समाज

मिपा रांगोळी स्पर्धा २०१३

संपादक मंडळ's picture
संपादक मंडळ in जनातलं, मनातलं
2 Nov 2013 - 5:16 am

मंडळी,

दिवाळी आणि रांगोळीचं अगदी जीवाभावाचं नातं आहे. लहानपणी रांगोळ्या काढण्यापासूनच सार्वजनिक चित्रकलेला सुरुवात होते. रोजच्या रोज तुळशीपाशी एखादं स्वस्तिक, दाराच्या उंबरठ्यावर गोपद्म, लक्ष्मीची पाऊले असे आईने काढताना आपण बघत आलोय तरी खरी गंमत दिवाळीला असते. त्यावेळी आपल्या चित्रकारीत खरेखुरे रंग भरता येतात. लहानपणी पोपट, मांजर, फुले काढण्यापासून सुरुवात होते. मोठे झाल्यावर ठिपक्यांची रांगोळी जमवण्यासाठी धडपड असते. समांतर ठिपके कोणत्याही फूटपट्टीशिवाय काढण्याचं कसब अंगी हवं, नाहीतर ठिपक्यांचे कागद ती सोय करतात. मग रांगोळीची रेघ नाजूक हवी, रंगसंगती उठावदार हवी असे सल्ले मिळतात.

हे ठिकाणसमाजजीवनमानराहणीमौजमजाछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्रसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनआस्वादप्रतिभाविरंगुळा

माझी दिवाळी

संपादक मंडळ's picture
संपादक मंडळ in जनातलं, मनातलं
1 Nov 2013 - 7:21 pm

नमस्कार मिपाकरहो,

दिपावली अभिष्टचिंतन!

हे ठिकाणसंस्कृतीकलापाकक्रियासमाजजीवनमानराहणीमौजमजाछायाचित्रणप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादअनुभवप्रतिभाविरंगुळा

निवडणूक, ऋषि सुनकांची

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
23 May 2024 - 4:23 pm

मंडळी पाश्चात्य देशीयांची दुसर्‍या देशांबद्दल सामान्य ज्ञान जुजबी असूनही भारता सारख्या असंख्य देशांच्या अंतर्गत राजकारणात यांची विद्यापीठे, प्रसार माध्यमे एन जी ओ, राजकारणी आणि त्यामागे असलेली शातीर मल्टीनॅशनल व्यावसायिक गणिते -आपले ठेवायचे झाकुन दुसर्‍याचे बघायचे वाकून- अशा स्वरूपात प्रचंड नाक खुपसत असतात. वसाहतवादाचा सुंभ जळाला तरी पिळ जात नाही. भारतीयांचे सामान्य ज्ञान अधिक असूनही परकीयांच्या घरात नाक खुपसण्यात कमी पडतो

समाजबातमी

चाय की चर्चा..

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
2 May 2024 - 3:35 pm

या लेखाचं शीर्षक "चाय पे चर्चा" असं नाही बरं का. मला चाय पे चर्चा करून माझ्या एरियातल्या कोणत्याही समस्या मांडायच्या नाहीत. किंवा कोणतीही राजकीय चर्चा करायची नाही. मला ॲक्चुअल चहा याच विषयावर लिहायचं आहे.

चहाला चाय म्हणतात. चा म्हणतात. च्या म्हणतात. टी म्हणतात. प्रत्येक भाषेत चहासाठी शब्द आहे. यावरूनच त्याची जागतिक लोकप्रियता दिसून येते.

समाजजीवनमानप्रकटनविचार

वटवृक्ष!

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
18 Apr 2024 - 11:42 am

आज १८ एप्रिल. माझे आजोबा तीर्थस्वरूप नारायणराव वेलणकर अर्थात् नाना आजोबा जाऊन १४ वर्षं झाली. त्यांच्याबद्दलच्या आठवणी शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न. वस्तुत: आजोबांबद्दल नातवाने बोलणं म्हणजे एखाद्या नवोदित कलाकाराने हरिप्रसाद चौरासियांसारख्या बुजुर्ग व्यक्तीबद्दल बोलणं आहे! कारण आम्ही नातवांनी जे आजोबा पाहिले ते त्यांचं शेवटच्या टप्प्यातलं रूप होतं. अस्ताला जाणा-या मंदप्रभ सूर्याला बघणं होतं. त्या तुलनेत मुलगा- वडील हे नातं जास्त जवळचं आणि अनेक गोष्टी दीर्घ काळ समान प्रकारे अनुभवणारं. एकमेकांना जवळून अनुभवण्याची संधी‌ देणारं. पण कधी कधी जास्त प्रखर आणि त्यामुळे डोळ्यांवर अंधारी आणणारंसुद्धा.

समाजजीवनमानलेखअनुभव

जमिनींच इनसाईडर ट्रेडींग, एक दुर्लक्षित प्रश्न

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
13 Apr 2024 - 10:48 am

इनसाईडर ट्रेडींग म्हणजे थोडक्यात गुप्त माहितीच्या आधारे सौदेबाजी. उदाहरणार्थ सार्वजनिक कंपनीच्या शेअर स्टॉक किंवा इतर सिक्युरिटीज (जैसे बॉण्ड्स किंवा स्टॉक ऑप्शन्स) च्या किमतींवर कंपनीच्या आर्थिक स्थिती आणि भावी प्रकल्पांची माहितीचा प्रभाव पडेल. अशी माहिती सर्व शेअर होल्डर्स पर्यंत अधिकृतपणे पोहोचण्या आधीच ज्यांच्या कडे ज्यांना कंपनीबद्दल गुप्त, महत्त्वाची माहिती आहे ते माहिती आधिकृतपणे जाहीर होऊन किमती वाढण्या किंवा कमी होण्या आधीच शेअरची खरेदी किंवा विक्री करून इतर सर्वसामान्य शेअर होल्डरच्या आधीच स्वतःच्या पदरात फायदा पाडून घेतात.

समाजलेख

माझी नर्मदा परिक्रमा : शुलपाणीच्या झाडीत

Narmade Har's picture
Narmade Har in जनातलं, मनातलं
2 Apr 2024 - 10:43 am

माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉगस्पॉट डॉट कॉम या संकेतास्थळावरील लेखांक ८२ मधील संपादित सारांश . . .

संस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मइतिहासभाषासमाजजीवनमानमांसाहारीप्रवासभूगोलदेशांतरव्यक्तिचित्रणशेतीविचारलेखअनुभव

प्रत्येक नगरात एक भारतीय युद्ध नायकांचा स्मरणपथ आणि मैदान

निनाद's picture
निनाद in जनातलं, मनातलं
29 Mar 2024 - 2:32 pm

भारतीय योध्यांचे स्मरण असण्यासाठी प्रत्येक नगरात एक भारतीय युद्धवीरांचा स्मरणपथ आणि मैदान असावे यासाठी नगर नियोजन केले जावे. - असा कायदा व्हावा ही मागणी आहे. भारतीय युद्धवीरांचा सन्मान आणि स्मरण करण्यासाठी एक भव्य समर्पित असा किमान पाच किलोमिटर्सचा भव्य मार्ग असावा. याच्या दोन्ही बाजूंना भव्य वृक्ष असावेत. हा पथ एका किमान दहा एकर क्षेत्रफळ असलेल्या भारतीय युद्ध वीर स्मरण मैदानाला जाऊन मिळावा. हे मैदान मुलभूत सुविधायुक्त असावे. मैदानात स्थानिक वीरांचा फलक असावा.

समाजविचार