होऊंदे खर्च
तांब्याधिपतींना अर्पण..
*|| फक्त तू खचू नकोस ||*
रडू नकोस चिडू नकोस
टमरेल घेऊन फिरु नकोस
गुर्जीनं सांगितलंय म्हणून...
बाकी खर्च करु नकोस
संधी मिळेल तुलाही,
लगेच हिरमसु नकोस,
बिंधास दरवाजा खटकव
फक्त तू खचु नकोस...
रोज नव्याने लागते (रांग)
रोज नव्या तेजाने
रांगेतच ऊभा राहा
रोज नव्या जोमाने
येणे जाणे रितच इथली,
हे तू विसरु नकोस ...
बिंधास दरवाजा खटकव
फक्त तू खचु नकोस...
तुझ्या टमरेलकडे वळणारे
कितीतरी हात आहेत
अरे तेही तुझ्यासारखेच
पाणी त्यांना देऊ नकोस