गझल

परखड

नाहिद नालबंद's picture
नाहिद नालबंद in जे न देखे रवी...
1 Dec 2025 - 12:32 pm

यामुळे वाट्यास माझ्या रोज परवड
बोलतो कायम म्हणे मी फार परखड

वेळ येता कर्जमाफीची बळीच्या
मग तिजोरी शासनाची जाम खडखड

एकही नेता गुणी ना भ्रष्ट सारे
भाषणे आता तयांची हीन बडबड

इंग्रजीला शक्य तितकी टाळतो मी
टिकविण्या करतो मराठी हीच धडपड

यामुळे हरकत तयांची लेखनाला
वापरत नाही कधी मी शब्द जडजड

gazalगझल

या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला (तरही)

नाहिद नालबंद's picture
नाहिद नालबंद in जे न देखे रवी...
2 Nov 2025 - 10:55 am

सानी मिसऱ्याची ओळ क्रांतिताई (क्रांति साडेकर) यांची,
तरही साठी ओळीबद्दल आभार, त्यांना न विचारता ही ओळ वापरली त्याबद्दल क्षमस्व! ओळ वाचून नाही राहवलं.
===================================
त्याच वाटेवर जुन्या भटकायचे नव्हते मला
(या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला)

पेन्शन खातेच मी बदलून गावी घेतले
आणखी शहरात त्या राहायचे नव्हते मला

मी मुलांना मारले अन शिस्त करडी लावली
देशवासी कमकुवत घडवायचे नव्हते मला

नवकवी बोलावला नाहीच त्यांनी एकही
मैफलीला त्यामुळे ह्या जायचे नव्हते मला

gazalगझल

बघ

नाहिद नालबंद's picture
नाहिद नालबंद in जे न देखे रवी...
21 Oct 2025 - 10:01 am

बघ
ती सावलीच ठरली वरचढ उन्हावरी बघ
माझाच जीव जडला माझ्या व्यथेवरी बघ

वारीत पांडुरंगा सावध रहा जरा तू
मारेल चोर डल्ला तुझिया विटेवरी बघ

म्हणतात जे मराठी चित्रपट अता न चाले
नसते पकड जराही त्यांची कथेवरी बघ

साहेब जे कधीही दिसले मुळी न मजला
होते हजर परंतू कायम पटावरी बघ

वाऱ्यामुळे खरेतर पडली कळी उमलती
आरोप त्या बिचाऱ्या आला दवावरी बघ

करतात यार आग्रह बहुतेक याचसाठी
मी बोलतो खरे ते, थोडी पिल्यावरी बघ

gazalगझल

पश्चिमाई

कुमार जावडेकर's picture
कुमार जावडेकर in जे न देखे रवी...
2 Dec 2024 - 1:38 am

पूर्वरंगांची जुन्या प्रतिमा नवी ही पश्चिमाई
शब्दवेलींना नवेली पालवी ही पश्चिमाई

विस्मृतींचे दाटती काहूर जेव्हा अंतरी या
भोवताली फेर धरते लाघवी ही पश्चिमाई

चोरुनी बघता हिला मी चोरते नजरा कधी ही
खेळते नेत्रांतुनी का पल्लवी ही पश्चिमाई

बोलते, हसते तशी, रुसते कधी फुगते कधी ही
सांग ना होते कशाला मानवी ही पश्चिमाई

कोण तू अन् कोण मी हा शोध आता संपला अन्
भासते अवघी मनाला भैरवी ही पश्चिमाई

- कुमार जावडेकर

(अलीकडेच 'पश्चिमाई' हा ब्लॉग (त्रैमासिक स्वरूपात) आम्ही यु.के.त सुरू केला. त्याच्या दिवाळी अंकासाठी लिहिलेली ही गझल.)

gazalकवितागझल

( वर्दी )

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
18 Sep 2024 - 10:48 am

अर्धोन्मीलित डोळे, स्वप्नांची गर्दी झाली
"ती",येत आहे याची अवचित वर्दी आली

हृदयात प्रेम वारू, फुरफूरू लागला होता
मनात प्रेम ज्वर माझ्या,दाटू लागला होता

वाजे डोक्यात प्रेमघंटा,फुटती प्रितीचे धुमारे
पडे मन अंगणात,आठवांचा प्राजक्त सडा रे

झाले तप्त श्वास माझे,गात्रे सुखावून गेली
पहाटफुटणी मनीचा,अंधार विझवून गेली

नयनात श्रावण धारां,अंगी कडाडते विज
उरी दाटल्या प्रमादांचे सांगीन तीला मी गुज

नाद पैजंणाचा कानी येता,जागला प्रेम दर्दी
उघडता नयन, तया कळाले ,

आठवणीउकळीप्रेमकाव्यविडंबनगझल

साक्षीला दिवस आहे

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
12 Aug 2024 - 9:05 pm

साक्षीला दिवस आहे

दिवस आहे साक्षिला की मी न लटिकें बोलतो
एक उन्नत काजवा बघ भानुला भेवाडतो

दावितो लोकांत मी आहेस की सत्शील तू
त्याचसाठी झाकलेली मूठ पुन्हा झाकतो

आपला सन्मान असतो आपणच राखायचा
तोल सांभाळून रस्ता दृढदृष्टी चालतो

तारतम्य लागले जर हेलकावे खायला
भोवतीच्या फडतुसांना दूरदेशी हाकतो

योग्यतेला योग्यतेने पारखावी योग्यता
अभय येथे पारखी तर लाळघोटू शोधतो

- गंगाधर मुटे 'अभय'
======
बारा/आठ/चोवीस

अभय-काव्यअभय-गझलअभय-लेखनकवितागझल

बाँड आणि बांध

कुमार जावडेकर's picture
कुमार जावडेकर in जे न देखे रवी...
20 Mar 2024 - 12:58 am

विडंबन - 'बाँड'

बाँड हा वटण्यास थोडा समय आहे
आणि त्याला देणगीचे वलय आहे

बोलणे खोटे तुझे हे जाणतो मी
बातम्या मज वाचण्याची सवय आहे

सांग आता मी खरे बोलू कुणाशी
झूठ येथे बोलण्याला अभय आहे

'देश हा बदलून टाकू' ते म्हणाले
बोललो त्यांना 'कुठे हा विषय आहे?'

शासनाची का तमा मी बाळगावी?
आज झाले आत्मनिर्भर हृदय आहे

- 'सुमार' जावडेकर

माझीच मूळ गझल - 'बांध'

बांध हा फुटण्यास थोडा समय आहे
आणि मागे जीवनाचा प्रलय आहे

बोलणे खोटे तुझे हे जाणतो मी
चेहरे मज वाचण्याची सवय आहे

विडम्बनकवितागझल

सांज

कुमार जावडेकर's picture
कुमार जावडेकर in जे न देखे रवी...
25 Feb 2024 - 7:41 pm

अता आर्त हळवी हवा सांज असते
स्मृती पाखरांचा थवा सांज असते

जरी रात्र असते तुझी दाट छाया
छटांचा तुझ्या कारवा सांज असते

दिशा क्षितिज संदिग्ध करती पुन्हा अन्
पुन्हा जीवनी नाखवा सांज असते

जुने तेच ते रंग लेवून परके
समारंभ अवघा नवा सांज असते

न तू आज येथे न मी आज तेथे
अता रोज ही मारवा सांज असते

- कुमार जावडेकर

gajhalgazalकवितागझल

पाहू

नाहिद नालबंद's picture
नाहिद नालबंद in जे न देखे रवी...
13 Dec 2023 - 3:53 pm

एकदा भेटून पाहू
ये पुन्हा बोलून पाहू

मागचे विसरुन सारे
भूमिका बदलून पाहू

क्रोध, मत्सर, मद वगैरे
षडरिपू टाळून पाहू

पावतो बाप्पा म्हणे हा
चल नवस बोलून पाहू

बस जरा साथीस 'नाहिद'
ही गझल गाऊन पाहू

gazalगझल

दोन लघु कथा

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
27 Aug 2023 - 10:28 am

शेटजी, बेटा तुला कशी बायको पाहिजे? बेटा, चांदसा मुखडे वाली बायको पाहिजे. शेठजीने खूप शोध घेतला. अखेर शेटजीला चांदसे मुखडे वाली मुलगी सापडली. मोठ्या धूम धडाक्यात त्यांनी मुलाचे लग्न केले. सोबत त्यांना भरपूर दहेज ही मिळाले. शेठजी खुश होते, मुलाने सुहागरातच्या दिवशी बायकोचा घुंगट वर केला आणि दगा-दगा ओरडत शेटजी जवळ आला. तो शेटजीला म्हणाला "बाबा तुम्ही मला दगा दिला, मुलीचा चेहरा चंद्रमा सारखा सुंदर नाही. शेठजीने चंद्रयान ने काढलेला चंद्रमाचा फोटो मुलाला दाखवत विचारले, बघ असाच चेहरा आहे की नाही, की काही उणीव आहे.

विडंबनगझलसमाजविरंगुळा