पाऊले चालती … विडंबन
पाऊले चालती बीजेपीची वाट
सद्य पक्षाची सोडूनिया साथ
गांजुनिया भारी इडी चौकशीने
पडता हातात बेड्यांची माळ
पाऊले चालती …
अण्णा आबा नेते कार्यकर्ते ते
पाहुनिया सारे फिरविती पाठ
पाऊले चालती …
येता होकार श्री पक्षश्रेष्ठींचा
तसा चौकशीचा व्हावा नायनाट
पाऊले चालती …
सारे शांत होता पुन्हा लागे ओढ
तस्सा वाहू लागे भ्रष्टाचाराचा पाट
पाऊले चालती …