मुक्तक

जर्द पिवळी दुपार

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
16 Apr 2025 - 4:13 pm

जर्द पिवळी दुपार
दार ठोठावत येते
आत आत कोंडलेले
झळीनेच धुमसते

घोर फुफाटा धुळीचा
अणु रेणू तापलेला
मृगजळाच्या काठाशी
निवडुंग फोफावला

गारव्याची शीळ निळी
दूर विजनी घुमते
तिथे पोचायचे कसे?
बेडी पायात काचते

मुक्तक

(ताज्या घडामोडी~ एप्रिल फूल २०२५)

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
15 Apr 2025 - 1:28 pm

चार भिडू डावे
उजवेही चार
कुंपणाच्या वर
दोन भिडू

भिडू भिडतात
त्वेषे परस्परा
मौज ही इतरा
फुकटची

राजकारणाच्या
व्यतिरिक्त काही
घडतची नाही
देशात ह्या

ऐसा आविर्भाव
भिडू बाळगती
आता झाले अती
हौस फिटे

संस्कृतीमुक्तकविडंबनसमाजजीवनमानराजकारणमौजमजा

(पावश्या लवकर आलाच आहे तर.....)

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
31 Mar 2025 - 1:56 pm

हे ताडपत्रीवाल्या,
गतसाली न खपलेल्या मालावरची धूळ झटक

हे पाणीपुरवठा खात्यातल्या टेंडर बाबू,
फिल्टर सफाईच्या निविदांच्या नैवेद्यांची ताटे सजव

हे वृक्षसंवर्धन खात्यातील खात्यापित्या लोकसेवका,
ट्री ट्रिमिंग च्या निमित्ताने कोणते वृक्ष भुईसपाट करायचे ते बिल्डरांबरोबर ठरव

हे नगर सेवका,
नालेसफाईच्या हातसफाईवरच्या श्वेतपत्रिकेचा कच्चा खर्डा बनवायला घे

हे पालक मंत्र्या,
महापुरोत्तर अन् भूस्खलनोत्तर सहसंवेदनांचे वार्षिक भावविभोर सांत्वनसंदेश बनवायला घे

मुक्तकसमाजजीवनमानमौजमजा

पावश्या लवकर आलाय का......!!!!

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
30 Mar 2025 - 6:06 am

gudhi
----
हिंदू नूतन वर्षाच्या मिपाकरांना हार्दिक शुभेछा .
------

मुक्तकप्रकटन

"माझी मदतनीस"च्या निमित्ताने

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
22 Mar 2025 - 9:08 am

मी मिपावर लिहिलेल्या "माझी मदतनीस" या लेखावर खूपच मस्त चर्चा रंगली. या लेखावर जवळपास पंचेचाळीस प्रतिसाद आले आणि अडीच हजार वाचने झाली.

मी सहज सुचलं म्हणून , मनात हा विषय काही दिवस घोळत होता म्हणून, हा लेख लिहिला. त्यावर इतकी चर्चा झालेली पाहून मला आनंद झाला. या प्रतिसादांमध्ये काही डाव्या तर काही उजव्या विचारसरणीचे, तर काही मध्यममार्गी,तर काही तटस्थ मतप्रवाह होते.

मुक्तकसमाजप्रकटनविचार

माझी मदतनीस..

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
10 Mar 2025 - 11:41 am

मी माझ्या घरी काम करणाऱ्या बाईला कधीच, कामवाली, मोलकरीण, धुणीभांडीवाली, झाडूपोछावाली असं म्हणत नाही. मी त्यांच्या तोंडावर त्यांना त्यांच्या नावाने हाक मारते आणि त्यांच्या मागे त्यांचा उल्लेख माझी मदतनीस, माझी साहाय्यक, माझी असिस्टंट असा करते. माझा मुलगा, सून, नातू हेही त्यांना ताई किंवा बाई, काकू, मावशी अशी त्यांच्या वयाकडे बघून हाक मारतात. त्यांना अहो जाहो करतात.

मुक्तकसमाजजीवनमानप्रकटनविचार

द स्टोरीटेलर (सिनेमा)

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
7 Mar 2025 - 10:28 pm

कोणतीही गोष्ट अभ्यास करून नाकारायची किंवा स्वीकारायची असा माझा पिंड आहे.मी बरोबरीनेच उजव्या विचारसरणीचा अभ्यास करताना त्यासंबंधी पोस्ट व्हायच्या.डायटविषयी समजून घेतांना वैज्ञानिक पोस्ट असायच्या.भारतीय तत्वज्ञानचा, पाश्चात्य तत्वज्ञान वगैरे वगैरे त्यावेळी तशा.. गंमत म्हणजे जे काही आकलन‌ ते इथे खरडायची खोड असल्यामुळे ज्या त्या वेळी ते वाचून मी तशीच आहे असा इथे अनेकांचा गैरसमज होतो.
असो कधीही टोकाला न जाता सगळ्या विचारसरणीत मी सम्यकता शोधत असते.

कथामुक्तकआस्वाद

हे जीवन सुंदर आहे...मराठी भाषा गौरव दिन.

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
27 Feb 2025 - 8:11 pm

"फुलांच्या त्या धुंद रंगोत्सवात चांदणीएवढे दिसणारे निळे फूल, शालीनपणे उमलले. त्याच्या तरल नाजूक वासाने वाऱ्याचे मन मोहरले.काळ्या पंखांवर लाल ठिपके असलेले एक फुलपाखरू इतर फुलांना सोडून त्याच्याकडे आले व त्यावर स्थिरावले. थोड्या अवकाशाने त्याचा गंध पाझरला,रंग कोमेजला आणि अंग आकसून फूल जमिनीवर गळाले. "हे तुझं आयुष्य! क्षणाचा रंग, क्षणाचं जीवन!" तेथून उडून जाताना फुलपाखरू म्हणाले.

मुक्तकविचार

शब्दांचा दंश जिव्हारी

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
13 Feb 2025 - 10:52 am

शब्दांचा दंश जिव्हारी-
होता मी विमुक्त झालो
माथ्यावर सूर्य तरीही
काजव्यासवे झगमगलो

शब्दांची अविरत गाज
भवताल भारूनी उरली
नादावर अनुनादाची
हलकेच लहर शिरशिरली

शब्दांचा अबलख वारू
चौखूर उधळुनी गेला
अर्थाचा लगाम लहरी
हातून कधीचा सुटला

मुक्तक

शोध

शाहिर's picture
शाहिर in जनातलं, मनातलं
24 Jan 2025 - 9:30 pm

गंगाेत्त्रीच्या त्या बर्फाच्छादित प्रदेशात सूर्य अस्ताला जात होता. हिमालयाच्या शांत, पण भीषण वातावरणात मी विचारमग्न होऊन चालत होतो..घर सोडून 9 महिने होऊन गेले होते. आयुष्याच्या गुंत्यात गुरफटलेलो, अपराधी भावनेने पछाडलेलो. काहीतरी हरवले होते माझे पण शोधायचे कुठे ते कळत नव्हते त्याचा शोध घेत मी इथवर आलो होतो.

"कोणता शोध आहे तुझा?"

एक शांत, पण गूढ आवाज ऐकू आला. मी वर पाहिलं. समोर शुभ्र वस्त्रांमध्ये एक योगी उभा होते.. पांढर्‍या दाढीचे लाटा वाऱ्यासोबत हेलकावत होते. त्यांच्या डोळ्यांत खोल तलावासारखी शांती होती.

"माहिती नाही" विषण्णतेने उद्घागरलो..

कथाबालकथामुक्तकप्रकटन