बाँड आणि बांध

कुमार जावडेकर's picture
कुमार जावडेकर in जे न देखे रवी...
20 Mar 2024 - 12:58 am

विडंबन - 'बाँड'

बाँड हा वटण्यास थोडा समय आहे
आणि त्याला देणगीचे वलय आहे

बोलणे खोटे तुझे हे जाणतो मी
बातम्या मज वाचण्याची सवय आहे

सांग आता मी खरे बोलू कुणाशी
झूठ येथे बोलण्याला अभय आहे

'देश हा बदलून टाकू' ते म्हणाले
बोललो त्यांना 'कुठे हा विषय आहे?'

शासनाची का तमा मी बाळगावी?
आज झाले आत्मनिर्भर हृदय आहे

- 'सुमार' जावडेकर

माझीच मूळ गझल - 'बांध'

बांध हा फुटण्यास थोडा समय आहे
आणि मागे जीवनाचा प्रलय आहे

बोलणे खोटे तुझे हे जाणतो मी
चेहरे मज वाचण्याची सवय आहे

सांग आता मी खरे बोलू कुणाशी
झूठ येथे बोलण्याला अभय आहे

'शहर हे बदलून टाकू' ते म्हणाले
बोललो त्यांना 'जुना हा विषय आहे'

वादळाची का तमा मी बाळगावी?
आज झाले पत्थराचे हृदय आहे

- कुमार जावडेकर

विडम्बनकवितागझल

प्रतिक्रिया

भागो's picture

20 Mar 2024 - 6:38 am | भागो

दोनोही आवडल्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Mar 2024 - 9:08 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बोलणे खोटे तुझे हे जाणतो मी
बातम्या मज वाचण्याची सवय आहे

मस्त. प्रासंगिक विषयावरील रचना आवडली.
लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

रामचंद्र's picture

21 Mar 2024 - 6:19 pm | रामचंद्र

दोन्ही मस्तच.

कर्नलतपस्वी's picture

22 Mar 2024 - 9:02 am | कर्नलतपस्वी

दोन्ही मस्त आहेत.

कुमार१'s picture

9 Apr 2024 - 9:55 am | कुमार१

दोन्हीही ..