दिड वर्षांपूर्वी मला स्वप्नात देखिल वाटले नव्हते की, मी एम् टेक करण्यासाठी ओडिसा राज्यात जाईल. ज्या राज्याचा उल्लेख फक्त महानादीच्या पुरापूरता आणि रथ यात्रेपूरता येतो, त्याच राज्यात एक भारत सरकारच्या कायद्यानुसार राष्ट्रीय महत्वाचे इंजीनियरिंग महाविद्यालय आहे, राष्ट्रीय तंत्रद्न्यान संस्था, राऊरकेला , हे त्याचे नाव.
असो, मी मिसल पावचा नुकताच सदस्य झालो, भटकंती हा माझ्या अनेक छंदान्पैकी एक, म्हणुन सुरुवात करतांना या राज्याचे सौंदर्य मी आपल्या समोर ठेवत आहे.
ओडिसा राज्य जितके निसर्गसुन्दर तितकेच कमालीचे विरोधाभासी आहे. एकीकडे सम्पन्न असा किनारी प्रदेश तर दुसरीकडे अतिशय मागास असा पश्चिम भाग. किनारी प्रदेश शेती, शिक्षण, आणि वाहतुकीच्या सुविधेमुले पुधारलेला तर पश्चिम भाग नक्सलवाद, अशिक्षण, आदिवासींना लुतनार्या खानिच्या कम्पन्यान्मुले मागासलेला. आशा या राज्यात अनेक सहलिची ठिकाने आहेत. मी माझ्या वार्गमित्रान्सोबत अनेक ठिकाणी गेलो, त्यापैकी काहींची माहिती देत आहे.....
१. राऊरकेला
हे शहर ओडिसा चे तीसरे महत्वाचे शहर असून या राज्याची औद्योगिक राजधानी आहे. अतिशय घनदाट जंगल असलेले निसर्गसंपन्न वातावरण आणि विपुल खनिज संपत्ति असलेल्या या भागात १९५८ मधे भारत सरकारने स्टील प्लांट सुरु केला आणि सुनियोजित असे राऊरकेला शहर वसवले. याच दरम्यान इथे रीजनल इंजीनियरिंग कॉलेज सुरु करण्यात आले. हेच कॉलेज आता राष्ट्रीय महत्वाचे असे नेशनल इंस्टिट्यूट ऑफ़ टेक्नोलॉजी म्हणुन देशातील उत्तम कोलेजान्मधे प्रसिद्ध आहे. या शहरात आणि जवल अनेक सुंदर ठिकाने आहेत. अभ्यासातून वेल काढून आम्ही मग भटकंती करण्यासाठी बाहेर पडत असू...
हनुमान वाटिका:
हे उद्यान राऊरकेला स्टील प्लांट ने वसवले आहे. याचे ख़ास वैशिष्ठ्य म्हणजे ७२ फ़ुट हनुमानाची मूर्ति. मूर्ति अतिशय प्रसन्न असून, बांधनी आकर्षक आहे. खरे पाहता हे उद्यान अनेक आकर्षक मंदिरांचा समूह आहे.
वेद व्यास :
व्यास मुनिन्च्या चरणाने पावन झालेले हे स्थल अतिशय सुन्दर आहे. या ठिकाणी व्यास मुनिंची एक गुहा आहे. "शंख", "कोयल" आणि जमिनीतून येणारी "सरस्वती" आशा तिन नद्या इथे एकत्र येतात आणि "ब्राह्मणी" या नावाने पुढे वाहतात.
वैष्णो देवी:
राउरकेला रेलवे स्टेशन पासून जवलच हे ठिकान एक टेकडीवर वसले आहे. येथून राउरकेला शहराचे विहंगम दृश्य दिसते. काश्मीर मधील वैष्णो देवी प्रमाणेच हे मंदिर बांधण्यात आहे. साधाराण ५०० पायर्या चढून गेल्यावर आपण देवीच्या गुहेत प्रवेश करतो. हे सर्व बांधकाम कृत्रिम असले तरीही आकर्षक आहे.
खंदाधर:
राउरकेलाच्या आस पास असलेल्या स्थालान्पैकी हे माझे सर्वात आवडते ठिकान आहे. अतिशय घनदाट जंगल, उंचच उन्च पहाड़ आणि त्या मधून कोसलनारा प्रपात. आयुष्यात एकदातरी इथे गेलेच पाहिजे असे माझे मत आहे. विशेष म्हणजे हा धबधबा वर्षभर चालू असतो. १० जानेवारीला भर सकाली थंडित आम्ही कॉलेज मधून प्रयाण केले. साधारण दोन तासानी आम्ही खंदाधरला पोहोचलो. धबधबा असा कही डोंगरात लपला आहे की जवल जाईपर्यन्त दिसतच नाही. जेव्हा पोहोचलो तेव्हा डोळ्याचे पारणे फिटले. सर्वत्र मन्द धुके पसरलेले होते आणि नेमक्या आशा वेळी त्यावर सुर्याची कोवळी किरणे पडली आणि त्याच्या त्या चमकत्या रुपवारून नजर हटेना. ( आशा वेळी नेमका माज्या कामेर्याचा zoom कमी पडला. Bad luck दुसरे काय?) त्या निबिड़ आरन्यातुन वाट काढत मग आम्ही फेसालनार्या प्रपाताजवल पोहोचलो. माझे तेलुगु मित्र तर फारच खुश होते. आयुष्यात प्रथमच इतके सुन्दर स्थल ते पाहत होते. मग काय...त्या धब्धाब्याखालील कुंदात आम्ही उड्या टकल्या. बर्फासारखे थंड पाणी पण त्या वातावरानात कशाची ही फिकिर वाटत नव्हती. मनसोक्त अंघोळी करुन मग आम्ही सोबत नेलेल्या आचार्याने बनविलेले सुग्रास भोजन केले. ते वनभोजन मी कधीही विसरणार नाही....
असा हा धबधबा राउरकेलपासुन साधारण ११० किलोमीटर अंतरावर आहे. हा धबधबा भारतातील चौथा सर्वात उन्च धबधबा असून त्याचा मुख्य धारेची उंची २४४ मीटर आहे.
प्रतिक्रिया
21 Jan 2009 - 11:46 pm | लिखाळ
स्वानंदराव,
सुरुवात चांगली आहे. लेख पूर्ण करा लवकर चित्रे पाहण्यास उत्सुक आहे.
मिपा तंत्रज्ञ, चालक, संपादकांस विनंती -
अप्रकाशीत ठेवा ही कळ दिसते पण ती उपयोगी पडत नाहिये. अनेक नव्या सदस्यांचे आणि काही जुन्या सदस्यांचे देखील लेखन त्यामुळे आधीच प्रकाशीत झाले आहे. मिपाच्या तंत्रज्ञांनी कृपया याकडे लक्ष द्यावे ही विनंती. अप्रकाशित ठेवण्याची सोय देणे काही कारणाने शक्य/गरजेचे नसेल तर लेखन करताना ती कळ दिसलीच नाही तर बरे होईल.
-- लिखाळ.
24 Jan 2009 - 7:18 pm | संजय अभ्यंकर
ओडिसा मध्ये अनेक सुंदर प्रदेश आहेत.
त्यातला एक म्हणजे कोरापुट जिल्हा. हाभाग डोंगराळ असुन ट्रेकिंग साठी उत्तम!
ट्रेकींगवेड्या महाराष्ट्राचे लक्ष येथे कसे गेले नाही हे आश्चर्यच आहे.
कोरापुट जिल्ह्यात HAL चा इंजिन कारखाना तसेच NALCO चा अल्युमिनिय कारखाना आहे.
हि.ए.लि. मुळे तेथे मी वरचेवर जात असतो. कोरापुट जिल्ह्याची सरसरी उंची १०००मी. आहे.
निसर्गरम्य प्रदेश परंतु, टूरिझमची पिडा नसल्यामुळे फार शांत असा प्रदेश.
येथल्या डोंगररांगा मधले सर्वोच्च शिखर म्हणजे देवमाली, त्याची उंची १७५०मी. च्या आसपास आहे.
शिखरावरून, भोवतालच्या परिसराचे सुंदर दृष्य पहावयास मिळते. येथे जाण्यासाठी १२ महिन्यातला कुठलाही काळ चालतो.
सर्वोच्च तापमान ३० अंश से. ते सर्वात कमी ३ ते ४ अंश से.
गंमत म्हणजे तापमान ३० अंशा जवळ रेंगाळ्ले की पाऊस सुरु होतो व वातावरण आल्हाददायक होते.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
26 Jan 2009 - 9:46 pm | SwanandSolanke
Thank you...you have given very nice info...i will sure try to visit that place...