विडंबन
सर आले दुरूनी
विझल्या सगळ्या त्या सिगरेटी
सर आले दुरूनी
विझल्या सगळ्या त्या सिगरेटी
सर आले दुरूनी
निघती ठसके जोराचे
तशात घाबरल्या पोरांचे
कुजबुजही थांबली पोरींची
पाचावर बसली सगळ्यांची
ऐशा रमलेल्या त्या स्थानी..
बोचती सरांचे ते कटाक्ष
संपले, गालावर हासू मावळले
होता हृदयाची दो शकले
बोटातुन सिगरेट ओघळले
घाली फुंकर हलकेच कुणी..
सर आले दुरूनी
सर आले दुरूनी
अवसान पायीचे मग(पूर्ण) गळे
प्रतिसाद कसा द्यावा न कळे
विचारांनी पुन्हा मग (सारे) घाबरले
शोधूया चुगली का केली कुणी ..
सर आले दुरूनी
विझल्या सगळ्या त्या सिगरेटी
सर आले दुरूनी
विझल्या सगळ्या त्या सिगरेटी
सर आले दुरूनी
डिस्क्लेमर:
१. ठिपसे असे एक आडनाव असते.
२. इथे केवळ मीटरमध्ये बसवायला आणि यमक जुळवण्यासाठी घेतले आहे.
३. त्यामुळे त्यावरून कृपया गैरसमजूत नको.
४. मूळ कविता आवडली आहेच, त्यामुळे कवींनी माफ करावे.
प्रेरणा..
पालिकेतले कळकट ठिपसे
काळ्या मळक्या फाईलींच्या
ढीगात घुसूनि
हरवण्याच्या
थोडे आधी
तिथून निघूया,
पण ठिपश्यांच्या साहेबाला,
खात्यापित्या ज्यूनियरांना
सहकार्याचा
कंठ फुटेतो
जरा बसूया
मग बोलूया,
अन् ठिपश्यांची मंजुरीही
पाकीट पाहून विकांताच्या
थोडी आधी
जलदगतीने
नीट मिळू दे
मग थांबूया
१
कोणा आटपाट शहराच्या
आटपाट गल्लीतील
आटपाट मिरवणूकीत
फेटा घालून ढोलचा ताल
साद दिली 'लय भारी'
रक्षकाने धक्का दिला
पतल्या गल्लीतून
तो सरळ रस्त्यावर परतला ;)
पण ती संध्याकाळ
तो फेटा तो ढोलचा ताल
ती साद तो धक्का
कुणा मनाच्या
कोणा कोपर्यातून
जाण्याचे नाव घेत नाही.:)
२
काय कराव? गणित सोडलं बॅलन्सशिट घेण्याचा प्रयत्न केला ना मेळ ना ताळ जमलेल्या संध्याकाळच्या infinite बडबडीत नक्कीच हरवून गेलो असतो पण इस गली उस गली मन भटकत राहीले तेव्हा कविता लिहू लागलो.
कवी " बी " यांना विनम्र अभिवादन
धागा चालेना, धागा पळेना
धागा संथ चाली, काही केल्या पेटेना
गेलो ट्यार्पीच्या बनी
म्हंटली ट्रोलांसवे गाणी
आम्ही सुरात सूर मिळवून रे
गेलो डू-आयडीच्या बनी
डूख धरला मी मनी
ट्रोलांसवे गळाले आयडीभान रे
चल ये रे, ये रे ट्रोल्या
टोचू उचकवू घालु काड्या
टाकू पिंका पिंक पोरी पिंक पोरी पिंक
हे मिपाचे अंगण
अम्हां दिले आहे आंदण
ट्रोलिंग करू आपण सर्वजण रे
आयडी विषयाचे किडे
यांची धाव प्रतिसादाकडे
आपण करू शुद्ध "पिंक"पान रे
धागा पेटला आला बहरून
ट्रोलांनी दिला विषय भरकटून
कोण मी - ट्रोल? कोठे डू-आयडी जण रे
प्रेरणा
माणसे इंजिनिअर होऊन येतात
एकएक हट्टी सेमिस्टरे
अटीतटीने लढवून ठेवतात,
दोन वर्षांमध्ये
एखादे ईयर डाऊन
विसावा म्हणून ठेवून जातात...
माणसे इंजिनिअर होऊन येतात
ज्ञानबिन भिरकावून
केवळ परीक्षार्थी होऊन
रात्रभर GT मारत बसतात
उजाडताना परत
सिगरेटच्या धूरात
गुडूप होतात......
माणसे इंजिनिअर होऊन येतात...
पेरणा...अर्थातच
एक आई दाराआडून बघते आहे बाहेर
किती बाहेर?
कॉलनीच्या बाहेर, ग्राऊंडच्या पार
जिथे एक मुलगा खेळतो आहे मुग्ध....
करत असेल का तो तिचा काही विचार?
येत असेल का तो ही
खेळण्यातून बाहेर, ग्राऊंडच्या अलीकडे?
आईला दाराआडून बाहेर यायचं नाही...
मग ती वेताची काठी हळूच चाचपते,
ती काठी पाठीत घेऊन
मुलगा अविश्रांत कोकलत राहतो....
काठी सापडलेली आई
सताड उघडलेल्या दाराआडून सुतत राहते...
सुततच राहते....
-चमचमचांदन्या
मूळ प्रेरणा: काॅफी ही निमित्तमात्र..
(मूळ कवयित्री प्राची अश्विनी यांची माफी मागून)
मग पुढे असं होतं की ..
दातामधलं अंतर वाढत जातं.
डोळ्यामधला नंबर वाढत जातो.
बोळक्यामधलं हसू निवत जातं...
नावं होतात विसरायला..
आणि घरचे लागतात रागवायला..
फुफ्फुस लागतं धापा टाकायला..
असं होऊ नये म्हणून भेटायचं..
डॉक्टर हा निमित्तमात्र..
काळ्या पिशवीत पिशवीत
(श्री विठ्ठल वाघांची क्षमा मागून)
काळ्या पिशवीत पिशवीत बॉटल हालते
बॉटल हालते बॉटल हालते
बाईल थयथया नाचते दोस्त घरी बोलवितो
घरी बोलवितो दोस्त घरी बोलवितो
घरन बाबा हाकलतो छंदी फंदीच्या जोडीला
जिभे सरसती नाचे घोट जाताच पोटाला
तरतरी मना येते मती न्हाती धूती होते
रंगीत पान्याच्या वासाची चाहूल आवशीला जाते
भय जिवाला पडते वाट दोस्ताची लागते
दोस्त बॉटल झाकतो मी चकना लपवितो
दोस्ता र आता कलटी र आता पळूया र माझ्या राज्या
पानी खिडकीतन वोतून वाट गुत्त्याची चालूया
तिथे उधार चालेना नगद लागते
अन्ना शेट्टीच्या गूत्त्यात चाल 'पेया'च पूजन
तिथ डोलकर हालती जनू करती भजन
जवा रंगीत पान्यात स
( सुरेश भट _/\_ )
चल उठ रे बेवड्या
झाली सांज झाली...
बाहेर दारू गुत्त्यांना
हलकेच जाग आली
उघडले कधीचे
गुत्त्यांचे द्वार बंद
अन् चोरपावलांनी
आला देशीचा गंध
गल्ल्यावरी गुत्त्याच्या
आंटी येऊन बसली...
बाहेर दारू गुत्त्यांना
हलकेच जाग आली
चल लवकरी आता
पहिल्या धारेचा सहारा
मोसंबी नारंगी ठर्रा
करती तुझा पुकारा
सज्ज साथ देण्या
पापड अंडी चकली...
बाहेर दारू गुत्यांना
हलकेच जाग आली
तव याद करिती सारी
बेवड्यांची मांदियाळी
घे एक घोट नवटाक
चिंता सर्व जाळी
तुज शोधण्यास वेडी
बायको पुन्हा निघाली...
बाहेर दारू गुत्यांना
हलकेच जाग आली