अण्णांना मानवंदना..

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
3 Jan 2009 - 5:12 pm

अण्णांना मानवंदना..!

इच्छुकांनी वरील संस्थळावर येऊन अण्णांना लेखी मानवंदना देण्याचे करावे..

राष्ट्रपतींच्या हस्ते अण्णांना भारतरत्न हा किताब मिळाल्यावर वरील मानवंदनांचे संकलन करून त्या पुस्तकरुपाने अण्णांना देण्याची सदर संस्थळ चालकांची योजना आहे..

आपला,
(भीमसेनभक्त) तात्या.

संगीतप्रकटनमाध्यमवेधमाहितीप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

विनायक पाचलग's picture

3 Jan 2009 - 5:24 pm | विनायक पाचलग

तात्या,
सवडीने नीट मानवंदना लिहिनच
पण लय भारी उपक्रम
मनापासुन शुभेच्छा

विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले

आनंद घारे's picture

3 Jan 2009 - 7:21 pm | आनंद घारे

मी पामराने पं.भीमसेन जोशी यांना मानवंदना देणे हा म्हणजे "तुझा उजेड किती लख्ख आहे" असे सूर्याला सांगण्यासारखे आहे. आण्णांच्या संबंधातल्या कांही व्यक्तिगत आठवणी मी एका लहानशा लेखात शब्दबद्ध केल्या होत्या. तो लेख या निमित्याने साहित्यात पाठवीत आहे. वाटल्यास त्यातील कांही भागाचा विचार करावा.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/

केशवराव's picture

4 Jan 2009 - 5:32 am | केशवराव

तात्या , अतिशय स्तुत्य उपक्रम!
माझ्या आयुष्याची अनेक वर्षें ज्या संगितमय व्यक्तिमत्वाने व्यापली , माझ्यासारख्या अनेक सामान्य माणसांचे आयुष्य सुस्वर केले, कित्येकांना दु:खांत दिलासा दिला,सुखांत साथ दिली , त्या स्वरभास्कराला त्रिवार वंदन!

विसोबा खेचर's picture

4 Jan 2009 - 9:10 am | विसोबा खेचर

माझ्या आयुष्याची अनेक वर्षें ज्या संगितमय व्यक्तिमत्वाने व्यापली , माझ्यासारख्या अनेक सामान्य माणसांचे आयुष्य सुस्वर केले, कित्येकांना दु:खांत दिलासा दिला,सुखांत साथ दिली , त्या स्वरभास्कराला त्रिवार वंदन!

केशवराव, आपली वरील प्रतिक्रिया थोडक्यात परंतु अत्यंत बोलकी अन् चपखल वाटते. मला विचाराल तर नेमकी हीच प्रतिक्रिया आपण त्या संस्थळावरही द्यावी असे वाटते..

आपला,
(अण्णांचा भक्त) तात्या.

मॅन्ड्रेक's picture

5 Jan 2009 - 5:52 pm | मॅन्ड्रेक

अभंग व्यक्तिमत्व.
ह्या प्रतिभेपुढे काहि नाहि.