित्रहो

छान लेख आणि सुंदर फोटो

Bhakti's picture

11 Aug 2021 - 1:48 pm | Bhakti

धन्यवाद
:)

चौथा कोनाडा's picture

11 Aug 2021 - 2:07 pm | चौथा कोनाडा

व्वा, सुंदर वर्णन आणि त्याला साजेशे छान असे फोटो !

आषाढी अमावस्येला दीप अमावस्येचा मान देत ग्रीष्म वर्षा ऋतूला प्रकाशाचे देणे देतो.


+१
अगदी छान !

Bhakti's picture

11 Aug 2021 - 4:43 pm | Bhakti

दिव्यांच्या फोटो द्यायचा विसरले होते...५ वर्षांपूर्वीचा आहे.
चौको काका धन्यवाद.
A

चौथा कोनाडा's picture

17 Aug 2021 - 5:22 pm | चौथा कोनाडा

+१ सुरेख !

ज्ञानोबाचे पैजार's picture

11 Aug 2021 - 5:52 pm | ज्ञानोबाचे पैजार

आवडला लेख आणि फोटोही
सुरेखच लिहिले आहे
पैजारबुवा,

धन्यवाद पैजारबुवा.

तुषार काळभोर's picture

14 Aug 2021 - 8:51 am | तुषार काळभोर

फोटो चांगले आहेत, लेख त्याहून जास्त भारी आहे.

धन्यवाद​ तुषार! ग्रीष्मातलं आणखिन एक वैभव म्हणजे पिवळा गुलमोहर....पिली धूप पेहनके तुम देखो बागोमे मत जाना :)P

तुषार काळभोर's picture

14 Aug 2021 - 3:49 pm | तुषार काळभोर

सुरेख फोटो!
असं फुलांनी डवरलेलं झाड अंगणात असायला हवं!
आणि गाणं काय साजेलंसं निवडलंय..

चिकमंगळुरु बस डेपोजवळ होतं. ( ताम्हण नव्हे). पण खालून आणि पहिल्या मजल्यावरून हॉटेलमधून मोबाईलवर फोटो येईना.

जुइ's picture

15 Aug 2021 - 7:38 am | जुइ

लेखन आणि फोटो दोन्ही समर्पक

Bhakti's picture

15 Aug 2021 - 2:47 pm | Bhakti

धन्यवाद जुइ.

नीलकंठ देशमुख's picture

16 Aug 2021 - 8:29 pm | नीलकंठ देशमुख

छान लिहिलय

विवेकपटाईत's picture

17 Aug 2021 - 11:31 am | विवेकपटाईत

सुंदर वर्णन.

भुंग्या फुलाप्रमाणे असणारे एक रानफुल.
B
धन्यवाद देशमुख काका आणि पटाईत काका.