गीतारहस्य चिंतन-प्रकरण ७ कपिलसंख्याशास्त्र किंवा क्षराक्षरविचार
गीतारहस्य-७
कपिलसंख्याशास्त्र किंवा क्षराक्षरविचार
वेदांतींनी कणाद यांच्या परमाणु' सिद्धांताऐवजी कपिलाचार्यांचा सांख्य सिद्धांताला अद्वैत सिद्धांत न सोडिता बऱ्याच अंशी ग्राह्य धरले आहे.
सांख्य शब्दाचा अर्थ-
१.सांख्य हा शब्द सं-ख्या धातूपासून निघाला असल्यामुळे त्याचा पहिला अर्थ मोजणारा असा होतो. कपिलशास्त्रांतील मूलतत्वे 'पंचवीस' असल्यामुळे त्यांस 'मोजणारे' या अर्थी सांख्य विशिष्ट नाव मिळाले.
२.नंतर सांख्य म्हणजे सामान्यतः तत्त्वज्ञान (सर्व प्रकारचे)
असा व्यापक अर्थ बनला.