कंटाळा
एके दुपारी आम्ही कार्यालयात टंगळमंगळ टोलवाटोलवी इत्यादी महत्वाची कामं करत बसलो असतानाच शेजारचे रावसाहेब नामक समवयस्क सहकारी मित्र बोलले की, "पाटील, आज जरा कंटाळाच आलाय बुवा."
एके दुपारी आम्ही कार्यालयात टंगळमंगळ टोलवाटोलवी इत्यादी महत्वाची कामं करत बसलो असतानाच शेजारचे रावसाहेब नामक समवयस्क सहकारी मित्र बोलले की, "पाटील, आज जरा कंटाळाच आलाय बुवा."
सगळ्यांत जास्त काय वाईट?
सवय..!
जागेची माणसांची झाडांची रस्त्यांची
बारची वाईन शॉपींची
पानटपऱ्यांची थिएटरांची जगण्याची..
शहर सोडताना अवघड जातं मग
शहर काही वाईट नसतं..
पण नाही जमत एखाद्याला मूळं रूतवायला
किंवा झगडायची उमेद खलास होत जाते हळूहळू
आणि कळतं की आता जावं लागेल..
पेर्णा
मित्रों......
तुम्ही म्हणालात, लॉकडाऊन मुळीसुध्दा आवडत नाही.
व्हायरस फिरतोय सगळीकडे, घरी निवांत बसवत नाही.
ऐकून इकडे माझ्या समोर काळे फंगस दिसू लागले
प्रवचणार होतोच नॅशनली पण व्हीसीवर भागवून दिले.
लॉकडाऊन म्हणजे शहाणपणा, माझ्या वस्तादीत तुझी कुस्ती
लॉकडाऊन म्हणजे सिरमची लस, अर्धी महाग अर्धी सस्ती
लॉकडाऊन म्हणजे तत्वज्ञ मी, थोडा गुरु थोडा टागोर,
लॉकडाऊन म्हणजे अठरा तासाची लावत बसतो रोज लगोर.
तू जीव माझा -
तू प्राण माझा -
घ्यावया
नच होतीस आली
मालूम होते मला
शौच्यालयात घुसता
मग सावरून बसता
मोबाइलात रमता
आलीस तू अवचिता
जवळि जवळ येता
मग कडकडून डसता
मम उष्ण रक्त प्रशिता
मेरा चैन-वैन सब लुटिता
वाजवून टाळिका
मी जीव तुझा - मी प्राण तुझा
- हरिला -
अल्विदा मच्छरिनी -
अल्विदा.
सावर्डे - नाशिक, पालघर अन् ठाणे जिल्ह्याच्या टोकावरलं आदिवासी गावं. . . पुर्णत: जंगलात. तीन डोंगरांच्या मध्ये दरीत वसलेलं. वस्ती १२५ कुटुंबांची. अजुनही बारमाही रस्ता नाही. म्हणजे आता पावसाळ्यात चार महीने गाडी घेवुन या गावात जाता येणार नाही. अशी परिस्थिती होती सन २०१८ पर्यंत. सावर्डे गाव गेल्याच वर्षी रस्त्यानं जोडलं गेलयं, ते स्वातंत्र्यानंतर तब्बल ७२ वर्षांनी. मोखाडा तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायती अंतर्गत असलेलं सावर्डे गावात पोहोचायला दरीतील घाट उतरुन जावं लागतं.
हे वाह्यात लेखन http://www.misalpav.com/comment/1088367#comment-1088367 इथं प्रतिसादात लिहिल होतं...त्याला शेपरेट प्रशिद्ध करतोय.....
माझ्या एका परिचितांनी ऑनलाईन मिटींगमध्ये बॉसना कोरोनाचे वादळ कधी पर्यंत घोंघावणार, आपण जुन्या नॉर्मलला कधी जाऊ असे विचारले, बॉसने लगेच त्यांची इम्युनॉलॉजीस्टशी झालेल्या चर्चेचा दाखला देत अजून दिड एक वर्षात सगळं पुर्वी सारखे नॉर्मल असेल असा विश्वास दिला आणि ऑनलाईन मधली सगळी मंडळी सुखावली. लगोलग व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीतून रशियन लस तयार असल्याची बातमी अगदी उद्यापासून उपलब्ध असल्याचा भास निर्माण करेल अशी फिरली.
....पण थांबा जरासे वस्तुस्थिती कदाचीत बरीच वेगळी असण्याची शक्यता आहे.
शेजारील काकी, सगळ्या दुनियेसाठी कशाही असो, पण माझ्या घरातील सगळ्यांना त्या नेहमी वात्सल्य मायेने बघतात. आमची कधी काही तू तू मै मै होते पण त्यात, त्याचे आमच्या वरील वात्सल्य प्रेम कधी कमी झाले नाही.
आज ऑफिस कामातून कम्पलसरी सुट्टी घ्यायची होती. लॉकडाउन काळात एम्प्लॉयी वर्क फ्रॉम होम करीत असल्यामुळे, सुट्टीच घेत नाही, हे मॅनेजमेंटच्या लक्षात आले. तेव्हा एक दिवस कम्पलसरी सुट्टीचा नवीन नियम लागू झाला. हे कंपल्शन एम्प्लॉयी, की एम्प्लॉयर कोणच्या हिताचे, यावर फाटे पाडल्यापेक्षा, दोघांनाही एक दुसऱ्यापासून, एक दिवस मुक्ती, आराम, एक दुसऱ्यासाठी बाळगलेली काळजी, असे समजून "इट्स विन विन सिच्युवेशन फॉर बोथ" असे मानायला हरकत नाही. मग आजचा दिवस काही मार्गी लागतो की नाही ते बघायला हवे.
रोजरोज ईज्जतिचा भाजीपाला न होऊ देता, घरमालकाकडे आंघोळीले, त्याच्या घरातून बाथरूम मदे जाण, हे काई आता जमत नॊत. त्यातल्या त्यात आमी तिघेही पयल्यान्दाच घरा बाहेर राहायले आलो होतो. मग अशात काहीतरी फालतू गोष्टी वरून, वाद होणार नाई त मंग ती दोस्ती कायची? नेहमी अनोळखी लोकांपेक्षा जे आपल्याले लय लाड करतात, जाच्यावर आपला हक्क आहे अस वाटते, अन मंग जर त्याने आपली मर्जी राखली नाई, त दुःख होऊन, राग याले लागतो, त्यातूनच भांडण होतात. अशाच कुठल्यातरी फालतू कारणामुळे, मी दुसऱ्या कुठल्यातरी मित्रांसोबत रूम शिफ्ट केली.